AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची ताकद वाढली, थेट माजी खासदार पक्षात दाखल; निवडणुकीचे गणित बदलणार?

Heena Gavit joins BJP: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गावीत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

भाजपची ताकद वाढली, थेट माजी खासदार पक्षात दाखल; निवडणुकीचे गणित बदलणार?
Hina Gavit BJP
| Updated on: Oct 28, 2025 | 3:43 PM
Share

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गावीत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे भाजपला जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे. नंदुरबारमध्ये हिना गावित यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी

नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉ. हिना गावितांची घरवासी झाली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हिना गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

डॉ. हिना गावित यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला होता, त्यामुळे त्यांनी भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. विधानसभा निवडणूकीमुळे त्या भाजपपासून दूर गेल्या होत्या, मात्र आता त्या पुन्हा भाजपमध्ये परतल्या आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. आता भाजपाचे इतर नेते हिना गावित यांना कशा पद्धतीने पक्षात सामावून घेणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत हिना गावित?

हिना गावित या माजी खासदार असून माजी आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. गावित कुटुंबाचे उत्तर महाराष्ट्रात मोठे राजकीय वजय आहे. त्यांचे वडील भाजपचे आमदार असल्याने त्या भाजपमध्ये परतणार असल्याचे बोलले जात होते. आज त्यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे नंदुरबारसह उत्तर भारतात भाजपला बळकटी मिळाली आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.