AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यास 100 वाल्मिक कराड तयार होतील, धनंजय देशमुखांची जहरी टीका

Dhananjay Munde Ministerial Post: धन्नुभाऊंना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यापासून विविध चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यास 100 वाल्मिक कराड तयार होतील, धनंजय देशमुखांची जहरी टीका
धनंजय मुंडे, धनंजय देशमुख, संतोष देशमुखImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 8:31 AM
Share

Dhananjay Deshmukh on Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर आणि अमानवीय हत्येने संपूर्ण राज्य हादरले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी जनसामान्यांतील आक्रोश आणि संतोष कायम आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड सध्या तुरुंगात आहेत. धन्नुभाऊंना मोठ्या दबावानंतर मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. त्यांनी आजारपणाचं कारण त्यासाठी पुढे केलं होते. तर काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार, त्यांना मंत्रिपद मिळणार अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

तर 100 वाल्मिक कराड,1 हजार टोळ्या तयार होतील

खऱ्या अर्थाने बोलतो हा न्याय काव्यात्मक आहे, माझ्या भावाला ज्याने संपवलं त्याला राष्ट्र संत भगवान बाबा जयंती दिवशी मकोका लावला. ज्याने मकोका लावण्याचा कायदा ज्याने केला त्या गोपीनाथ मुंडे जयंती दिवशी युक्तिवाद झाला, आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला. आम्हाला न्याय मिळायला आज सुरुवात झाली असे धनंजय देशमुख म्हणाले.

पण धनंजय मुंडे मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड 1 हजार टोळ्या आणि शेकडो खून होतील, अशी जहरी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे. यावर शासनाने विचार करावा, ही टोळी कशी राजश्रयात होती हे मी उघड करेल याबाबत दबाव येऊ शकतो असे पत्र मी न्यायालयात दिले आहे, असे ही त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे भाजपमध्ये?

धनंजय मुंडे हे मंत्री पदासाठी लॉबिंग करत आहेत असे समजत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर ते दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे माझा देखील लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये जातील असं वाटू लागले आहे. त्यांच्यावर बरेचसे आरोप आहेत आणि वाल्मिक कराड प्रकरणांमध्ये सुद्धा त्यांच्या अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दिल्लीमध्ये गेले आहेत, असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली.

वाल्मिक कराड याला बाहेर काढण्यासाठी आणि या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले आहेत, असा आरोप मुंडे यांनी केला. आपणही शनिवारी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहोत आणि त्यामध्ये 50 पक्षांना मी आवाहन करणार आहे की त्यांनी या लढ्यामध्ये मला साथ द्यावी, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

अंबादास दानवे काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मला असे केले जाईल असे मुळीच वाटत नाही, धनंजय मुंडे विषयी जो रोष आहे, तो रोष ज्यापर्यंत संतोष देशमुख प्रकरणातील लोकांना फासावर लटकवले जात नाही तो पर्यत हटणार नाही असे दानवे म्हणाले.

फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.