AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल बोर्डाची मोठी माहिती, संभाव्य तारीख समोर

सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालांचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल बोर्डाची मोठी माहिती, संभाव्य तारीख समोर
| Updated on: May 05, 2025 | 1:23 PM
Share

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही धाकधूक पाहायला मिळत आहे. आता नुकतंच दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल येत्या १५ मे पर्यंत तर बारावीचा निकाल साधारणपणे ५ ते १० मे या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालांचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

यंदा परीक्षा लवकर

यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या बारावीची परीक्षा झाली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडली. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता सध्या उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. या पडताळणीनंतर गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी काही वेबसाईट बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.

निकाल कुठे पाहाल?

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

निकाल कसा चेक कराल?

  • सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
  • होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.