जळगावात वीज पडून पाच जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Five died after lightning strike). तालुक्यातील भंवरखेडे या गावात ही दु:खद घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्य़ांपैकी चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत.

जळगावात वीज पडून पाच जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Five died after lightning strike). तालुक्यातील भंवरखेडे या गावात ही दु:खद घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्य़ांपैकी चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Jalgaon lighting strike). तर इतर एक महिला ही रोजंदारीवर काम करणारी होती.

रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. शेताता ज्वारी कापणीचे काम करत असताना दुपारी आचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे आडोशासाठी हे पाचही जण झाडाखाली थांबले. मात्र, इथेच त्यांच्यावर काळ चालून आला. मुसळधार पावसात वीज पडून या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा महणजे सासू-सासरे, दोन सुना यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस आणि महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

मृतांमध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि रोजंदारीवर काम करणारी कल्पना भैय्या पाटील (वय 35 ) यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *