LIVE : भाजपकडून घटक पक्षांना 18 ऐवजी फक्त 12 जागा

LIVE : भाजपकडून घटक पक्षांना 18 ऐवजी फक्त 12 जागा
Picture

आता राणे पर्व नाही तर भाजपच्या पर्वला सुरुवात : नारायण राणे

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात आता राणे पर्व नाही तर भाजपच्या पर्वला सुरुवात, नितेश राणेचा भाजप प्रवेशानंतर नारायण राणेंचा सूर बदलला, लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार, खासदार नारायण राणेंची माहिती, कणकवलीतील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत स्वाभिमान पक्ष विलीन होणार, महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युती अभेद्य

04/10/2019,2:38PM
Picture

शिर्डी विधानसभेचा काँग्रेसचा उमेदवार ठरला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत पुतणे सुरेश थोरात रिंगणात, विखे विरोधात थोरात अशी चुरशीची लढत, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत अर्ज दाखल, शिर्डी विधानसभेसाठी डॉ. सुधीर तांबे , डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नावांची होती चर्चा,

04/10/2019,2:30PM
Picture

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी, नरेंद्र मेहतांकडून उमेदवारी अर्ज दाखल,

04/10/2019,2:20PM
Picture

भाजपकडून घटक पक्षांना 18 ऐवजी फक्त 12 जागा

भाजपकडून घटक पक्षांना 18 ऐवजी फक्त 12 जागा, भाजपचे 152 उमेदवार रिंगणात, घटकपक्षाने कामळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपची इच्छा

04/10/2019,2:02PM
Picture

पालघर विधानसभेत महाआघाडीत बिघाडी, काँग्रेसने घोषणा केलेले योगेश नम यांचा अर्ज दाखल

एकीकडे काँग्रेसचे अधिकृत घोषणा केलेले उमेदवार योगेश नम उमेदवारी अर्ज दखल करणार, तर दुसरीकडे सेनेकड़ून उमेदवारी न मिळालेले विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे आयात केलेले अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल, महाआघाडीच्या दोन्ही घटक पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निर्माण संभ्रम, मात्र मीच अधिकृत उमेदवार असल्याचे योगेश नम यांचा ठोस दावा

04/10/2019,1:52PM
Picture

गोपीचंद पडळकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीत दाखल

बारामती : गोपीचंद पडळकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवनात दाखल, महायुतीतील प्रमुख नेत्यांसमवेत दाखल करणार उमेदवारी अर्ज

04/10/2019,1:47PM
Picture

राधाकृष्ण विखेंनी भाजपच्या वतीने दाखल केला उमेदवारी

राधाकृष्ण विखेंनी भाजपच्या वतीने शिर्डी मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून विखेंच्या विरोधात अद्याप उमेदवार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या जिल्ह्यात काँग्रेसचा शिर्डीतील उमेदवार अद्याप जाहीर नाही

04/10/2019,1:46PM
Picture

वसईत शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या विजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वसई : शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या विजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, वसई चिमाजी अप्पा मैदान, पार नाका, झेंडाबाजार, करीत वसईच्या निवडणूक कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन रॅली काढली, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून विजय पाटील मैदानात, वसई विधानसभेत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता

04/10/2019,1:18PM
Picture

मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव : एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसेंना भाजपकडून तिकीट, मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

04/10/2019,1:13PM
Picture

मी छत्रपतींच्या वंशजांना आव्हान देऊ शकतो, तर आदित्य माझ्यासमोर कोण : अभिजित बिचुकले

आदित्य माझ्यासाठी युवराज नाही, मी जर छत्रपतींच्या १३ व्या वंशजना आव्हान देऊ शकतो तर माझ्यासमोर आदित्य कोण, बिग बॉस अभिजित बिचुकलेंची टीका, आदित्यकडे पैसा आहे पण माझ्याकडे लोकांचं प्रेम आहे, मुंबईकरांनी मला खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे मला त्यांची सेवा करायची आहे.

04/10/2019,1:10PM
Picture

भाजपा बंडखोर उमेदवार संतोष शेट्टी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

भिवंडीतील भाजपा बंडखोर उमेदवार संतोष शेट्टी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

04/10/2019,1:08PM
Picture

भाजपकडून मंगेश चव्हाण आणि मनसेकडून राकेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चाळीसगाव :- भारतीय जनता पार्टीकडून मंगेश चव्हाण, आणि मनसे कडून राकेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

04/10/2019,1:04PM
Picture

भाजपा कार्यकर्त्याचा रास्ता रोको, रमेश कराड यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त

लातूर : भाजपा कार्यकर्त्याचा रास्ता रोको, रमेश कराड यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त, लातूर ग्रामीण मतदार संघ शिवसेनेला दिल्याने रेणापूर इथं रास्ता रोको, वाहतूक खोळंबली

04/10/2019,1:03PM
Picture

शिवसेनेला जागा सोडल्यानं भाजपचा इच्छुक उमेदवार मनसेत, शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

अंबरनाथ मतदारसंघातून मनसेच्या सुमेध भवार यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अंबरनाथची जागा युतीत शिवसेनेला सुटल्याने भाजपकडून इच्छुक असलेले भवार मनसेत आले. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी भवार यांनी मोठी मिरवणूक काढली. अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार निष्क्रिय असून संपूर्ण अंबरनाथ खड्ड्यात गेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आता लोक परिवर्तन घडवतील, असा विश्वास यावेळी भवार यांनी व्यक्त केला.

04/10/2019,12:58PM
Picture

विनोद तावडे यांची उमेदवारी डावलल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक

बोरिवली मतदारसंघात विनोद तावडे यांची उमेदवारी डावलल्यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्ते आक्रमक, इथून विनोद तावडेच हवे अन्यथा राजीनामा देऊ असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला, कार्यकर्त्यांचा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऑफिसला घेराव घातला

04/10/2019,12:39PM
Picture

वांद्रे पूर्वेतून शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा तिकीट नाकारलं असल्यामुळे वांद्रे पूर्वेच्या शिवसेना आमदार तृप्ती सावंत बंडखोरी करणार, आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, तृप्ती सावंत यांच्याजागी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्वेतून संधी,

04/10/2019,12:14PM
Picture

शिवसेना आमदार विजयराज शिंदेंचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

शिवसेने तिकीट नाकारल्याने माजी आमदार विजयराज शिंदे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश, प्रेदशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत प्रवेश, वंचितकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, शिंदे बुलडाणा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत.

04/10/2019,12:10PM
Picture

रिझर्व बँकेकडून रेपो रेट दरात घट

रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो रेट दरात घट करण्यात आली आहे. त्यामुळे ईएमआय कमी होऊ शकतात, रेपो रेट दरात 25 बेसिस पॉईंट कमी, सलग पाचव्यांदा आरबीआयकडून रेपो रेट दरात घट

04/10/2019,12:05PM
Picture

राष्ट्रवादीने पिंपरीतील उमेदवार बदलला

राष्ट्रवादीने काल (3 सप्टेंबर) दुसरी यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी पिंपरीतील उमेदवार घोषित केला होता. मात्र राष्ट्रवादीकडून पुन्हा अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली

04/10/2019,11:39AM
Picture

गुहागर भाजप तालुका अध्यक्षांचा राजीनामा

गुहागर भाजप तालुका अध्यक्ष सुरेश सावंत यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सुरेश सावंत हे गुहागर पंचायत समितीचे माजी उपसभापती, गुहागरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे सावंत नाराज

04/10/2019,11:35AM
Picture

कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार, राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते अपक्ष लढणार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला मोठी खिंडार, राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष फॉर्म भरणार, राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने घेतला निर्णय, राजेंद्र पाटील-यड्रावकर समर्थकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली

04/10/2019,11:30AM
Picture

बारामतीत अजित पवारांचं औक्षण

बारामती : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवार यांचं औक्षण, पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं औक्षण, सहयोग या निवासस्थानी अजित पवार यांचं औक्षण

04/10/2019,11:16AM
Picture

अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीन गडकरींच्या भेटीला

04/10/2019,10:41AM
Picture

भव्य शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांसह 5 उमेदवार अर्ज दाखल करणार

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपुरातील पाच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, नागपुरात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शनाची तयारी, संविधान चौकातून भव्य रॅलीही काढली जाणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

04/10/2019,10:38AM
Picture

शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पालघर विधानसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार अमित घोडा यांना तिकीट न मिळाल्याने घोडा यांची बंडखोरी, अमित घोडा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला मोठा धक्का, शक्तीप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज

04/10/2019,10:34AM
Picture

आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ

आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, आमदार अब्दुल यांना पराभूत करण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले, काँग्रेसने सत्तारांच्या विरोधात उमेदवार बदलून दिला मुस्लिम चेहरा, प्रभाकर पलोदकर यांचे तिकीट कापून खैसर आझाद यांना उमेदवारी, भाजप बंडखोरांच्या पाठिंब्यावर पलोदकर लढणार अपक्ष, भाजप बंडखोरांचा अपक्ष प्रभाकर पलोदकरांना जाहीर पाठिंबा, सिल्लोडच्या राजकारणाला रंजक वळण, अब्दुल सत्तार यांच्या पराभवासाठी भाजप बंडखोर आणि काँग्रेस पुरवणार रसद, अब्दुल सत्तार यांच्यासह तिन्ही उमेदवार आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

04/10/2019,10:29AM
Picture

भाजपने तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे आपली भूमिका मांडणार,

भाजपने तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे आपली भूमिका मांडणार, आज सकाळी भाजप प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधणार

04/10/2019,10:27AM
Picture

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

04/10/2019,10:26AM
Picture

भाजपची चौथी यादी जाहीर, विनोद तावडे, प्रकाश मेहतांचं तिकीट कापलं

04/10/2019,9:10AM
Picture

बारामती मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती मतदारसंघातून आज अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, 10 वाजता कसब्यातून रॅलीला सुरुवात होणार, दुपारी अडीच वाजता कण्हेरी मंदिराजवळ सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार, तसेच भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकरही आज अर्ज दाखल करणार

04/10/2019,8:56AM
Picture

ठाणे, कळव्यातून दिग्गज उमेदवार अर्ज दाखल करणार

ठाणे येथून कोपरी पाचपाखडी येथून एकनाथ शिंदे, ठाणे शहरमधून राष्ट्रवादीचे सुहास देसाई आणि मनसेचे अविनाश जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार, कळवा-मुंब्रातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दीपाली सय्यद उमेदवारी अर्ज दाखल करणार

04/10/2019,8:31AM
Picture

MCA निवडणुकीसाठी मतदान सुरु

MCA निवडणुकीत मतदान करण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दाखल, वानखेडे स्टेडियममधील MCA लाऊंज येथे मतदानास सुरुवात

04/10/2019,8:26AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *