‘खोका कोणी नेला? आता सापडत नाही, सरकारला येडं करून टाकू…’, भर सभेत मंत्री असं काय बोलून गेले?

आमच्यावर खोके, खोके म्हणून खूप टीका झाली. मात्र, राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले आणि खोके गायब झाले. मात्र, कोणता खोका कोणी नेला ते अजून सापडत नाही असा टोला शिंदे गटाचे मंत्री यांनी लगावला.

'खोका कोणी नेला? आता सापडत नाही, सरकारला येडं करून टाकू...', भर सभेत मंत्री असं काय बोलून गेले?
BACCHU KADU, GULABRAO PATIL, AJIT PAWAR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 5:51 PM

जळगाव : 17 सप्टेंबर 2023 | गुवाहाटीला गेलो म्हणून इतके बदनाम झालो की बाहेर पडले तर लोक खोके घेतले म्हणून बोलतात. जिकडे जिकडे गेलो तिकडे खोके घेऊन आला. खोके घेऊन आलास असे म्हणतात. आमची बदनामी करतात. मात्र, मला अशा बदनामीची फिकर नाही. ‘गुहाटी नही जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नही मिलता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्ष राहिलो. मात्र, दिव्यांग मंत्रालय झालं नाही. एकनाथ शिंदे यांना अट घातली. जर तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच तुमच्यासोबत येतो नाही तर गाडीतून खाली उतरतो, असे सांगत खोके, खोके म्हणून टीका करणाऱ्यांना आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं.  मात्र, याच कार्यक्रमात राज्यसरकारमधील एका मंत्र्याने शेरो शायरी करण्याच्या नादात ‘सरकारला येडं करून टाकू’, असं विधान केलंय.

जळगावमध्ये दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम सांगितला. दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी पुन्हा एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा शब्द पाळला. त्यामुळेच आज दिव्यांग मंत्रालय मिळाले असे त्यांनी सांगितलं. याच कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीवाले सोबत आले, खोके गायब झाले…

आमच्यावर खोके, खोके म्हणून खूप टीका झाली. मात्र, राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले आणि खोके गायब झाले. मात्र, कोणता खोका कोणी नेला ते अजून सापडत नाही असा टोला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला.

हे सुद्धा वाचा

सरकारला पण येड करून टाकू…

राज्यात दिव्यांग बांधव पाच टक्के आहेत म्हणजेच 15000 दिव्यांग बांधव आहेत. ‘ये गिराने की ताकद रखते है और चूनके लाने की भी ताकद रखते है’, अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. आम्ही जर दहा पंधरा एकसारखे सरकारला लटकलो तर सरकारला पण येड करून टाकू. पण, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. अशी त्यांनी जुनी आठवण सांगितली. बदनामी करणारे करत राहतात. आम्ही आमचे काम करत राहतो असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद.
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण....
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण.....
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?.