LIVE | जळगावमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या 14 जणांना अटक, 6 लाख किंमतीचा ऐवज जप्त

| Updated on: Apr 29, 2021 | 11:37 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | जळगावमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या 14 जणांना अटक, 6 लाख किंमतीचा ऐवज जप्त
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2021 11:37 PM (IST)

    काँग्रेस उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे मु्ख्यमंत्र्यांना पत्र

    रायगड: राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेमध्ये माणगाव येथील पोस्को स्टील गेट समोर झालेल्या हाणामारीवरुन काँग्रेस उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची केली मागणी. काही दिवसांपूर्वी पोस्को स्टील गेट समोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. दोन्ही पक्षांच्या वादामुळे राज्यातील सर्वात मोठी स्टील उत्पादक बहुराष्ट्रीय कपंनी बंद झाल्यास शेकडो स्थानिकांना रोजगार गमवावा लागेल. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानां मारहाण होऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंसह इतर मत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. माणिकराव जगताप यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन नेत्यांचा ठेकेदारीमुळे कंपनी बंद होऊन शेकडो स्थानिकांचा रोजगार बुडण्याची भिती व्यक्त केली.

  • 29 Apr 2021 08:47 PM (IST)

    ठाण्यात गॅरेजला भीषण आग, दोन दुचाकी जळून खाक

    ठाण्यातील डॉ. आंबेडकर रोड येथील विजय मोटर्स या गॅरेजला लागली भीषण आग, आगीत गॅरेज शेजारी असलेली दोन दुकान देखील जळून खाक, घटनास्थळी 1 अग्निशमन दलाची गाडी, 1 वॉटर टँकर, महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि राबोडी पोलीस दाखल, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला यश, आगीच कारण अस्पष्ट

  • 29 Apr 2021 04:48 PM (IST)

    सांगली शहारात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

    सांगली : शहारात जोरदार पाऊस सुरू

    दिवसभर ऊन होते मात्र अचानक पाऊस

    उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा

    विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस सुरू

  • 29 Apr 2021 04:47 PM (IST)

    सोलापूरमध्ये अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

    सोलापूर - अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

    सकाळपासूनच होते ढगाळ वातावरण

    शहरात पावसाच्या हलक्या सरी

  • 29 Apr 2021 01:56 PM (IST)

    अकोल्यात भाजी बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    अकोला जिल्हात सकाळी 7 ते 11 पर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी मार्केटला मुभा दिली आहे.

    आज सकाळी मार्केट उघडताच भाजी बाजारात भाजी घेण्यासाठी उसळली गर्दी,

    सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेकांच्या तोंडाला मास्क नाही

    यावरुन अकोलाकरांनी कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र

  • 29 Apr 2021 12:02 PM (IST)

    डोंबिवली मोठा गाव ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद होणार, शिवसेना नगरसेवकाची माहिती 

    दिवा वसई रेल्वे मार्गावर असलेल्या डोंबिवली मोठा गाव ठाकूर्ली रेल्वे फाटक बंद होणार आहे. त्याठिकाणी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. हा पूल मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल आणि रिंग रोड याला जोडला जाणार आहे. त्यामुळे या परिसराचा विकास होणार आहे अशी माहिती शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे. यासाठी म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने राज्य सरकारने या कामाला नुकतीच मंजूरी दिली आहे.

  • 29 Apr 2021 11:19 AM (IST)

    चंद्रपुरात दोन मोठ्या अस्वलींसह दोन पिल्लांचा विहिरीत पडून मृत्यू

    चंद्रपूर : दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी

    ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वढोली गावातील घटना,

    वढोली येथील शेतशिवारात ही विहीर आहे.

    रात्रीच्या सुमारास अस्वलांचं हे कुटुंब या विहिरीत पडलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

    आज सकाळी शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य नजरेस पडलं.

    भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात फिरत असताना ही घटना घडल्याची शक्यता,

    वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 29 Apr 2021 11:18 AM (IST)

    एक वर्षाचे मानधन सीएम रिलीफ फंडात देणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

    बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

    - लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. - आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणाराय - मी एक वर्षाचे मानधन सीएम रिलीफ फंडात देत आहे - आमच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे मानधनही देत आहोत - महाराष्ट्र काँग्रेसतर्फे आम्ही ५ लाख देत आहोत - इतरांनीही पुढाकार घ्यावा - आपण सक्षम आहोत, त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, असे अभियान जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील राबवत आहेत - आमच्या अमृत उद्योगाचे ५ हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही सीएम रिलीफ फंडात देणार आहोत

  • 29 Apr 2021 11:07 AM (IST)

    चंद्रपुरात दोन मोठ्या अस्वलींसह त्यांच्या दोन पिल्लांचा कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू

    चंद्रपूर :

    चंद्रपुरात दोन मोठ्या अस्वलींसह त्यांच्या दोन पिल्लांचा कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू

    ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वढोली गावातील घटना

    वढोली येथील शेतशिवारात ही विहीर आहे

    रात्रीच्या सुमारास अस्वलांचं हे कुटुंब या विहिरीत पडलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जातेय

    आज सकाळी शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य नजरेस पडलं

    भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात फिरत असताना ही घटना घडल्याची शक्यता

    वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

  • 29 Apr 2021 09:36 AM (IST)

    वडिलांच्या दुसऱ्या लग्नावरुन वाद, जन्मदात्या पित्याकडून मुलाची हत्या

    सातारा- फलटण मध्ये वडिलांकडून मुलाचा खून

    वडिलांनी दुसरे लग्न केल्याने झालेल्या वादात वडिलांनी केला मुलाचा खुन

    सुरज सिकंदर भोसले असे मृत व्यक्तीचे नाव

    सिकंदर उर्फ डिसमुख भोसले संशयित पोलिसांच्या ताब्यात

    फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील घटना

  • 29 Apr 2021 08:32 AM (IST)

    मनसुख हिरेन हत्या प्रकरण : अटकेत असलेल्या सुनील मानेंना स्फोटक प्रकरणाची पूर्ण कल्पना, NIA चा दावा

    मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील मानेंना स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होता असा NIA चा दावा..

    सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप NIA च्या हाती लागलाय जो प्रियदर्शनी पार्क चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे.

    हा मॅपचा रुट तोच आहे ज्या मार्गावरून 24 तारखेला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटेलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती..

    मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मानेने महत्वाची भूमिका निभावली आहे त्याचे अनेक पुरावे NIA च्या हाती लागलेत मात्र स्फोटके प्रकरणातही सुनील माने याचा सहभाग आढळतोय का याचा तपास NIA कडून सुरू आहे..

    मनसुखच्या हत्येदिवशी सुनील माने ठाण्यात होता त्याने त्याचा फोन एका बॅगमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावं..

    सुनील माने यानेच तावडे बनून मनसुखला फोन बोलावून घेतलं आणि वाझे आणि माने एकत्र त्याला भेटले.

    मनसुखला भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला आणि मनसुखला दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केलं ज्यामध्ये विनायक शिंदे होता त्यांनीच त्याची हत्या केली असा अंदाज आहे..

    त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरू केला जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखच शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळाव आणि तपासाची दिशा भरकटली जावी...

    सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास NIA कडून सध्या केला जातोय..

    एटीएस या प्रकरणात तपास करत असतानाच सुनील मानेला मनसुख हत्या प्रकरणात अटक करणार होती अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय मात्र त्यापूर्वीच तपास NIA कडे सोपवण्याचे आले होते आदेश...

  • 29 Apr 2021 08:31 AM (IST)

    पेंच व्याघ्र प्रकल्पात 2 वर्षे वयाचा मादी बिबट मृत अवस्थेत आढळला

    नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 515 मध्ये 2 वर्षे वयाचा मादी बिबट मृत अवस्थेत आढळली

    - जंगल गस्ती करत असताना वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली.

    - घटनेची माहिती कळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पाठक, सहायक वनसंरक्षक किरण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड घटनास्थळी दाखल

    - मृत मादी बिबट हा साधारणत दोन वर्षे वयाचा असून त्याच्या शरीरावरील झटापटीच्या खुणा आढळून आल्या आहेत

    हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बिबट मृत झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

  • 29 Apr 2021 08:29 AM (IST)

    पालघरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, तर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण

    पालघर -

    पालघरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, तर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण

    विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

    हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार पालघरमध्येही पावसाच्या सरी

    विटउत्पादक, बागायतदारांचं मात्र मोठं नुकसान

  • 29 Apr 2021 08:28 AM (IST)

    अकोल्यातील पोलीस अधिकारी बी. आर. घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी गुन्हा

    अकोल्यातील पोलीस अधिकारी बी. आर. घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी अकोल्यात गुन्हा दाखल

    अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमवीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल..

    अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची पोलीस अधिक्षकांची माहिती...

    पीआय भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय शिवाय काही अधिकारी त्यांना मदत करत होते असही पत्रात म्हटलं होतं...

    ठाण्याचे आयुक्त असताना परमबीर यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असे गंभीर आरोप घाडगे यांनी पत्रात केले होते...

    घाडगे यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महसंचालकांना दिलेल होत त्यात आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे..

  • 29 Apr 2021 08:27 AM (IST)

    मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी

    पालघर

    मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी

    तर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण

    विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

    हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार पालघरमध्ये ही पावसाच्या सरी

    वीट उत्पादक,बागायतदारांचं मात्र मोठं नुकसान

  • 29 Apr 2021 07:41 AM (IST)

    ट्रू जेटकडून नाशिक अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत

    नाशिक -

    ट्रू जेटकडून नाशिक अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत

    1 मे पासून पूर्ववत होणार विमानसेवा

    कोरोना संसर्ग वाढल्यानंतर प्रवाशी संख्या घातल्याने विमानसेवा होती बंद

    मात्र या कठीण काळात विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशाना दिलासा

    आठवड्यातून बुधवार वगळता दररोज असणार विमानसेवा

  • 29 Apr 2021 07:23 AM (IST)

    RFO दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

    मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरात ही कारवाई केली आहे.

  • 29 Apr 2021 07:22 AM (IST)

    आळंदीमधील इंद्रायणी नदीत पुन्हा रसायन मिश्रित पाणी मिसळल्यामुळे फेसळली नदी

    आळंदी -

    - आळंदीमधील इंद्रायणी नदीत पुन्हा रसायन मिश्रित पाणी मिसळल्यामुळे फेसळली नदी

    -नदी प्रदूषणत वाढ,भाविकांमध्ये नाराजीचा सूर

    -पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधून रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदी फेसाळली

  • 29 Apr 2021 06:46 AM (IST)

    पुण्यात आज फक्त नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण करण्यात येणार असल्याची महापालिकेची घोषणा

    पुणे -

    पुण्यात आज फक्त नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण करण्यात येणार असल्याची महापालिकेची घोषणा

    फक्त महापालिकेच्याच केंद्रावर लसीकरण सुरु राहणार

    पुणे महापालिकेसा लसींचा फक्त २५००० डोसचा साठा आल्या मुळे घेण्यात आला हा निर्णय घेण्यात

    लसींअभावी पुणे शहरात लसीकरण बंद ठेवण्याची वेळ

    त्यानंतर आज महापालिकेला फक्त २५००० डोस मिळाले

    त्यामुळे खासगी दवाखान्यांना लस न देण्याचा महापालिकेचा निर्णय

    ज्यांची ॲानलाईन नोंदणी आहे त्यांनाच लसीकरण करण्यात येणार

    दुसरा डोस असणाऱ्यांनाही प्राधान्य तर वॉक ईन लसीकरण बंद ठेवण्यात येणार

  • 29 Apr 2021 06:46 AM (IST)

    वेश्या व्यवसाय करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 5 हजार 296 या महिलांच्या बँक खात्यावर सुमारे सात कोटी 95 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

    पुणे :

    वेश्या व्यवसाय करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 5 हजार 296 या महिलांच्या बँक खात्यावर सुमारे सात कोटी 95 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

    जिल्हा प्रशासनाकडून दोन टप्प्यांत वितरीत करण्यात आली रक्कम

    वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना प्रतिमहा पाच हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात त्या महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपये वितरीत करण्यात आले

  • 29 Apr 2021 06:41 AM (IST)

    अकोला जिल्हातल्या आपातापा येथे घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक

    अकोला -

    अकोला जिल्हातल्या आपातापा येथे घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक

    1 ते दीड लाख रुपयांचे नुकसान

    वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली

  • 29 Apr 2021 06:40 AM (IST)

    शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे गावात घराला भीषण आग

    शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे गावात घराला भीषण आग

    गॅस सिलिंडर स्फोट झाल्यानें घर जाळून खाक

    सुदैवाने जीवित हानी नाही

    घटना स्थळी पोलीस पोहोचले

    तहसीलदार,अग्निशमन दलाचे 2 बंब घटना स्थळी दाखल

    आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

Published On - Apr 29,2021 11:37 PM

Follow us
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.