सरकार बदलताना पाहिले, परब म्हणाले महामंडळाच्या विलीनीकरणावर तातडीने चर्चा करणार : गुणरत्न सदावर्ते

अॅजव्होकेट जनरल यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार असल्याचं परब म्हणाले," अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. ते आधी माध्यमांशी बोलत होते. त्यानंतर त्यांनी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या एसटी एसटी कर्मचाऱ्यांच्या महासभेत भाषण केले. 

सरकार बदलताना पाहिले, परब म्हणाले महामंडळाच्या विलीनीकरणावर तातडीने चर्चा करणार : गुणरत्न सदावर्ते
gunratna sadavarte
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 7:46 PM

मुंबई : “70 वर्षात पवारांना जमलं नाही ते उद्धव ठाकरे आणि परब यांनी करावं. मी मेजॉरिटी लोकांसाठी बैठकीला आलो हे सरकारने स्वीकारलं आहे. मंत्री म्हणाले माझे चर्चेचे दार उघडे आपण सुचवावं, काय केलं जाऊ शकतं. त्यानंतर अॅजव्होकेट जनरल यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार असल्याचं परब म्हणाले,” अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. ते आधी माध्यमांशी बोलत होते. त्यानंतर त्यांनी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या एसटी  कर्मचाऱ्यांच्या महासभेत भाषण केले.

परब म्हणाले विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार

गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. “परब यांना चांगली संधी आहे. 70 वर्षात पवारांना जमलं नाही ते उद्धव ठाकरे आणि परब यांनी करावं. मी मेजॉरिटी लोकांसाठी बैठकीला आलो हे सरकारने स्वीकारलं आहे. मंत्री म्हणाले माझे चर्चेचे दार उघडे आपण सुचवावं, काय केलं जाऊ शकतं. त्यानंतर अॅडव्होकेट जनरल यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार, असं परब म्हणाले आहेत. इतर राज्यात विलीनीकरण झाले त्यावर माहिती मागवली आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे,” अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

कोणत्याच गाडीवर दगड मारलेला नाही

तसेच पुढे बोलताना कष्टकरी काम करणार नाही. आंदोलन सुरू राहील हे स्पष्ट आहे. आतापर्यंत आम्ही चुकीची आक्रमकता दाखवलेली नाही. ही संयमाची आक्रमकता आहे. कोणत्याच गाडीवर दगड मारलेला नाही. शिवीगाळ केलेली नाही,” असेदेखील सदावर्ते यांनी निक्षून सांगितले.

न्यायालयात विजयी भरारी घेत आहोत, सराकारला बदलेलं पाहिलं

त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावरील आयोजित महासभेत भाषण केले. “आझाद मैदानातील कष्टकऱ्यांची धुरा सांभाळलेली आहे. जे इथं उपस्थित नाहीत परंतु वगवेगळ्या जिल्ह्यात, आगारात मला ऐकत असतील त्यांना मी सांगत आहे. आम्ही न्यायालयात विजयी भरारी घेत आहोत. आज आम्ही सरकारला बदलेलं पाहिलं आहे. माझा भाऊ वयाने लहान आहे. पण गोपीचंद पडळर यांचं प्रकरण जरा अवघड आहे, असं एका डीसीपीने मला सांगितलं. आज मला महासभेला लवकर यायचं होतं. कोणाशी बोलायचं असं विचारलं जात होतं. पण आज सरकार बदलताना मी पाहिलं, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

इतर बातम्या :

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे

बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, जालन्यात गुन्हा दाखल!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.