शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी Tv9 मराठीकडे, कुणाकुणाला उमेदवारी जाहीर होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यानंतर आता शरद पवार गटाची देखील उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या यादीतील 20 संभाव्य उमेदवारांची नावे 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागले आहेत.

शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी Tv9 मराठीकडे, कुणाकुणाला उमेदवारी जाहीर होणार?
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 8:42 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तब्बल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी देखील आज रात्री उशिरा किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 33 उमेदवारांची नावे निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तासगावातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना तिकीट देण्यात येणार आहे. याबाबत उद्या अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा होणार आहे.

विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. तासगावमधून रोहित पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घनसावंगी येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षात मोठी इनकमिंग बघायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचं सध्या पारडं जड आहे. असं असली तरी शरद पवार यांच्या पक्षाते किती उमेदवार जिंकून येणार? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

  1. जयंत पाटील – इस्लामपूर
  2. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
  3. अनिल देशमुख – काटोल
  4. राजेश टोपे – घनसावंगी
  5. बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
  6. रोहित पवार – कर्जत जामखेड
  7. प्राजक्त तनपुरे – राहुरी
  8. रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ
  9. सुनील भुसारा – विक्रमगड
  10. अशोक पवार – शिरुर
  11. मानसिंग नाईक – शिराळा
  12. शशिकांत शिंदे – कोरेगाव
  13. संदीप क्षीरसागर – बीड
  14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
  15. राखी जाधव – घाटकोपर पूर्व
  16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराडा
  17. युगेंद्र पवार – बारामती
  18. समरजित घाटगे – कागल
  19. राणी लंके – पारनेर
  20. रोहिणी खडसे – मुक्ताईनगर

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.