शिंदे गटाला मोठा धक्का! बायकोला तिकीट मिळालं नाही, पठ्ठ्याने थेट पक्षच सोडला?
भंडारा पवनी विधानसभेतील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जॅकी रावलानी यांची महत्त्वाची भूमिका होती. पण आता पत्नीला तिकिट मिळालं नाही म्हणून त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राज्यात नगर परिषद आणि पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
भंडारा पवनी विधानसभेतील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जॅकी रावलानी यांची महत्त्वाची भूमिका होती. रावलानी यांची पक्षातील कामगिरी पाहाता त्यांना भंडारा लोकसेभेचे युवा सेना अध्यक्ष करण्यात आले आहे. मात्र आता त्यांनी पत्नीला तिकिट न दिल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटातील जॅकी रावलानी यांचा भाजपामध्ये प्रवेश
असे म्हटले जात आहे की, भंडारा नगर परिषद अध्यक्षपदाच्या तिकीट वाटपादरम्यान जॅकी रावलानी यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितले होते. पण जेव्हा त्यांना शंका आली की त्यांना तिकीट मिळणार नाही, तेव्हा अखेर त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावलानी यांनी यांचा भाजपात प्रवेश करणे हे शिंदे गटासाठी धक्का मानले जात आहे.
जॅकी रावलानी यांनी दिली प्रतिक्रिया
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोलताना रावलानी म्हणाले की, मागील 17 वर्षापासून मी शिवसेनेत कार्यरत होतो. पण मागील काही दिवसापासून जी हुकूमशाही पद्धतीने वागणूक ते देत होते. स्वतःच्या पक्षातील नेत्यांना त्रास देत होते त्यामुळे मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रत्येक पक्षात लोकशाही पद्धत असते. सगळ्यांकडे तिकीट मागण्याचा अधिकार असतो. तोच मी पण केला. पण मुख्य विषय तिकीट मागण्याचा नसून त्यांनी हुकूमशाही पद्धतीने माझीच पत्नी उमेदवार राहील असं डिक्लेअर केलं असं होत नाही.
पुढे ते म्हणाले की, उमेदवारी मिळवण्याबाबत चर्चा दरम्यान वाद झालाय का? असा प्रश्न विचारताच जॅकी रावलानी म्हणाले की, वाद झालेला नाही त्यांनी सांगितलं की माझी पत्नी निवडणूक लढणार. तुम्ही लढायचं नाही तर सर्वसामान्य व्यक्तीचं म्हणणं होतं की ओपन कॅटेगिरीमध्ये जर आमदारांची पत्नी स्वतः निवडणूक लढेल तर बाकीच्यांनी करायचा काय…
