LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

हिंगोलीतून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर

शिवसेना-भाजप युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, हिंगोलीतील कळमनुरीतून संतोष बांगर यांना एबी फॉर्मचं वाटप

29/09/2019,6:00PM
Picture

आदित्य ठाकरे 2 किंवा 3 तारखेला उमेदवारी भरणार

आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता, शक्तिप्रदर्शन करत वरळी मतदारसंघात आदित्य उमेदवारी भरण्याची चिन्हं

29/09/2019,4:07PM
Picture

नितेश राणे काँग्रेसला रामराम ठोकणार

नितेश राणे काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देणार, 1 ऑक्टोबरला मुंबईत राजीनामा, नारायण राणे यांच्या जोडीने गांधी जयंतीच्या मुहूर्तावर भाजपप्रवेशाची चिन्हं

29/09/2019,3:00PM
Picture

राणे 2 ऑक्टोबरला भाजपात

नारायण राणे मुंबईत 2 ऑक्टोबरला भाजपप्रवेश करणार, सूत्रांची माहिती

29/09/2019,2:06PM
Picture

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, वाणिज्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

29/09/2019,2:04PM
Picture

धनंजय मुंडेंच्या घरी आघाडीची बैठक

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर आघाडीची बैठक, विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा, अजित पवार, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रवी राणा उपस्थित

29/09/2019,10:34AM
Picture

पुण्यात वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

पुण्यात वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून तब्बल पाच लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामेश्वर देशमुख आणि विजय जगताप असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

29/09/2019,9:35AM
Picture

वाशिममध्ये पतिने केली पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना वाशिम येथील चोरद येथे घडली. शोभा विठ्ठल झाटे, असं या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. आरोपी पती विठ्ठल किसन झाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

29/09/2019,9:32AM
Picture

सांगलीत 18 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

सांगलीत 18 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोघांना अटक केली आहे. स्टँड रोड वरील एका पडक्या घरात बेकायदेशीरपणे विदेशी मद्याचा साठा केला होता. अवधूत टेरसंग आणि संजय टाकवडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

29/09/2019,9:25AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *