AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान, गडचिरोलीतील 150 ग्रामपंचायतीचा आखाडा, मतदानाला सुरुवात

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) मतदान होत आहे.

ग्रामपंचायतीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान, गडचिरोलीतील 150 ग्रामपंचायतीचा आखाडा, मतदानाला सुरुवात
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 20, 2021 | 8:07 AM
Share

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) मतदान होत आहे. जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. आज 20 जानेवारीला सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली आहे. सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Gram Panchayat Election Second Phase Gadchiroli 2021)

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आमि सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि भारतीय लोकशाही समृद्ध करावी तसंच मतदान करुन गावच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 49 हजार 638 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 486 प्रभागामधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे निकाल

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3 हजार 263, राष्ट्रवादीने 2 हजार 999, शिवसेनेने 2 हजार 808, काँग्रेसने 2 हजार 151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2हजार 510 जागा जिंकल्या आहेत.

या निकालावरून महाविकास आघाडी आणि भाजप अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे 8 हजाराहून अधिक जागा मिळाल्या आहेत. यावरुन महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे. पण, राजकीय पक्षनिहाय विचार करता सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. मनसे, रिपाइं, वंचित बहुजन आघाडीलाही या निवडणुकीत जेमतेम जागा मिळाल्या आहेत.

(Gram Panchayat Election Second Phase Gadchiroli 2021)

हे ही वाचा :

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...