LIVE: दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव
Picture

दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळपास 13 प्रापर्टीचा लवकरच लिलाव, रत्नागिरीत दाऊदचा बंगला आणि शेतजमीन, लिलावासाठी संपत्तीचं मूल्यांकन सुरु, लवकरच लिलावची संपूर्ण प्रक्रिया जाहीर होणार

19/11/2019,3:38PM
Picture

चंद्रकांतदादा जखमी वारकऱ्यांच्या भेटीला

#पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जखमी वारकऱ्यांच्या भेटीला, मृतांच्या नातेवाईकांना भाजपकडून 5 लाखांची मदत, जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार,चंद्रकांत पाटील यांची माहिती, दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून दुर्घटना,दोघांचा मृत्यू 16 जखमी

19/11/2019,3:23PM
Picture

दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, दोघांचा मृत्यू

दिवेघाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसून भीषण अपघात, दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 5 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर, जखमींवर हडपसरमधील नोबल रुग्णालयात उपचार सुरु

19/11/2019,10:21AM
Picture

नागपुरात हनुमान मंदिरामागे तरुणाची हत्या

नागपुरातील प्रसिद्ध राजाबाक्षा हनुमान मंदिर परिसरात विजय खंडाईत नामक तरुणाची हत्या, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात आरोपींकडून धारदार शस्त्राने हत्या, विजय कारने मंदिर परिसरात आला होता, मंदिराच्या मागील बाजूस मृतदेह आढळून आला, हत्या कोणी कोणत्या कारणांनी केली हे अद्याप अस्पष्ट असून इमामवाडा पोलीस घटनेच तपास करत आहे

19/11/2019,10:14AM
Picture

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी : संभाजीराजे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सरकार नसने दुःखाची बाब, राज्यात लवकरच सरकार स्थापन करावे, खासदार संभाजीराजे यांचं सर्वपक्षीयांना आवाहन

19/11/2019,9:47AM
Picture

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे नेते दिल्लीत दाखल

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे नेते दिल्लीत दाखल, जोगेंद्र कवाडे आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार, महासेनाआघाडी सरकारमध्ये मित्रपक्षांनाही हवा वाटा, मित्रपक्षांची नाराजी आहे असं वक्तव्य काल शरद पवार यांनी केलं होतं, शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा मित्रपक्षांचा आग्रह

19/11/2019,9:51AM
Picture

मराठा आरक्षणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आज मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आहे. राज्य शासनाने वकिलांची फौज तयार केली आहे. महाराष्ट्रातील मराठा जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. खासदार संभाजीराजे यांचं आवाहन

19/11/2019,9:49AM
Picture

पाणी भरण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अनियंत्रित व्हॅननं चिरडलं

जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना, पाणी भरण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अनियंत्रित व्हॅननं चिरडलं, घटनेत एका महिलेचा मृत्यू 4 जण जखमी, वाहन चालक दारुच्या नशेत असल्याचा संशय

19/11/2019,8:28AM
Picture

डेंग्यू आजाराने गर्भवती महिलेचा मृत्यू

डेंग्यू आजाराने गर्भवती महिलेचा मृत्यू, नांदेडमधील हदगाव शहरातील घटना, आदिती येलेकर असं 24 वर्षीय महिलेचं नाव, शहरात घनकचऱ्याचे नियोजन ढासळल्याने रोगराई वाढल्याचा आरोप

19/11/2019,8:29AM
Picture

विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप

विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप, कारवाईसाठी ग्रामस्थांचं आंदोलन, वाकी गावातील नागरिकांची अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी

19/11/2019,8:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *