AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, भारतीय हवामान विभागाकडून अंदाज, आज ‘या’ भागात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळतंय. मात्र, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, भारतीय हवामान विभागाकडून अंदाज, आज 'या' भागात मुसळधार पाऊस
Rain
| Updated on: Aug 03, 2025 | 7:36 AM
Share

आता ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात अपेक्षित पाऊस होणार नसल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा नक्कीच मिळाला. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज थेट भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पिकांमुळे शेतकरी राजा चिंतेत होता. मुंबईमध्ये आज सकाळीच पावसाने हजेरी लावलीये. कालही काही भागांमध्ये पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज (3 ऑगस्ट) राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे विजांसह पाऊस पडेल.

हवामान विभागाकडून विदर्भात येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहिलं. पुण्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठा हा चांगलाच वाढलाय. खडकवासला धरणक्षेत्रातून मोठा पाणीसाठा मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला 1.18 टीएमसी, पानशेत 9.49 टीएमसी, वरसगाव 11.44 टीएमसी, टेमघर 3.54 टीएमसी याप्रमाणे. कोकणात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस चांगला राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे सध्या बघायला मिळतंय.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.