Arjun Khotkar Property : अडीच कोटींची जंगम, तर 9 कोटींच्या घरात स्थावर मालमत्ता, अर्जुन खोतकर इतक्या कोटींचे धनी

Arjun Khotkar Net Worth : जालना विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे सेनेने अर्जुन खोतकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्यामागे सध्या शुक्लकाष्ठ लागलेले आहे. शिवसेनेकडून ते चार वेळा आमदार आणि दोनदा मंत्री राहिले आहेत. त्यांच्याकडे अडीच कोटींची जंगम, तर 9 कोटींच्या घरात स्थावर मालमत्ता आणि इतकी संपत्ती आहे.

Arjun Khotkar Property : अडीच कोटींची जंगम, तर 9 कोटींच्या घरात स्थावर मालमत्ता, अर्जुन खोतकर इतक्या कोटींचे धनी
अर्जुन खोतकर यांची मालमत्ता
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 12:16 PM

जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना शिंदे सेनेने संधी दिली आहे. यापूर्वी अखंड शिवसेनेत ते चार वेळा आमदार होते. ते दोनदा मंत्री राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या पण त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. अर्जुन खोतकर यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, ते एकूण 11 कोटी 32 लाख 21 हजार 316 रुपये संपत्तीचे मालक आहेत. निवडणूक विभागाकडे दाखल शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 2 कोटी 47 लाख 79 हजार 294 रुपयांची जंगम आणि 8 कोटी 84 लाख 42 हजार 22 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

गुरूवारी साधला पुष्यामृताचा मुहूर्त

गुरूवारी अनेक उमेदवारांनी पुष्यामृताचा मुहूर्त साधला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. तर पैठणचे शिंदे सेनेचे शिलेदार विलास भुमरे, कैलास गोरंट्याल आणि कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत, संतोष बांगर यांच्यासह अनेकांचा समावेश होता. शुभ मुहूर्त पाहत या उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज

अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गुरूवारी निवडणूक आयोगाकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत त्यांनी शपथपत्र पण दाखल केले आहे. त्यानुसार, खोतकर यांच्याकडे 2 कोटी 47 लाख 79 हजार 294 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात एक कोटी 30 लाख 27 हजार 924 रुपयांची रोकड आहे. विविध बँकांमध्ये ठेवी आहेत. त्यांच्याकडे 1 लाख 53 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर एकाही वाहनाची नोंद नाही. त्यांच्याकडे 8 कोटी 84 लाख 42 हजार 22 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यात शेतजमिनीसह घराचा समावेश आहे. तर खोतकर यांच्या नावे 1 कोटी 2 लाख 6 हजार 50 रुपयांचे कर्ज आहे.

पत्नीच्या नावे इतकी संपत्ती

अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या नावे 4 कोटी 17 हजार 485 रुपयांची मालमत्ता आहे. त्यात 79 लाख, 23 हजार 676 रुपयांची जंगम तर 3 कोटी 20 लाख 93 हजार 809 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 9 लाख 96 हजार 356 रुपये आहे. त्यांच्याकडे 53 लाख 55 हजार रुपयांचे दागिने आहेत. तर काही शेतजमीनही आहे.

Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.