AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही तो कोसळणार! तब्बल इतक्या जिल्ह्यात हवामान विभागाचा मोठा इशारा, धोक्याची घंटा..

राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

आजही तो कोसळणार! तब्बल इतक्या जिल्ह्यात हवामान विभागाचा मोठा इशारा, धोक्याची घंटा..
Rain
| Updated on: Apr 06, 2026 | 7:11 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाचा मोठा फटका बसत आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. आज विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका वाढण्याचीही शक्यता आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात नीचांकी 15.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोदिंया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18 हजार शेतकऱ्यांचे पिकाचं नुकसान झाले. साक्री शिंदखेडा शिरपूर धुळे तालुक्यातील 234 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान. एकून 11627 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

5 हजार 900 हेक्टर कांदा, 2 हजार 400 हेक्टर ज्वारी, 2 हजार हेक्टर बाजरी तर सुमारे शंभर एकरच्या वर फळ पिकांचे नुकसान. कृषी खात्याच्या वतीने नुकसानीचा अहवाल जाहीर करण्यात आला. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे हाताशी आलेले पिक गेल्याची स्थिती आहे. येवला तालुक्यातील मुखेड शिवारात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे मुखेड शिवारातील टोमॅटोची शेती अक्षरशः भुईसपाट झाली. उभे असलेले पिक पूर्णपणे आडवे पडले असून अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. शेती पिकाचे इतके नुकसान होऊनही पाऊस काही थांबत नाहीये.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...