UPSC परीक्षेत सोलापूरचा सुपुत्र अव्वल, पहिल्याच प्रयत्नात देशात पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (IES) परीक्षेत सोलापूरचा सुपुत्र अव्वल ठरला आहे.

UPSC परीक्षेत सोलापूरचा सुपुत्र अव्वल, पहिल्याच प्रयत्नात देशात पहिला

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (IES) परीक्षेत सोलापूरचा सुपुत्र अव्वल ठरला आहे. हर्षल ज्ञानेश्वर भोसले (Harshal Bhosale Top IES of UPSC) असं या तरुणाचं नाव आहे. हर्षलने पहिल्याच प्रयत्नात या परिक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशानंतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हर्षल भोसले तांडोर (ता. मंगळवेढा) येथील रहिवासी आहे. त्याने 2018 मध्ये लोकसेवा आयोगाची आयईएस परिक्षा दिली होती. जानेवारी 2018 मध्ये ही लेखी परीक्षा झाली होती. लेखी परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांची सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. यात हर्षल भोसलेने पहिला क्रमांक मिळवला.

हर्षलने अगदी खडतर परिस्थितीत हे यश मिळवले आहे. तो 5 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचा दारुच्या व्यसनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईने शेतीत कष्ट करत त्याचे शिक्षण पूर्ण केले. हर्षलचे प्राथमिक शिक्षण मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल आणि देगाव येथील आश्रमशाळेत झाले. त्यानंतर त्याने बीडमधील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेतले. येथेही तो सलग 3 वर्षे टॉपर होता. हर्षलने पुढे कराडमधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. त्याने गेट परिक्षेत (GATE Exam) देखील यश मिळवले. त्यात तो देशात 84 व्या क्रमांकावर होता.

विशेष म्हणजे हर्षलला मुंबईत भाभा अणुसंधान संशोधन संस्थेत नोकरी मिळाली. त्यानंतर त्याने पुण्यातील ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून काम केलं. तेथे काम करत असतानाच त्याने युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. अखरे त्याच्या मेहनतीला यश मिळाले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *