Lok sabha Election 2024 : आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. नागपुरातही आज मतदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदानकेंद्रात घेऊन जाताना दिसत आहेत.

Lok sabha Election 2024 : आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 2:16 PM

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. नागपुरातही आज मतदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदानकेंद्रात घेऊन जाताना दिसत आहेत. फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलाय, पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानच फडणीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचारसभा व्हावी अशी महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. फडणवीसांच्या १०० हुन अधिक सभा होणार आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले. त्यांनी मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी.

राजकीय जीवनात काम करत असताना राजकीय नेत्यांना घर आणि कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही अशी तक्रार अनेकदा कुटुंबियांकडून होत असते. परंतु फडणवीसांनी एक वेगळं उदाहरण घालून दिल्याचं बोललं जातंय. मतदानकेंद्रात जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आई आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी त्यांचा हात धरला होता. आधार देत ते आईला मतदानकक्षापर्यंत घेऊन गेले. आईने मतदानाचा हक्क बजावला यातून फडणवीसांनी पक्षासाठीची निष्ठा आणि आईसोबतचं प्रेमळ नातं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दाखल दिला अशी चर्चा सर्वत्र आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.