ठाकरे-पवार यांना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

Raj Thackeray on Sharad Pawar Uddhav Thackeray : राज ठाकरे सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

ठाकरे-पवार यांना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
राज ठाकरेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 2:08 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेनप्रकरणापासून सुरू केलं. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे. जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, देशातही आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केलं, असं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या वाटेला जाऊ नका- राज ठाकरे

माझ्या दौऱ्यावर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझं मोहोळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका. तुम्हाला तुमचं राजकारण करायचं आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे. यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटतं आमचे एवढे खासदार आले. त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात, असं राज ठाकरे म्हणाले.

पवार-ठाकरेंवर निशाणा

माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषयही नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत. तेच मला मराठवाड्यात दिसतंय, यातील दुर्देवाचा भाग म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत इन्व्हॉल्व झाले आहेत. मला त्यांची नावेही मागे आहेत. योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल, असं राज ठाकरे म्हणाले.

कुणाला पेव्हर ब्लॉकची कामे मिळाली, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाली. कुणाला किती पैसे मिळाले आणि त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या. अशा सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. मी जेव्हा धाराशीवला होतो. तेव्हा धाराशीवला काही लोक भेटायला आले. त्यांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही या. तेव्हा तुम्ही खाली जा असं सांगणारे पत्रकार होते. माझ्यासोबत कोण येणार इथपर्यंत प्रकरण झालं, असं त्यांनी म्हटलं आहे.

लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.