मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल, जाणून घ्या नेमका फायदा कोणाला?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 29, 2021 | 6:06 PM

हायब्रीड लोकलसंदर्भात आम्ही एक सर्व्हे केलेला होता, त्या सर्व्हेमध्ये 70 टक्के लोकांनी याला पसंती दर्शवली होती, त्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये आम्ही हायब्रीड लोकल सेवा देणार आहोत. या हायब्रीड लोकल सेवेमध्ये आम्ही महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेणार आहोत

मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल, जाणून घ्या नेमका फायदा कोणाला?

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात आलीय. दोन डोस घेतलेल्यांना ट्रेननं प्रवासाची मुभाही देण्यात येतेय. त्यातच आता प्रवाशांकडूनही लोकलच्या गाड्या आणि फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागलीय. त्याच धर्तीवर रेल्वेनं हायब्रीड लोकलची चाचपणी सुरू केलीय. यासंदर्भात पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनीसुद्धा माहिती दिलीय.

 दोन ते तीन वर्षांमध्ये आम्ही हायब्रीड लोकल सेवा देणार

हायब्रीड लोकलसंदर्भात आम्ही एक सर्व्हे केलेला होता, त्या सर्व्हेमध्ये 70 टक्के लोकांनी याला पसंती दर्शवली होती, त्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये आम्ही हायब्रीड लोकल सेवा देणार आहोत. या हायब्रीड लोकल सेवेमध्ये आम्ही महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेणार आहोत आणि प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवणार आहोत, या हायब्रीड लोकलमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा नसणार आहे, असंही आलोक कन्सल म्हणालेत.

मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या चर्चेत

दुसरीकडे मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या चर्चेत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प हा कोणत्याही राज्याचा प्रकल्प नसून संपूर्ण देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात जमीन अधिग्रहणाकरिता रेल्वे मंत्रालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मुंबईला आले असताना त्यांनी बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहण प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्याच बैठकीत हायब्रीड लोकलसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी दिली.

कशी असणार हायब्रिड लोकल?

हायब्रीड लोकल ट्रेन पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे विभागानं एसी लोकल सुरू करण्याच्या दिशेनं काम सुरू केलंय. तसेच या हायब्रीड मॉडेलला कार्यात्मक बनवलंय. त्यामुळे लोकल एसी आणि नॉन एसी दोन्ही प्रकारात धावणार आहे. प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात येणार आहेत, या हायब्रीड लोकलमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा नसणार आहे. तसेच या हायब्रीड लोकल सेवेमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

लोकलमध्ये होमगार्ड नेमण्याची मागणी

ज्या काही मागण्या आम्ही राज्य प्रशासनामार्फत करतो, त्या मागण्या राज्य सरकार वेळोवेळी पूर्ण करतात, त्यामुळे अतिरिक्त होमगार्डसंदर्भात देखील राज्य सरकार ही मागणी मान्य करेल. दुसरीकडे मुंबई मंडळानं वसई रोड-दिवा-पनवेलदरम्यान मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट सेवा बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. मार्च 2020 मध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या कारणास्तव सेवा बंद केली होती.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदा एल्डर लाइन टोल फ्री क्रमांक, मदतीसाठी 14567 वर करा कॉल

PM पोषण शक्ती निर्माण योजना सरकार सुरू करणार, 5 वर्षांपर्यंत करोडो मुलांना मोफत अन्न

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI