Latur Election Results 2026 LIVE : या प्रभागात कुणाचा फडकणार झेंडा? काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कोण बाहुबली होणार? एका क्लिकवर जाणून घ्या

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मराठवाड्याची शैक्षणिक राजधानी असलेल्या लातूरमध्ये 8 वर्षानंतर निवडणुकीचे पडघम वाजत आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली होती. त्यापाठोपाठ काँग्रेसने गड राखला होता. यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार?

Latur Election Results 2026 LIVE : या प्रभागात कुणाचा फडकणार झेंडा? काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कोण बाहुबली होणार? एका क्लिकवर जाणून घ्या
लातूर महापालिका निवडणूक निकाल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:25 AM

मराठवाड्यातील शैक्षणिक पंढरी म्हणून लातूर ओळखल्या जाते. लातूर पॅटर्नने शैक्षणिक क्षेत्रात मोठी ओळख निर्माण केली. तर राजकीय पॅटर्न सारखा बदलताना दिसत आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजपने मोठी मुसंडी मारली. तरीही काँग्रेस गड राखून आहे. लातूरमध्ये 8 वर्षानंतर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली होती. 36 जागांवर कमळ फुलले होते. तर 32 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते.तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला होता. यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार? हे आज समोर येईल.

लातूर महानगरपालिकेत चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या 16 इतकी आहे. तर तीन सदस्यांची संख्या 02 इतकी आहे. लातूर शहरासाठी एकूण 18 प्रभाग आहेत. या प्रभागात एकूण 70 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या पालिकेत तिरंगी निवडणूक होणार आहे. तर बंडखोरांसह काही जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये निवडणुकीची चुरस दिसून येत आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 1

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये चार उमेदवार होते. त्यात तीन जागांवर भाजपने बाजी मारली होती. देविदास काळे, समिना शेख आणि शैलेश गोजंगुंडे हे उमेदवार विजयी झाले होते. तर काँग्रेसच्या मीना लोखंडे यांनी खातं उघडलं होतं. यावेळी आता या प्रभागात कोण बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.

प्रभाग 1 मध्ये एकूण लोकसंख्या 20,807 इतकी आहे. यामध्ये व्यंकटेश नगर, वेळंबे नगर, काळे गल्ली, सुळ गल्ली, नांदगाव वेस, पटेल चौक, राम गल्ली, मिस्किनपुरा भाग, सिद्धेश्वर वेस, लाड गल्ली, माळी गल्ली असा मोठा भाग आहे.

प्रभाग क्रमांक 2

प्रभाग क्रमांकमध्ये गेल्यावेळी 2017 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. या प्रभागात चार उमेदवार होते. उषाबाई भाडीकर,सचिन बंदनपाल्ले, हरुबाई बोईंडवाड, इम्रान सय्यद यांनी या प्रभागात विजय मिळवला होता. इतर पक्षांना या प्रभागात खातं उघडता आलं नाही.

प्रभाग क्रमांक 2 ची एकूण लोकसंख्या 23,762 इतकी आहे. या प्रभागात बरकत नगर, हरिभाऊ नगर, वकील कॉलनी, तुळजापुरे नगर, गवळी नगर, कुंभार गल्ली, एसओएस याभागाचा समावेश आहे. सिद्धश्वेर चौक ते संविधान चौक आणि नांदेड रोडपर्यंत ते पुढे दर्गा रोडपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे.

प्रभाग क्रमांक 1विजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 3

प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्यावेळी, 2017 मध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. तर एका जागेवर भाजपचं खातं उघडलं होतं. या प्रभागात वर्षा म्हस्के, सोजर मदने, विजयकुमार साब्दे हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर मंगेश बिरादार यांनी भाजपसाठी खातं उघडलं होतं. यंदा या प्रभागात कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 3 ची एकूण लोकसंख्या 21,525 इतकी आहे. या प्रभागात गरुड चौक, बालाजी नगर, संत गोरोबा सोसायटी, दसरा मैदान, शाहू नगर, ज्ञानेश्वर विद्यालय, महादेव नगर, सम्राट चौक, शाहू चौक, आंबेडकर चौक, विवेकानंद चौक, जुना बाभळगाव पांदण रोड, समाज मंदिर, साठे नगर, आझम चौक, साई मल्टि सर्व्हिसेस याचा समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

लातूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE