दोन मुलांना विष पाजून पती पत्नीचीही आत्महत्या, चौघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

बार्शी शहरातील अलीपूर (Barshi) रस्त्यावर ज्ञानेश्वर मठाजवळ (Dnyaneshwar Math) एकाच कुटुंबातील 4 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली (Family Suicide in Solapur).

दोन मुलांना विष पाजून पती पत्नीचीही आत्महत्या, चौघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

सोलापूर : बार्शी शहरातील अलीपूर (Barshi) रस्त्यावर ज्ञानेश्वर मठाजवळ (Dnyaneshwar Math) एकाच कुटुंबातील 4 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली (Family Suicide in Solapur). यात पती, पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे. पती-पत्नीने आपल्या मुलांना विष पाजून स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. भैरवनाथ कोकाटे (Bhairavnath Kokate) आणि मनिषा कोकाटे (Manisha Kokate) असं गळफास घेणाऱ्या पतिपत्नीचं नाव आहे.

भैरवनाथ आणि मनिषा कोकाटे यांनी प्रशांत आणि प्रतिक्षा या आपल्या मुलांना प्रथम विष पाजले. प्रतिक्षा पाचवीत शिक्षण घेत होती, तर प्रशांत नववी इयत्तेत शिकत होता. भैरवनाथ कोकाटे हे बार्शीतच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. आज (24 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

कोकाटे पती-पत्नीने आपल्या दोन्ही मुलांना विषप्राशन करायला लावले. त्यानंतर आपल्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर जाऊन खोलीच्या आतून कडी लावली. त्यानंतर एकाच दोरीने पत्नी-पत्नीने गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *