AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : गढूळ पाण्याने लातूरचे राजकारण ‘ढवळले’, आता मनपा आयुक्तांनीच काढला मधला ‘मार्ग’

लातूर शहराच्या गल्ली-बोळात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे लातूरला होणाऱ्या पिवळसर पाणीपुरवठ्याची. एक-दोन दिवस नाही तर आता 15 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मात्र, मांजरा धरणातील वरच्या बाजूचे दोन गेट उघडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने पाणी ढवळून निघाले आहे.

Latur : गढूळ पाण्याने लातूरचे राजकारण 'ढवळले', आता मनपा आयुक्तांनीच काढला मधला 'मार्ग'
गढूळ पाणी पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी शहरातील युवकांनी मनपा कार्यालयालवर गाढव मोर्चा काढला होता. आंदोलनातील वेगळेपणाचे दर्शन घडले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 12:36 PM
Share

लातूर : दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा अन् यंदा मुबलक प्रमाणात पाणी असताना गढूळ पाणी पुरवठ्यामुळे (Latur) लातूर चर्चेत कायम आहे. कधी नव्हे ते भर उन्हाळ्यात शहरातील गल्ली-बोळात सुरळीत पाणी पुरवठा होत होता. मात्र, (Impure Water Supply) गढूळ आणि पिवळसर पाण्याने लातुरकरांची तर झोप उडालीच आहे पण मनपा प्रशासनही रात्र-दिवस कामाला लागले आहे. गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने अखेर शहराचा (Water Supply) पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवला आहे. दरम्यानच्या काळात पिवळ्या आणि गढूळ पाण्याचे नेमके कारण काय याचा शोध लागला नाहीतर मात्र, पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्याचे मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी सांगितले आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून ज्या पिवळ्या पाण्याची चर्चा सबंध जिल्ह्यात सुरु आहे त्याचे नेमके कारण आणि त्यावर काय तोडगा काढला जाणार हे पहावे लागणार आहे.

म्हणून गढूळ पाण्याचा पुरवठा

लातूर शहराच्या गल्ली-बोळात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे लातूरला होणाऱ्या पिवळसर पाणीपुरवठ्याची. एक-दोन दिवस नाही तर आता 15 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मात्र, मांजरा धरणातील वरच्या बाजूचे दोन गेट उघडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने पाणी ढवळून निघाले आहे. त्यामुळे अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेऊनही अशीच परस्थिती राहिली तर मात्र, पर्यायी मार्ग अवलंबला जाणार आहे.

गढूळ पाण्याने राजकारण ढवळले

पाणीपुरवठा करण्यात मनपा अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत आता भाजपाने मनपावर पिवळ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन मोर्चा काढला. तर मोर्चमध्ये भाजपाने कशी स्टंटबाजी केली ते कॉंग्रेसने पुन्हा पटवून दिले. आंदोलने मोर्चे अटोपल्यानंतरही गढूळ पाणी लातुरकरांच्या नळाला येत आहे.मागील दोन दिवसांपासून वरील गेट उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मागील 15 वर्षापासून गेट कार्यान्वित नसल्याने अद्याप उघडण्यास यश आले नाही. तसेच क्लोरीन डाय ऑक्साईड केमिकालचा साठा उपलब्ध होणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.

पालिकेवर गाढव मोर्चा

लातूर शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा निषेध करण्यासाठी काही युवकांनी एकत्र येत पालिकेवर गाढव मोर्चा काढला . पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराला गढूळ पिवळसर पाण्याचा पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून होतो आहे. पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या पंधरा दिवसात संपणार असल्याने गढूळ पाण्या बाबत नगरसेवकही गाफील आहेत . प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काही युवकांनी एकत्र येत महात्मा गांधी चौक ते महानगर पालिका असा गाढव मोर्चा काढला . हातात फलक, मी पालकमंत्री असा रंगवेलला तरुण आणि दोन गाढवं यांनी सगळ्यांचं लक्ष वेधले होते .

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.