AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Flood : हिंगोलीत पुरामुळं वाहतूक ठप्प, लाकडाची झोळी करून रुग्णालयात नेले, पायपीट केल्यानंतर अखेर वृद्धाचा मृत्यू

बाळापूरला उपचारासाठी नेले जात होते. मात्र, पुलावरून पाणी वाहत होते. गावकऱ्यांनी युक्ती केली.

Hingoli Flood : हिंगोलीत पुरामुळं वाहतूक ठप्प, लाकडाची झोळी करून रुग्णालयात नेले, पायपीट केल्यानंतर अखेर वृद्धाचा मृत्यू
लाकडाची झोळी करून रुग्णालयात नेले, पायपीट केल्यानंतर अखेर वृद्धाचा मृत्यू Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 19, 2022 | 4:00 PM
Share

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द (Pimpri Khurd) येथील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला झोळीत टाकून चिखल तुडवत उपचारासाठी गावकऱ्यांनी नेले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अर्धा किलोमीटर चिखल तुडवत केलेली पायपीट यामुळे व्यर्थ गेलीय. पिंपरी खुर्द येथे जाण्यासाठी कयाधू नदी लगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून हलक्या पावसातही पाणी वाहते. त्यामुळे पिंपरी खुर्द, आखाडा बाळापूर, चिखली (Chikhli) या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असते. या पुलाची उंची वाढवावी अशी जुनी मागणी आहे. सोमवारी सायंकाळी गावातील 75 वर्षीय संभाजी धांडे (Sambhaji Dhande) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुलावरून पाणी असल्याने गावकऱ्यांनी लाकडाला दोरी बांधून त्याची झोळी तयार केली. त्या झोळीत या वृद्धाला टाकून तब्बल अर्धा किलोमीटर चिखल तुडवत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर आणण्यात आले. त्यानंतर वाहनात बसवून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या सगळ्यात वेळ गेल्याने रस्त्यातच उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच गोविंद धांडे यांनी दिलीय.

पुलाअभावी घात झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप

काल दुपारी बारा संभाजी धांडे यांनी अस्वस्थ वाटू लागले. बाळापूरला उपचारासाठी नेले जात होते. मात्र, पुलावरून पाणी वाहत होते. गावकऱ्यांनी युक्ती केली. लाकडाची झोळी तयार केली. गोविंद धांडे, सुरेश धांडे, केशव धांडे, बबन धांडे, संदीप धांडे, रमेश धांडे, अतन शिंदे हे कामाला लागले. संभाजी धांडे यांना झोळीत बसविण्यात आले. अर्धा किलोमीटरचा रस्ता तुडवत इसापूर कालव्यावर आणण्यात आले. त्यानंतर दुचाकीवर बसवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पुरामुळं वाहतूक बंद होती. त्यामुळं संभाजी यांनी वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. मृतक धांडे यांचा मृतदेह पुन्हा अर्धा किलोमीटर चिखल तुडवत गावकऱ्यांनी गावात आणला. या सर्व प्रकाराने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पिंपरी खुर्द येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून आहे. शासनदरबारी ही मागणी लालफितशाहीत अडकली आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळं गावकऱ्यांचा प्रशासनाविरोधात रोष आहे.

Follow Us
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार