AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोरी करणं भोवलं, 40 नेत्यांची भाजपमधून तडकाफडकी हकालपट्टी

महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बंडखोरी करणं भोवलं, 40 नेत्यांची भाजपमधून तडकाफडकी हकालपट्टी
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Nov 06, 2024 | 10:46 AM
Share

BJP Suspend 40 workers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसह महाविकासाआघाडीत बंडखोरी पाहायला मिळाली. महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.

कुणावर कारवाई ?

  • धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
  • जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
  • अकोट – गजानन महाले
  • वाशिम – नागेश घोपे
  • बडनेरा – तुषार भारतीय
  • अमरावती – जगतीश गुप्ता
  • अचलपूर – प्रमोद गडरेल
  • साकोली – सोमदत्त करंजेकर
  • आमगाव – शंकर मडावी
  • चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
  • ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
  • अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
  • नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
  • घणसांवगी – सतीश घाटगे
  • जालना – अशोक पांगारकर
  • गंगापूर – सुरेश सोनवणे
  • वैजापूर – एकनात जाधव
  • मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
  • बागलान – आकाश साळुंखे
  • बागलान – जयश्री गरुड
  • नालासोपारा – हरिष भगत
  • भिवंडी – स्नेहा पाटील
  • कल्याण – वरुण पाटील
  • मागाठणे – गोपाळ जव्हेरी
  • जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
  • अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
  • नेवासा – बाळासाहेब मरकुटे
  • सोलापूर – शोभा बनशेट्टी
  • अक्कलकोट – सुनिल बंडकर
  • श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
  • सावंतवाडी – विशाल परब

एकनाथ शिंदे-अजित पवार बंडखोरांवर कारवाई करणार का?

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. बंडखोरी करणाऱ्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार तब्बल ४० जणांवर निलंबित करण्यात आले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरांवर अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार बंडखोरावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.