Ahmednagar Lockdown : अहमदनगरमध्ये कोरोनाचं थैमान, नियमावलीत मोठे बदल, आजपासून 1 मेपर्यंत काय सुरु, काय बंद?

कोरोनाने अहमदनगरमध्ये थैमान घातलंय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये मोठे बदल केले आहेत.

Ahmednagar Lockdown : अहमदनगरमध्ये कोरोनाचं थैमान, नियमावलीत मोठे बदल, आजपासून 1 मेपर्यंत काय सुरु, काय बंद?
Corona Virus
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 18, 2021 | 9:27 PM

अहमदनगर : कोरोनाने अहमदनगरमध्ये थैमान घातलंय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये मोठे बदल केले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी अहमदनगरमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. हे बदललेले नियम 18 एप्रिलपासून तर 1 मे 2021 पर्यंत लागू असणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठकीत याबाबत आधीच इशारा केला होता. त्यानंतर लगेचच हे निर्बंध वाढवण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांनी बदललेले नियम समजून घेत त्याप्रमाणे खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे (Know all about rules of lockdown in Ahmednagar what is open and what is closed amid corona).

अहमदनगर जिल्ह्यात काय बंद?

 • हॉटेल, रेस्टॉरंटस, बार बंद राहणार आहेत. त्यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल. मात्र, होम डिलिव्हरी चालू राहणार आहे.
 • धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
 • आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
 • भाजीपाला/फळे बाजार बंद राहातील, फक्त फेरीवाल्यांना घरोघर जाऊन वितरणास मान्यता राहील.
 • दारु दुकाने पूर्णतः बंद राहतील.
 • टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीसाठी सुरु राहिल.
 • चार चाकी खासगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीस चालू राहतील.
 • दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
 • सर्व खासगी कार्यालयं पूर्णतः बंद राहतील.
 • कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पूर्णतः बंद राहतील.
 • शैक्षणिक संस्था, सर्व खासगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
 • स्टेडिअम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
 • विवाह समारंभास बंदी राहील.
 • चहाची टपरी दुकाने पूर्णतः बंद राहतील.
 • अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकानं पूर्णतः बंद राहतील.
 • सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह. संग्रहालयं पूर्णतः बंद राहतील.
 • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहातील.
 • सर्व प्रकारचे खासगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
 • सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
 • व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/इव्हीनिंग वॉक पूर्णतः बंद राहील.
 • बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

काय सुरु राहणार? (अत्यावश्यक सेवेला वेळेची मर्यादा)

 • किराणा दुकान
 • दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
 • भाजीपाला विक्री (फक्त घरोघरी जाऊन वितरण)
 • फळे विक्री (फक्त घरी जाऊन वितरण)
 • अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री
 • कृषी संबंधित सर्व सेवा/दुकाने
 • पशुखादय विक्री

वरील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानं दिवसभर सुरु राहणार नाहीत. ही सर्व दुकांनं संचारबंदीच्या काळात सकाळी 7.00 ते 11.00 केवळ या वेळेत सुरु ठेवता येतील.

याशिवाय पेट्रोल पंपावर खासगी वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सुरु राहिलं. याशिवाय सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/मालवाहतूक यासाठी डिझेल विक्री सुरु राहिल.

हेही वाचा :

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊनसाठी सहकार्य करा : हसन मुश्रीफ

VIDEO: अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गोंधळ

अहमदनगरमध्ये आमदार लंकेंच्या प्रयत्नांना जनतेचीही साथ, मदतीचा ओघ सुरुच, 17 लाख रोख रक्कम, 5 टन धान्य जमा

व्हिडीओ पाहा :

Know all about rules of lockdown in Ahmednagar what is open and what is closed amid corona

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें