
राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली. यातील कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election) निवडणूकही अतिशय चुरशीची ठरली. काल या महापालिकेच्या विविध प्रभागांसाठी मतदान पार पडलं. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, शिवेसना ( ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर सर्वांसाठीच ही निवडणूक अतिशय महत्वाची असून त्याचसाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत करत , सभा गाजवत शहराचा एकन् एक भाग पिंजून काढला. मतदारांचं पारडं आपल्या बाजूने झुकावं यासाठी प्रत्येक जण जीवतोड मेहनत करताना दिसत होता. ही निवडणूक अतिशय रंजक ठरली असून अखेर आज गुलाल कोण उधळणार, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
प्रभाग क्रमांक 6
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
काळ बदलत गेला तसं कोल्हापुराची व्याप्ती वाढत गेली असून शहराचा विकासही प्रचंड झाला असून ते इथपासून तिथपर्यंत असं प्रचंड पसरलेलं आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 6 हा व्यापक असून या परिसरातून महापालिकेत गेलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या कामाने मोठी छाप पाडली आहे. निवडणुका जाहीर होताच या भागात प्रचाराचे घमासान सुरू झालं. सीता कॉलनी, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, पंचगंगा घाट, जुना बुधवार तालीम परिसर, तोरस्कर चौक, गायकवाड पुतळा, केएमसी कॉलेज, दुधाळा ग्राऊंड, धोत्री गल्ली इथपर्यंत याची व्याप्ती आहे.
प्रभाग क्रमांक 7
याच कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 7 हा दाटवाटीचा परिसर असून तो नेहमी गजबजलेला असतो. बुरूड गल्ली, पिवळा वाडा, खोलखंडोबा, सोन्या मारुती चौक, जुना बुधवार पेठ, तेली गल्ली, गवळी गल्ली, महापालिका मुख्य इमारत, शाहू उद्यान, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, गुजरी, कुंभार गल्ली, तटाकडील तालीम, ब्रह्मेश्वर बाग, वांगी बोळ, कपीलतीर्थ मार्केट, बाबूजमाल परिसर, रंकाळा स्टॅंड इथपर्यंत हा परिसर पसरला आहे. इथली एकूण लोकसंख्या 26 हजारांच्या आसपास आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सक्षम व्यवस्था करणे, प्रभागातील उद्यानातील असुविधा दूर करणे यासह अनेक विकासाचे मुद्दे होते.
प्रभाग क्रमांक 8
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मध्ये 27136 मतदार आहेत . त्यापैकी अनुसूचित जातीचे 1400 तर अनुसूचित जमातीचे 93 मतदार आहेत. प्रभाग 8 ची व्याप्ती संध्यामठ पासून ते पवार मळा मिरा बाग पर्यंत आहे. उत्तरेला महानगरपालिकेपासून हा भाग सुरू होऊन पूर्वेला श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरापासून ते मारूती चौकपर्यंत आहे. तर दक्षिणेला चंद्र वसंत संकुल ते गगनबावडा रोडपर्यंत आहे. पश्चिमेला कोल्हापूर डायनिंगच्या पूर्वेकडील मनपा हद्दीने पंचगंगा नदी पात्रापर्यंत हा प्रभाग पसरला आहे. इथून कोण जिंकून येतं, मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
प्रभाग क्रमांक 9
कोल्हापूर महानगरपालिके तील प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 27620 आहे. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये रंकाळा तलाव, साने गुरूजी वसाहत, कणेरकर नगर , बोंद्रे नगर , फुलेवाडी, हरिओम नगर हे परिसर येतात. उत्तरेस फुलेवाडी नाका मनपापासून हद्द सुरू होते ते पूर्वेला रंकाळा टॉवरपासून होळकर स्मारकारपर्यंत व्याप्ती आहे. दक्षिणेला अहिल्यादेवी होळकर स्मारक ते रिंगरोडवरील प्रियंका मेडिकल पर्यंत आणि पश्चिमेला त्या मेडिकलपासून फुलेवाडी नाक्यापर्यंत हाँ प्रभाग पसराल आहे. यावेळी या प्रभागात कोणत्या पक्षाचे नगरसेवक येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक 10
कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहामध्ये लोकसंख्या 17 हजार 340 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे तसेच अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येचाही समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये पंचगंगा हॉस्पिटल खंडोबा मंदिर बुरुड गल्ली शनिवार पेठ पोस्ट ऑफिस महानगरपालिका मुख्य इमारत बाजार गेट गंगावेश धोत्री गल्ली के एम सी कॉलेज पाडळकर मार्केट शाहू उद्यान शुक्रवार गेट पोलीस चौकी या परिसराच्या समावेश होतो.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE