बंदूक सोडून पुस्तकांची धरली साथ, राजुला आता झाली बारावी उत्तीर्ण, त्यासाठी करावा लागला संघर्ष

राजुला ही जहाल नक्षली होती. आता ती बारावीचे परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी झाली. राजुला हिदमीच्या संघर्षाची ही अनोखी कहाणी आहे. बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा हा प्रवास जाणून घेऊया.

बंदूक सोडून पुस्तकांची धरली साथ, राजुला आता झाली बारावी उत्तीर्ण, त्यासाठी करावा लागला संघर्ष
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 3:45 PM

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : बारावीचा निकाल लागला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. मात्र या यशात आदिवासी समाजातील राजुला हिदामी हिचीही भर पडली. अनेकांना ९० च्यावर गुण मिळाले. राजुलाला 45.83% गुण मिळाले. तुम्ही म्हणाल यात काय विशेष. पण 45 टक्के गुण घेणाऱ्या राजुलाची दखल घेण्याचे कारण काही वेगळेचं आहे. राजुला ही जहाल नक्षली होती. आता ती बारावीचे परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी झाली. राजुला हिदमीच्या संघर्षाची ही अनोखी कहाणी आहे. बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा हा प्रवास जाणून घेऊया.

राजुला मूळची गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग असलेल्या लवारी या गावातली रहिवासी. नक्षलवाद्यांनी तिला जबरदस्तीने पळवून नेले होते. तेव्हा ती पंधरा वर्षाची होती. नक्षली चळवळीमध्ये तिला सहभाग घ्यावा लागला. एवढ्या कमी वयात तिच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली.

RAJULA 2 N

हे सुद्धा वाचा

जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत

राजुला त्या काळात गोंदिया आणि गडचिरोली परिसरातील जहाल नक्षलवादी म्हणून कार्यरत होती. अनेक प्रकरणात पोलिसांवर गोळीबार करणे, लूटमार करणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्या नावावर होती. परंतु हिंसाचाराने भरलेल्या या जीवनात तिने स्वतःला दूर सारत ती पुढे गेली.

सातवीनंतर सोडली होती शाळा

तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्यासमोर तिने आत्मसमर्पण करून शिक्षणाची कास धरली. नक्षली चळवळीत असताना तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर तिने 2018 ला 8 वीपासून आपले शिक्षण सुरू ठेवले. 2021 मध्ये दहावी आणि आता 2023 ला बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

संदीप आटोळे यांनी स्वीकारले पालकत्व

यात पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. तिच्या शिक्षणाचा सगळा भार उचलला. त्यांच्या पाठिंबामुळेच आज राजुला हिदामी ही पास झाली. संदीप आटोळे यांनी राजुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज राजुला सर्वसामान्य मुलीसारखी आयुष्य जगत आहे. अशी माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.

राजुलाच शिक्षण गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शासकीय आदिवासी वसतिगृहात राहून झाले. तिने आपले शिक्षण आठवी ते बारावी पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर पुढे तिला पोलीस सेवेत कार्य करण्याची इच्छा आहे. ती पोलीस दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात पुढील शिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होण्याचा तिचा मानस आहे.

Non Stop LIVE Update
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
'जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील...,' काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे.
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.