AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझ्यावर अन्याय झाला, अशा शब्दात मोठी खंत व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
| Updated on: Nov 22, 2024 | 2:44 PM
Share

Maharashtra Assembly Election 2024 Results : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. यामुळे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझ्यावर अन्याय झाला, अशा शब्दात मोठी खंत व्यक्त केली.

मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सचिन शिंदेंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते. सचिन शिंदे हे माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते. निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला पडलेल्या खिंडारामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.

“मला योग्य तो न्याय मिळाला नाही” – सचिन शिंदे

या पक्षप्रवेशानंतर सचिन शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले. मी गेल्या 20 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी पक्षवाढीसाठी काम केलं. पण मला योग्य तो न्याय मिळाला नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटलो. मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत, असे सचिन शिंदे म्हणाले.

“तुमच्यावर अन्याय होणार नाही” – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी भाष्य केले. उद्या निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे. सचिन जी तुमचं स्वागत आहे. तुम्ही व्यथा मांडलीत मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्यावर अन्याय होणार नाही. आपण उद्याची वाट बघतोय. काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता बर झालं असतं. घोटाळेबाजांच काय करणार ते केंद्र सरकार बघेल. नोटांचा बॉम्ब वसई विरारला फुटला ते सर्वांनी पाहिलं. सचिन जी तुमच्या मनात जे काही करायचंय ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.