Latur : लातूरातील ‘त्या’ घटनेचे पडसाद सुरुच, आता ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याची मागणी
जिल्ह्यातील ताडमुगळी गावामध्ये एका दलित समाजातील युवकाने मंदिरात प्रवेश केल्याने त्याच्या सबंध कुटुंबियावर गावकऱ्यांनी बहिष्कर टाकल्याची घटना घडली होती. पुरोगामी महाराष्ट्रात अशा स्वरुपाची घटना घडल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात होता. आता या घटनेला 6 दिवस उलटले तरी त्याचे पडसाद हे कायम आहेत.

लातूर : जिल्ह्यातील ताडमुगळी गावामध्ये एका दलित समाजातील युवकाने मंदिरात प्रवेश केल्याने त्याच्या सबंध कुटुंबियावर गावकऱ्यांनी (Boycott) बहिष्कर टाकल्याची घटना घडली होती. पुरोगामी महाराष्ट्रात अशा स्वरुपाची घटना घडल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात होता. आता या घटनेला 6 दिवस उलटले तरी त्याचे पडसाद हे कायम आहेत. (District Administration) प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर हे सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले असले तरी दुसऱ्या दिवशीही त्या संबंधित कुटुंबियांना तशीच वागणूक मिळत असल्याचे गावच्या तरुणांनी सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरण एवढे सहज घेण्यासारखे नसून याची सीआयडी मार्फत चौकशीच करण्याची मागणी आता (RPI) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. या घटनेनंतर नेमके गावातील स्थिती काय आहे याची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात हे गेले होते. दरम्यान, कुटुंबियांवर झालेला अन्याय किती दुर्देवी आहे हे पाहून त्यांनी ही मागणी केली आहे.
6 दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही
दलित समाजातील युवकाने केवळ मंदिरात प्रवेश केल्यामुळे असे कृत्य होत असेल तर हे दुर्देवी आहे. या एका घटनेमुळे संबंधित कुटुंबियांना तीन दिवस वाळीत टाकण्यात आले होते. तरुणाच्या कुटुंबियांना दळणही देण्यास गावकऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रातील ही दुर्देवी घटना आहे. असे असतानाही संबंधित गावकरी हे मोकाट आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी मार्फच चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आश्वासनानंतही गावकऱ्यांचे कृत्य सुरुच
ताडमुगळी गावातील या कृत्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावात जाऊन नेमकी घटना काय आहे हे समजून घेऊन दोन्ही गटामध्ये समजोता घडवून आणला होता. शिवाय यापुढे पुन्हा अशी वागणूक दिली जाणार नसल्याचे आश्वासन गावकऱ्यांनी दिले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांनी संबंधित कुटुंबाना तशाच प्रकारे वागणूक दिली होती. त्यामुळे गावकऱ्यांच्या धोऱणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. आता घटनेला 6 दिवस झाले तरी कारवाई होत नसल्याने सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या :
पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता
Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात
