Galaxies : भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली दुर्मीळ ट्विन रेडिओ गॅलेक्सी! आतापर्यंत शोधलेली तिसरी आकाशगंगा, वाचा…

दुहेरी लंबवर्तुळाकार आकाशगंगा त्यांच्या गुरुत्वाकर्षण केंद्राभोवती फिरताना त्यांच्या संबंधित सापेक्षतावादी जेटांच्या जोड्यांसह 1.5 प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेल्या आढळल्या.

Galaxies : भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली दुर्मीळ ट्विन रेडिओ गॅलेक्सी! आतापर्यंत शोधलेली तिसरी आकाशगंगा, वाचा...
1985मध्ये अमेरिकन लोकांनी न्यू मेक्सिकोमध्ये असलेल्या व्हेरी लार्ज अॅरेचा वापर करून शोधले होते पहिले TRG 3C 75
Image Credit source: Express
प्रदीप गरड

|

Aug 26, 2022 | 7:30 AM

पुणे : भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील टीमने एकमेकांमध्ये गुंफलेल्या रेडिओ आकाशगंगेची एक अत्यंत दुर्मीळ जोडी (Twin radio galaxies) शोधली आहे, जी आतापर्यंत सापडलेली तिसरी जोडी आहे. ट्विन रेडिओ गॅलेक्सीच्या (TRG) रुपाच्या नावे, J104454+354055ला 31 वर्षांच्या नंतर शोधले गेले. त्याआधी 1991मध्ये अमेरिकन आणि युरोपीय खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने आकाशगंगा शोधली होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे. 1985मध्ये अमेरिकन लोकांनी न्यू मेक्सिकोमध्ये असलेल्या व्हेरी लार्ज अॅरेचा वापर करून पहिले TRG 3C 75 शोधले होते. डंब-बेल-आकाराच्या आकाशगंगांचे हे दृश्य TIFR – नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (National Centre for Radio Astrophysics) द्वारे संचालित पुणे-आधारित अपग्रेडेड जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (uGMRT) द्वारे प्रदान केलेल्या निरीक्षणांमुळे सुलभ झाले. यासंबंधीचा अभ्यास करत एका संयुक्त पेपरमध्ये एकूणच निरीक्षणांचे वर्णन करण्यात आले आहे.

केले निरीक्षणांचे वर्णन

एनसीआरएचे प्रोफेसर गोपाल कृष्ण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरूचे प्रोफेसर रवी जोशी, कोलकाता येथील एसएन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसचे दुस्मंता पात्रा आणि आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे ए ओमकार यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या पेपरमध्ये या निरीक्षणांचे वर्णन केले आहे.

‘काही आकाशगंगा लहान गटांच्या जोड्यांमध्ये’

आपल्या विश्वातील फक्त काही आकाशगंगा लहान गटांच्या जोड्यांमध्ये आढळतात आणि गुरुत्वाकर्षणाने एकत्र असतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सर्व मोठ्या आकाशगंगाच्या त्यांच्या मध्यभागी एक कृष्णविवर आहे. जेव्हा ते सक्रिय अवस्थेत प्रवेश करते, तेव्हा ते दोन विरुद्ध दिशेने चुंबकीकृत प्लाझ्मा जेट बाहेर काढते. ही क्रिया लाखो वर्षांनंतर थांबते. GMRTसारख्या रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञांनी हे शोधले आहेत.

‘पुढील अभ्यास सुरू’

दुहेरी लंबवर्तुळाकार आकाशगंगा त्यांच्या गुरुत्वाकर्षण केंद्राभोवती फिरताना त्यांच्या संबंधित सापेक्षतावादी जेटांच्या जोड्यांसह 1.5 प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेल्या आढळल्या. या टीमचा भाग असलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितले, की ते नवीन TRGचा पुढील अभ्यास करत राहतील.

हे सुद्धा वाचा

आकाशगंगा काय आहे?

अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ म्हणजे आकाशगंगा होय. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार लहान आहे. मात्र तरीही तिच्यात अब्जावधी (सुमारे 250 अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, आणि त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत. विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात, अशी तर्क लावले जातात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें