AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीआधी राज्यात नवी आघाडी, करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला, भेटीत काय ठरलं?

आगामी निवडणुकांपूर्वी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेमार्फत सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन राजकीय पाठिंब्याचे संकेत दिले. त्याचबरोबर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले.

निवडणुकीआधी राज्यात नवी आघाडी, करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला, भेटीत काय ठरलं?
karuna munde supriya sule
| Updated on: Nov 18, 2025 | 7:41 AM
Share

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच आता करुणा मुंडे यांनी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचा तपशील जाहीर केला. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवारांशी संबंधित वादांवर अत्यंत रोखठोक मते मांडली.

करुणा मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आम्ही स्वराज्य शक्ती सेना या नावाने एक संघटना उभारली आहे. आम्ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नशील आहोत. झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. पण आम्ही तयार आहोत, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

परळीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करणार

यावेळी करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि राजकीय पाठिंब्याचा मुद्दा होता. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, याबद्दल मी त्यांच्याशी बोलले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिले आहे की, ‘जिथे जिथे तुम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे आम्ही करू आणि जिथे आम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे तुम्ही सपोर्ट करा. याचा अर्थ स्वराज्य शक्ती सेनेला एका मोठ्या पक्षाकडून सहकार्याचे संकेत मिळाले आहेत. मी स्वतः बीड जिल्ह्यातील परळीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करेन, असे आवाहन करुणा मुंडे यांनी दिले आहे.

पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही, तोवर शांत बसू नका

करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यासोबतच त्यांनी दोन्ही रुपालींच्या वादावर भाष्य केले. रुपाली चाकणकर यांना एवढा मोठा सपोर्ट मिळतो, तो काय रूप बघून दिला की काय बघून दिला, हे मला माहीत नाही. पण महिलांसाठी त्यांचे काहीही काम नाही. तरीही त्यांना इतका मोठा पाठिंबा का दिला जातो, हे कळत नाही. मी यापूर्वीच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर कोर्टात केस देखील केली आहे. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने ठोस भूमिका घेतली नाही. मी सुप्रिया सुळेंना सांगितले आहे की, जोपर्यंत पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही, तोवर शांत बसू नका, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

तो महाराष्ट्राचा आका

पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अजित पवारांशी संबंधित वादामुळे पूर्ण राष्ट्रवादीचीच इमेज खराब होत आहे. याचे परिणाम सर्व आमदार आणि खासदारांच्या प्रतिमेवर होत आहेत.हे सर्व कोण करत आहे, याचा तपास करावा लागेल. मुंबईत बसून एकजण हा सगळा राजकीय खेळ करत आहे, आणि तो महाराष्ट्राचा आका आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला, ज्यामुळे अनेक राजकीय तर्क वितर्कांना वाव मिळाला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.