LIVE नागपूरच्या खड्डयांची हायकोर्टाकडून दखल, पालिका आणि पोलीस आयुक्तांना नोटीस

LIVE नागपूरच्या खड्डयांची हायकोर्टाकडून दखल, पालिका आणि पोलीस आयुक्तांना नोटीस
Picture

मंत्रालयात पुुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न, दिव्यांगाच्या संबंधित संस्थेचे आंदोलन, दोन आंदोलकांच्या आत्महत्येचा प्रयत्न, सरंक्षक जाळीमुळे आंदोलक बचावले

18/09/2019,5:57PM
Picture

नागपूरच्या खड्डयांची हायकोर्टाकडून दखल, पालिका आणि पोलीस आयुक्तांना नोटीस

नागपुरातील जीवघेण्या खड्ड्यांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल, उच्च न्यायालयाने स्वतः याचिका दाखल करुन घेतली. नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना बजावली नोटीस. दोन्ही आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांबाबत काय केलं? न्यायालयाने विचारला परखड सवाल. नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. ‘टीव्ही ९ मराठी’ने नागपूरातील जीवघेण्या खड्ड्यांची दाखवली होती वास्तविकता

18/09/2019,11:28AM
Picture

राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा, महिनाभरात 15 जणांचा मृत्यू

पुणे : राज्यात स्वाईन फ्लूचा पुन्हा एकदा विळखा, राज्यात एका महिन्यात 15 जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू, तर नऊ महिन्यात स्वाईन फ्ल्यूने घेतला २१२ जणांचा बळी, सर्वाधिक नाशिकमध्ये ३३ जणांचा मृत्यू, नऊ महिन्यात राज्यात २२०७ रुग्णांची नोंद, राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, १ जानेवारी ते १८ सप्टेंबर दरम्यान २१ लाख १८ हजार स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती.

18/09/2019,10:39AM
Picture

नाशिक - मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर अनेकांची धरपकड

नाशिक – महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 125 आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा.र रात्री उशिरापर्यंत 15 आंदोलक स्थानबद्ध. राजकीय आणी सामाजिक संघटना कार्यकर्ते, परिवर्तनवादी संघटना, आप युवा आघाडी,प्रहार जनशक्ती, छात्रभारती संघटनांनी गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा घेतला निर्णय. गुन्हे शाखेनं कारवाई केल्याची माहिती

18/09/2019,10:47AM
Picture

नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो

नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय. या तलावाच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय. हे दृष्य पाहण्यासाठी नागपूरकर गर्दी करू लागले आहेत. नागपूरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरलाय.

18/09/2019,10:43AM
Picture

नारायण राणे यांचा आजपासून सिंधुदुर्ग संपर्क दौरा

भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री-खासदार नारायण राणे यांचा आजपासून सिंधुदुर्ग संपर्क दौरा. आज आणि उद्या दोन दिवस सिंधुदुर्गवासीयांच्या आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार. जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. भाजपप्रवेशाआधी सिंधुदुर्गात नारायण राणेँची चाचपणी. दोन दिवस कुडाळ आणि सावंतवाडीतील कार्यकर्त्यांशी राणेंचा संवाद. महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची राणे यांनी बोलावली महत्वाची बैठक. बैठकीत राणे पदाधिकारी-कार्यकर्त्याना पुढील राजकीय वाटचलीबाबत मार्गदर्शन करणार. महाजनादेश यात्रेच्या निमिताने काल सिंधुदुर्गात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नारायण राणे यांनी केलं होतं स्वागत.

18/09/2019,10:36AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *