आनंदाची बातमी! प्रवाशांची होणार ट्रेनच्या गर्दीतून सुटका, दिवाळीनिमित्त मध्य रल्वेचं प्रवाशांना सर्वात मोठं गिफ्ट
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, मध्य रेल्वेने दिवाळी आणि छट पुजेनिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. साठ अतिरिक्त विशेष ट्रेन या काळात सोडण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, मध्ये रेल्वेकडून दिवाळी आणि छट पूजेनिमित्त मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी आणि छठ उत्सव 2025 साठी 60 अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, या काळात रेल्वेला होणाऱ्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार असल्यामुळे रेल्वे गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
असं असणार वेळापत्रक
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01145 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०६.१०.२०२५ ते १०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01146 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०८.१०.२०२५ ते १२.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी आसनसोल येथून २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १६.२० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय, भाबुआ, सासाराम, देवरिया सदर, अनुराग नारायण रोड, गया, कोडरमा, हजारिबाग रोड, पारसनाथ, नेताजी सुभाषचंद्र बोस गोमो, धनबाद आणि कुलटी.
संरचना : २० वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे व २ जनरेटर डबे
२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – करीमनगर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01021 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ११.१०.२०२५ ते १५.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून ००.२० वाजता सुटेल आणि करीमनगर येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01022 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ११.१०.२०२५ ते १५.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी करीमनगर येथून १७.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, पार्टुर, सेलू, परभणी, पुर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली आणि कोरटल.
संरचना: २० वातानुकूलित तृतीय श्रेणी व २ जनरेटर डबे.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस – मुजफ्फरपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१२ सेवा)
01043 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०७.१०.२०२५ ते ११.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे तिसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
01044 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ०९.१०.२०२५ ते १३.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी मुजफ्फरपूर येथून ०८.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी २२.५० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपूर, सुभेदारगंज, मिर्झापूर, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर.
संरचना: १ वातानुकूलित प्रथम, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ पेंट्रीकार व २ जनरेटर डबे.
४) पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष (२४ सेवा)
01493 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष गाडी ०६.१०.२०२५ ते १३.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार व गुरुवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
01494 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष गाडी ०७.१०.२०२५ ते १४.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून २१.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जं., गोध्रा (फक्त 01494 साठी), रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं. आणि मथुरा.
संरचना: १६ वातानुकूलित तृतीय व २ जनरेटर डब्बे.
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01145, 01021, 01043 आणि 01493 यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले आहे.
अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS द्वारे सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या नेहमीच्या दराने बुक करता येतील.
सविस्तर वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा, असं आवाहान मध्य रेल्वेच्या वतीन करण्यात आलं आहे.
