Maharashtra News LIVE Update | दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच : राजेश टोपे

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच : राजेश टोपे
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 Aug 2021 18:36 PM (IST)

  सर्व दुकानं 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

  एका सत्रात २५ टक्के कर्मचारी हजर ठेवू शकतात

  सर्व दुकानं १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

  सिनेमा आणि मल्टिप्लेक्स, नाट्यगृह तुर्तास तरी बंदच राहणार

  धार्मिक स्थळेही बंदच राहणार

  इनडोअर खेळांना मान्यता पण दोन डोस अनिवार्य

  खासगी कार्यालये 24 तास चालू ठेवण्याची मुभा

  राजेश टोपे यांची माहिती

 • 11 Aug 2021 18:34 PM (IST)

  दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच : राजेश टोपे

  मुंबई : राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधत आहेत.

  दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश

  इनडोअर स्पोर्टमध्ये खेळाडू तसेच प्रशिक्षकांनी दोन डोस घेतलेले असतील तर अशा इनडोअर गेम्सना परवानगी देण्यात आली आहे.

  सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच असतील.

 • 11 Aug 2021 18:23 PM (IST)

  अनाथ मुलांसाठी आरक्षण, महिलांसाठी मुंबईत 4 तर उपनगरात 6 वसतीगृह, राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

  महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील निर्णयांची घोषणा केली.

  यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

  2018 मध्ये सरकारने अनाथ मुलांना एक टक्के आरक्षण दिले होते. पण त्याबाबतच्या जीआरमध्ये काही चुका होत्या. त्यामुळे अनेक मुलांना आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे अ, ब, क असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. अ म्हणजे अनात मुलं आहेत. ब मध्ये त्यांचे आई-वडील नाहीत. पण त्यांचे नातेवाईक त्यांना बालगृहात भेटायाला आले आहेत. तर क गटात त्यांचे जे मुलं नातेवाईकांसोबत बालगृहात राहीले आहेत. आजच्या या निकालामुळे 2018 पासूनच्या परीक्षा दिलेल्या सगळ्यांना 1 टक्के आरक्षण मिळेल.

  दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकार महिला वसतीगृह सुरु करत होतो. आता राज्य सरकारचा वसतीगृहात सहभाग असणार आहे. सामाजिक संस्था २५ टक्के राज्यचा १५ तर केंद्र सरकारचा ६० सहभाग राहील. एकूण ५० वर्किंग वूमेन वसतीगृह बांधण्याचा विचार आहे. मुंबईत ४, उपनगरात ६ तर ठाण्यात ४ वसतीगृह बांधत आहोत. महिलांना भाड्यासाठी पैसे दिले जातील. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल असेल.

 • 11 Aug 2021 18:13 PM (IST)

  राज्यसभेत 127वं घटनादुरुस्ती विधेयक पास

  राज्यसभेत 127वं घटनादुरुस्ती विधेयक पारित, त्यामुळे आता राज्यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेता येणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत पास झालं होतं. त्यानंतर आज राज्यसभेतही पास झालं आहे.

 • 11 Aug 2021 18:03 PM (IST)

  राज्यातील हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

  राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हॉटेल सुरु ठेवण्याचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. यासाठी अनेक व्यावसायिकांनी आंदोलन देखील केले होते. हॉटेल व्यावसायिकांच्या या मागणीवर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार आता राज्यातील सर्व हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील

 • 11 Aug 2021 17:57 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 259 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 259 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 256  रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 12 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 7

  – 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 489506

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2049

  – एकूण मृत्यू -8828

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 478629

 • 11 Aug 2021 17:52 PM (IST)

  सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा‌ अभ्यास करण्यासाठी समिती, राज्य सरकारचा निर्णय

  मुंबई : सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा‌ अभ्यास करण्यासाठी समिती

  राज्य सरकारचा निर्णय

  सामान्य प्रशासनाच्या सुजाता सौमिक‌ यांच्या अध्यक्षतेखाली समिती

  आरक्षणाबाबात कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास‌ही समिती करणार

  त्यानंतर नोकरीतल्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार

  मराठा आरक्षण, एसईबीसी आरक्षण यासंदर्भात‌ कोर्टाच्या निर्णयाचा‌ ही समिती अभ्यास करणार

 • 11 Aug 2021 15:06 PM (IST)

  अनिल देशमुखांच्या पीएच्या जामिनासाठी न्यायालयात याचिका

  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांची जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका

  100 कोटी वसुली प्रकरणातल अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना तपासयंत्रणेनं केली होती अटक

  संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत

 • 11 Aug 2021 12:58 PM (IST)

  रावसाहेब दानवे तोंड बंद करून बसलेले, भाजपचे इतर नेते गप्प होते: विनायक राऊत

  काल लोकसभेत 127 वि घटना दुरुस्ती मंजूर झालं आम्ही समर्थन दिलेच होत घटना दुरुस्ती करत असताना फुल प्रुफ असावं अशी आंमची मागणी होती. जस खुद्द देवेन्द्र फडणवीस हे सुद्धा म्हणाले होते फुल प्रुफ कायदा असावा.शंकेचं निरसन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मराठा ,धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा 50 टक्के ची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली होती. भाजपचं मराठा समाजावर आणि धनगर समाजा वरचं प्रेम ही पुतणा मावशी च प्रेम आहे. राव साहेब दानवे तोंड बंद करून बसलेले, भाजपचे इतर नेते गप्प होते, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

 • 11 Aug 2021 12:38 PM (IST)

  क्रेडिट कार्ड लोन वसुलीसाठी शरीर सुखाची मागणी प्रकरण, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

  औरंगाबाद –

  क्रेडिट कार्ड लोन वसुलीसाठी शरीर सुखाची मागणी प्रकरण

  दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

  पोलिसांनी तपासाच्या नावाखाली फिर्यादीकडून केली होती वैष्णोदेवीची सहल

  पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची माहिती

  फिर्यादीसोबत वैष्णवीदेवीचे दर्शन पोलिसांना भोवले

  क्रेडिट कार्डवरून शिवीगाळ करणाऱ्या ३ जणांवर गुन्हे दाखल

  क्रेडीड कार्डचे बिल भरले नाही म्हणून शिवीगाळ आणि शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण

 • 11 Aug 2021 12:24 PM (IST)

  बैलगाडा शर्यत सुरु करा, या मागणीसाठी राहुरीत रास्ता रोको

  बैलगाडा शर्यत सुरु करा

  मागणीसाठी राहुरीत रास्ता रोको

  पेटा हटवा , बैल वाचवा मागणी करत शेतकरी रस्त्यावर…

  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीसमोर रास्तारोको..

  अहमदनगर मनमाड महामार्ग अडवला..

  शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन..

  शर्यत सुरू झाली तरच लोक बैल जोपासतील..

  बैलाला वाचवण्यासाठी शर्यती सुरू करा…

  मागणी करत शेतकरी बैलांना घेऊन उतरले रस्त्यावर…

 • 11 Aug 2021 12:23 PM (IST)

  नाशकात जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकांमध्ये हाणामारी आणि दगडफेक

  नाशिक

  – जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकांमध्ये हाणामारी आणि दगडफेक

  – पोलिसांच्या समोरचं हाणामारी आणि दगडफेक

  – सर्व प्रकार सुरू असतांना पोलिसांनी मात्र घटनास्थळावरून काढला पळ

  – खोडे नगरमधील 8 ऑगस्टची धक्कादायक घटना, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

  – हाणामारीच्या घटनेत 2 जण गंभीर जखमी

  – पुरावा नष्ट करण्यासाठी दगड फेकून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

 • 11 Aug 2021 11:29 AM (IST)

  अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड, मालगाडीमागे 4 लोकल अडकल्या

  अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड

  कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

  बंद मालगाडीच्या मागे ४ लोकल अडकल्या

  वांगणीहून दुसरं इंजिन मागवण्यात आल्याची माहिती

 • 11 Aug 2021 11:27 AM (IST)

  कोरोनावरील आयसेरा कंपनीचे इंजेक्शन प्रभावी ठरणार?

  कोल्हापूर

  कोरोनावरील आयसेरा कंपनीचे इंजेक्शन प्रभावी ठरणार?

  इंजेक्शन नंतर 72 ते 90 तासात रुग्ण कोरोना निगेटिव्ह होत असल्याचा कंपनीचा दावा असल्याची सूत्रांची माहिती

  शिराळा च्या आयसेरा बायोलॉजी कंपनीने मे महिन्यात तयार कोरोना वरील अँटीकोविड हे इंजेक्शन

  इंजेक्शनच्या मानवी चाचणीला ही आयसीएमआर न दिली होती परवानगी

  परवानगीनंतर मोठी गुप्तता पाळत मानवी चाचणी झाल्याची देखील सूत्रांची माहिती

 • 11 Aug 2021 11:23 AM (IST)

  फी-कमी करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

  शिक्षण मंत्र्यांसोबतची पालकांची बैठक संपली..

  फी- कमी करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन..

  शाळा सुरू करण्याच्या धोरणाबाबत पालकांची निराशा…

 • 11 Aug 2021 11:22 AM (IST)

  अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  अंबरनाथ :

  अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यानं कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

  बंद मालगाडीच्या मागे ४ लोकल अडकल्या

  वांगणीहून दुसरं इंजिन मागवण्यात आल्याची माहिती

  गेल्या एक तासापासून मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प

 • 11 Aug 2021 10:57 AM (IST)

  बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील बैलगाडी चालक – मालकांचा आज तहसील कार्यालयावर मोर्चा

  कोल्हापूर

  बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील बैलगाडी चालक – मालकांचा आज तहसील कार्यालयावर मोर्चा

  बैलगाडी मालक बैल गाड्यांसह मोर्चामध्ये सहभागी

  2011पासून शर्यती बंद असल्यान बैलगाडी मालकांचा त्यावर अवलंबून असलेल्या घटकांच होतंय नुकसान

  शिरोळ मधील शिवाजी चौकातील तहसील कार्यालयापर्यंत जाणार मोर्चा

 • 11 Aug 2021 10:14 AM (IST)

  औरंगाबाद शहरात कोरोनाच्या लसीची टंचाई

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहरात कोरोनाच्या लसीची टंचाई

  आज फक्त 3 लसीकरण केंद्रांवर राहणार लसीकरण सुरू..

  69 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 4 लसीकरण केंद्र सुरू..

  लसींच्या अपुऱ्या साठ्यांमुळे 65 लसीकरण केंद्र बंद..

  औरंगाबादला साठा उपलब्ध होत नसल्याने रोजचीच लस टंचाई ची परिस्थिती..

  लाखो नागरिक लसींच्या प्रतीक्षेत मात्र लसींचा पत्ताच नाही..

 • 11 Aug 2021 09:38 AM (IST)

  सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले

  जळगाव – सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले

  गेल्या 2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी खाली आले आहेत.

 • 11 Aug 2021 09:29 AM (IST)

  येस बॅंक अवंता घोटाळ्यात नागपूरमध्येही ईडीचा छापा

  येस बॅंक अवंता घोटाळ्यात नागपूरमध्येही ईडीचा छापा

  – नागपूरातील सीए अश्विन माणकेश्वर यांच्या घर आणि कार्यालयावर छापा

  – काल दुपारी टाकलेल्या छाप्यात काही कागदपत्र जप्त केल्याची माहिती

  – अनंता समुहाचे गौतम थापर यांच्याशी संबंधीत सीएसच्या घरावर ईडीचा छापा

  – ३०७ कोटींची लाच देऊन १९०० कोटींचं कर्ज उचलल्याचा गौतम थापर यांच्यावर आरोप

 • 11 Aug 2021 09:24 AM (IST)

  सोलापूरच्या ग्रामीण भागात आठवडा बाजार भरु नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन

  सोलापूर –

  ग्रामीण भागात आठवडा बाजार भरु नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन

  मागील आठवड्यात वळसंग येथे आठवडा बाजार भरल्यामुळे झाली होती गर्दी

  टीव्ही 9  मराठीच्या मराठीच्या बातम्यांची दखल घेत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतीने केले आवाहन

  ग्रामपंचायतीकडून सायकलवर स्पीकर लावून बाजारात न येण्यासाठी आवाहन

  अन्यथा कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

 • 11 Aug 2021 09:24 AM (IST)

  भंडारा रुग्णालय 10 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू प्रकरण, दोन परिचारीकांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर

  – भंडारा रुग्णालय 10 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू प्रकरण

  – भंडाऱ्यातील दोन परिचारीकांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर

  – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला जामिन

  – शुभांगी भिवगडे आणि स्मिता आंबीलडुके यांना जामिन मंजूर

  – राज्य सरकारला नोटीस, २४ ॲागस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश

 • 11 Aug 2021 09:23 AM (IST)

  मुंबईचे नियम पुण्याला लागू होणार; दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार

  पुणे

  मुंबईचे नियम पुण्याला लागू होणार; दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार

  पुणे – लोणावळा लोकल व पुणे – दौंड डेमू प्रवासासाठी सामान्यांना परवानगी दिली जाणार

  मात्र, त्यांसाठी प्रवाशांचे दोन डोस झाले पाहिजेत आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी व्हायला हवा.

  यासाठी प्रवाशांना आवश्यक असणारा फोटोपास पोलीस प्रशासनकडून दिला जाणार

  लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू होईल.

 • 11 Aug 2021 09:23 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार

  नागपूर ब्रेकिंग –

  महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाइल अप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

  जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

  शेतकरी ई-पीक पाहणी ॲपव्दारे पिकांची नोंदणी करू शकतील.

  यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे.

 • 11 Aug 2021 09:22 AM (IST)

  नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात 600 रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारी सक्षम यंत्रणा उभारली जाणार

  नागपूर –

  तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत मेडिकलमध्ये एकाचवेळी 600 रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारी सक्षम यंत्रणा उभारण्यात येत आहे.

  आधुनिक यंत्रणेद्वारे गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यासाठी मेडिकलमध्ये “सेंट्रलाइज ऑक्‍सिजन सप्लाय सिस्टिम’ आहे.

  मात्र कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता .

  यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत मेडिकलमध्ये एकाचवेळी ६०० रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारी सक्षम यंत्रणा उभारण्यात येत आहे.

  विशेष असे की, या यंत्रणेत हवेतून ऑक्सिजन घेत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे.

  यंत्रसामग्री पोचली आहे. लवकरच हा ऑक्सिजन प्रकल्प सुरू होणार आहे.

  याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होणार आहे.

 • 11 Aug 2021 07:51 AM (IST)

  लोकल ट्रेन प्रवासासाठी आजपासून पासेस मिळणार, कुर्ला स्टेशनवर  पासेससाठी रांगा

  – लोकल ट्रेन प्रवासासाठी आजपासून पासेस मिळणार, कुर्ला स्टेशनवर  पासेससाठी रांगा

  – राज्य सरकारचे अॅप अद्यापही तयार नाही,

  – ऑफलाइन प्रणाली आजपासून सुरू होईल.

  – 11 ऑगस्ट सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत तिकीट काउंटरच्या पुढे बूथ उभारले जातील अशी माहीती…

  – बूथवर प्रवाशांच्या लसीकरणाची स्थिती पडताळून प्रत्येक व्यक्तिला तिकीट काउंटरवर पाठवलं जाणार…

  – केवळ दोन डोन डोज घेऊन १४ दिवस पुर्ण झालेल्यांनाच मासिक पास दिला जाणार…दर समान असणार…

  – राज्य सरकार एका महिन्यानंतर प्रकरणांचा आढावा घेईल…

  – कोणताही सरकारी आयडी, आधार कार्ड, प्रवाशांच्या फोटोची पडताळणी करण्यासाठी वापरला जाणार…

  – मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हंगामी तिकीट, लस प्रमाणपत्र आणि आधार कार्ड किंवा संबंधित ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल ..

 • 11 Aug 2021 07:50 AM (IST)

  नाशिकच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये आता 805 ऑक्सिजन बेड

  नाशिक – कोव्हिड केअर सेंटर मध्ये आता 805 ऑक्सिजन बेड..

  अंबड आयटी,संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम मध्ये पुन्हा उभारले जाणार कोव्हिड सेंटर..

  महापालिका आयुक्तांनी केली ठक्कर डोम कोव्हिडं सेंटरची पाहणी..

  महापालिका रुग्णालयांवरील ऑक्सिजन बेड चा ताण कमी होणार..

  तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर तयारीला..

  दुसऱ्या लाटेत भासलेला ऑक्सिजन तुटवडा आता जाणवू नये यासाठी प्रयत्न..

 • 11 Aug 2021 07:46 AM (IST)

  महसुली खटल्यांच्या सुनावण्यांची माहिती नागरिकांना आता थेट मोबाईलवर मिळणार

  पुणे :

  महसुली खटल्यांच्या सुनावण्यांची माहिती नागरिकांना आता थेट मोबाईलवर मिळणार

  प्रत्येक दिवशी कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार आहे, या माहितीसह प्रत्यक्ष सुनावणी सुरू असलेला खटला आणि त्यानंतर सुनावणी होणाऱ्या खटल्यांची माहितीही संबंधित पक्षकार आणि वकिलांना मोबाइलवर मिळणार आ

  मोबाइल अँपद्वारे ही सुविधा देण्यात आलीये

  प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार

 • 11 Aug 2021 07:34 AM (IST)

  औरंगाबाद महापालिकेत राज्यात सर्वात प्रथम राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

  औरंगाबाद –

  औरंगाबाद महापालिकेत राज्यात सर्वात प्रथम राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

  2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

  राष्ट्रीय पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यात औरंगाबाद पहिली महानगरपालिका..

  1200 कर्मचाऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ..

  कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,

  मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांचा पुढाकार

 • 11 Aug 2021 07:33 AM (IST)

  नागपूरकरांना दिलासा, नऊ दिवसांपासून शहरात एकंही कोरोना मृत्यू नाही

  – नागपूरकरांना दिलासा, नऊ दिवसांपासून शहरात एकंही कोरोना मृत्यू नाही

  – नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाच नव्या कोरोना रुग्णांची भर

  – २४ तासांत २३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

  – जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या आली १४४ वर

  – सक्रिय रुग्णांपैकी ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

 • 11 Aug 2021 07:33 AM (IST)

  सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या पाससाठी रांगा

  डोंबिवली :

  सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या पाससाठी रांगा

  केडीएमसी कडून डोंबिवली रेल्वे स्थानकात स्टॉल सुरू

  दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असतील तर रेल्वेचा पास मिळणार

  केडीएमसी अधिकारी लसीकरणाचं सर्टिफिकेट तपासून सही शिक्का देतायत

  प्रवाशांच्या सकाळीच लागल्या लांबच लांब रांगा

 • 11 Aug 2021 07:32 AM (IST)

  झाकीर हुसेन ऑक्सिजन गळती दुर्घटना प्रकरण, दुर्घटनेत झालेल्या 24 मृत्यूना ठेकेदार कंपनीच जबाबदार

  नाशिक –

  झाकीर हुसेन ऑक्सिजन गळती दुर्घटना प्रकरण..

  दुर्घटनेत झालेल्या 24 मृत्यूना ठेकेदार कंपनीच जबाबदार..

  ताईववो निप्पोन कंपनीला 22 लाखांचा ,तर जाधव ट्रेडर्सला 2 लाखांचा दंड..

  दुर्घटना घडल्यानंतर साडे तीन महिन्यांनी झाली कारवाई..

  दोन्ही कंपन्यांना नुसता दंड नाही, तर कायदेशीर कारवाई करणार –

  आयुक्त कैलास जाधव यांची माहिती.

 • 11 Aug 2021 07:31 AM (IST)

  गेल्या 9 दिवसात नागपुरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही

  नागपूर  –

  गेल्या 9 दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही

  तर रुग्ण संख्यत सुद्धा मोठी घट झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा

  दैनिक चाचण्या चार हजार च्या वर

  कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याचा दिलासा मिळत आहे

  मात्र यामुळे नागरिक बिनधास्त होऊन नियमांचं उलनघन करत आहे।

  नागपूरकराना दुसऱ्या लाटे तुन दिलासा मिळत असताना तिसऱ्या लाटे ला निमंत्रण देण्यात का ?

 • 11 Aug 2021 07:30 AM (IST)

  औरंगाबादच्या महानगरपालिकेतही साफडल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या

  औरंगाबाद –

  औरंगाबादच्या महानगरपालिकेतही साफडल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या..

  औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात आढळल्या देशी,विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या..

  औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या आवारात ओली पार्टी ची रंगत असल्याची जोरदार चर्चा..

  कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ओली पार्टी होत असल्याची शक्यता.

  औरंगाबाद महापालिकेला बसतोय बेवड्यांचा विळखा

 • 11 Aug 2021 07:29 AM (IST)

  नागपुरात दहावीची विद्यार्थीनी झाली आई, आरोपी फरार

  – नागपुरात दहावीची विद्यार्थीनी झाली आई, आरोपी फरार

  – अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

  – पोलीस घेत आहेत आरोपीचा शोध

  – १५ वर्षीय पिडीतेचे नववीत असताना एक तरुणासोबत जुडले होते प्रेमसंबंध

  – प्रेमसंबंधातून १४ व्या वर्षी पिडीतेला गेले दिवस

  – पिडीत मुलीचे आई वडील मोलमजुरी करतात

 • 11 Aug 2021 07:29 AM (IST)

  शासकीय सिव्हिल कंत्राटदार यांच्याकडे 75 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्याला अटक

  नागपूर –

  लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी केली नागपुरात कारवाई

  रमेश कुमार हिरालाल गुप्ता , जिल्हा जलसंधारण अधिकारी , लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या वर करण्यात आली कारवाई

  बिलात तडजोड करण्यासाठी शासकीय सिव्हिल कंत्राटदार यांच्याकडे 75 हजार रुपयांची मागितली होती लाच

  उदय नगर परिसरातील घरी स्वीकारली लाच त्याच वेळी करण्यात आली कारवाई

 • 11 Aug 2021 06:38 AM (IST)

  तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद रोचकरी व त्यांचे बंधु बाळासाहेब रोचकरीवर गुन्हा दाखल

  उस्मानाबाद

  तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद रोचकरी व त्यांचे बंधु बाळासाहेब रोचकरीवर गुन्हा नोंद

  मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करुन हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे या आरोपाखाली गुन्हा नोंद

  कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद असून तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद

  देवानंद रोचकरी फरार , पोलिसांचा शोध सुरू

  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती उठवल्याने तिर्थकुंड वाचविले तर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने गुन्हा नोंद

Published On - 6:32 am, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI