Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
Manoj Jarange On Sanjay Jadhav: परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. कार्यक्रम रद्द करा अन्यथा परभणीत येणार असा इशारा त्यांनी दिला होता. खासदार संजय जाधव यांनी कार्यक्रम रद्द करणार नाही असे म्हटले. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकरी मेळावा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. हा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. अन्यथा आपण उपोषण सोडून परभणीत येईल असा इशारा त्यांनी दिला होता. पण गेल्या 15 दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सकाळी 11 वाजता जरांगे यांचा फोन आला. शेतकरी आलेले आहे. नियोजित कार्यक्रम रद्द करू शकत नाही असे खासदार संजय जाधव यांनी म्हटले. तर आता जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
शेतकरी मेळावा रद्द होणार नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी शेतकरी मेळावा होणार आहे. त्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सकाळी 11 वाजता फोन आला. त्यांनी कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. पण आता लोक या कार्यक्रमाला आली आहेत. ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करता येणार नाही. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा सन्मान करतो. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द करता येणार नाही असे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आता कार्यक्रम होणार
“परभणीला जाईपर्यंत तो कार्यक्रम संपून जाईल. त्यांनी परभणी जिल्ह्याच्या सर्व रस्ते अडवले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आम्ही परभणी वा नांदेड पर्यंत गेलो तर शिंदेंची माघारी जायची पंचाईत होईल. बंडू जाधव यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता परभणी जाणार नाही. याचा बदला आम्ही मुंबईत घेऊ. मुंबई जाणार आहोत. बंडू जाधव यांच्या या निर्णयाचा बदला शिंदे यांच्याकडून घेण्यात येईल. मुंबईला जाणार आहोत. गुंड संजय जाधव यांना औदसा आठवली. शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार. संजय जाधव हा थर्ड क्लास माणूस निघाला. आपल्या डोक्यात लय प्लॅनिंग आहे. भोग तर भोगावे लागतील. संजय जाधव आणि शिरसाटांमुळे शिंदे आणखी खोलात गेले. सगळेच काही सांगायचं नसतं.” असा खणखणीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मुंबईत कधी जाणार?
मनोज जरांगे पाटील मुंबईत कधी जाणार याची चर्चा रंगली आहे. त्यावर सकाळी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, 12 तारखेला म्हणजे 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. त्या बैठकीत समाज बांधवांशी चर्चा करून जरांगे पाटील मुंबईत जाण्याबाबत घोषणा करू शकतात. वा आजच्या घडामोडीनंतर हा निर्णय लवकर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.
