Maharashtra News LIVE Update | दादरमध्ये गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी, पाच दिवसांत 5 झाकणे लंपास  

| Updated on: Aug 27, 2021 | 12:46 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | दादरमध्ये गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी, पाच दिवसांत 5 झाकणे लंपास   
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Aug 2021 10:50 PM (IST)

    अंबरनाथमध्ये इंटरनेटचं काम करताना कर्मचाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

    अंबरनाथ : अंबरनाथमध्ये इंटरनेटचं काम करताना कर्मचाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

    अंबरनाथ पश्चिम भागात घडला प्रकार

    चौथ्या मजल्यावरून पडून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    अनधिकृतपणे इंटरनेट व्यवसाय करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा जीव टाकला जातोय धोक्यात

    कोणतेही अधिकृत लायसन्स नसताना केला जातोय इंटरनेटचा व्यवसाय

    प्रशासनाचं अनधिकृत इंटरनेट व्यावसायिकांकडे दुर्लक्ष

  • 26 Aug 2021 10:30 PM (IST)

    दादरमध्ये गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी, पाच दिवसांत 5 झाकणे लंपास  

    मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील रस्त्यावरील गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी

    गेल्या पाच दिवसांत 5 झाकणे चोरीला

    केळुसकर मार्गावरील भूमिगत गटारांवरील झाकणे चोरीला गेली

    पार्कमधीव नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गटारांवर तात्पुरती सिमेंटची झाकणे बसवली

  • 26 Aug 2021 09:37 PM (IST)

    आरोग्य विभागातील गट क, ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली 

    मुंबई : राज्य शासनाच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली

    8 आणि 9 सप्टेंबरला होणार होती परीक्षा

    परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

    एकूण 6 हजार 185 पदांसाठी होणार होती भरती

    आता 25 तारखेला क आणि 26 तारखेला ड संवर्गाची होणार परीक्षा

    कंत्राट दिलेल्या कंपनीनं गोंधळ टाळावा विद्यार्थ्यांची अपेक्षा

    तर परीक्षेचं नियोजन चोख करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाच्या कंपनीला सूचना

  • 26 Aug 2021 08:24 PM (IST)

    तासगावात उपवनसंरक्षक 30 हजारांची लाच घेताना जाळ्यात

    सांगली -तासगावात उपवनसंरक्षक 30 हजारांची लाच घेताना जाळ्यात

    लाकडाची वाहतूक करणारे वाहन सोडण्यासाठी लाच

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  • 26 Aug 2021 07:33 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 282 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ 

    पुणे : दिवसभरात 282 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 122 रुग्णांना डिस्चार्ज.

    - पुण्यात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 3

    - 210 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 494467

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2222

    - एकूण मृत्यू -8902

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 483343

    - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9278

  • 26 Aug 2021 07:23 PM (IST)

    भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण, 5 शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका

    उल्हासनगर : भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण

    5 शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका

    प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर झाली सुटका

    शिवसेनेनं पाचही जणांचा न्यायालयाच्या बाहेर केला सत्कार

    आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला आनंदच - शिवसैनिकांची प्रतिक्रिया

    यापुढेही शिवसेनेविरोधात बोलाल तर असंच उत्तर देऊ - शिवसेनेचा इशारा

  • 26 Aug 2021 06:53 PM (IST)

    राज्यपालांची वेळ घेण्यासाठी मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल

    मुंबई : मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल

    राज्यपालांची वेळ घेण्यासाठी राजभवनावर दाखल

    टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 26 Aug 2021 06:39 PM (IST)

    मराठा आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार 

    मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

    2 सप्टेंबरला होणार मराठा आरक्षणावर भेट

    राष्ट्रपतींनी भेटीसाठी वेळ दिल्याची माहिती

    संभाजी छत्रपती यांनी दिली माहिती

    महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी हजर राहण्यासाठी पत्र

  • 26 Aug 2021 06:09 PM (IST)

    पुण्यातील बोलाई देवीच्या मंदिरात चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

    पुणे - पुण्यातील बोलाई देवीच्या मंदिरात चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

    - 12 ऑगस्ट रोजी रात्री देवीच्या मंदिरातील चांदीच्या दागिन्यांची झाली होती चोरी

    - पुणे पोलिसांच्या समर्थ पोलिसांची कारवाई

    - हौशीलाल चव्हाण असे आरोपीचे नाव

    - सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

  • 26 Aug 2021 05:56 PM (IST)

    नांदेडमध्ये भरदिवसा चाकूचा धाक दाखवत घरात घुसून धाडसी चोरी, 50 तोळे सोने लुटले

    नांदेड : भरदिवसा चाकूचा धाक दाखवत घरात घुसून धाडसी चोरी

    50 तोळे सोने, 8 लाख रोकड लुटली

    सिडकोतील वात्सल्य नगर मधील घटना

    व्यापारी रमेश दाचावार यांच्या घरी चोरी

    दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केली जबरी चोरी

    चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • 26 Aug 2021 05:53 PM (IST)

    धरणगाव येथे भर पावसाळ्यात पाणीटंचाई, नगरपालिकेला महिलांनी दिला बांगड्यांचा आहेर

    जळगाव - पालकमंत्री यांच्या गावात भर पावसाळ्यात पाणी टंचाई

    धरणगाव येथे भर पावसाळ्यात पाणी पेटले

    नगरपालिकेला महिलांनी दिला बांगड्यांचा आहेर

  • 26 Aug 2021 04:40 PM (IST)

    भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले, सदाभाऊ खोत नाशिक बाजार समितीत दाखल

    नाशिक - माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत नाशिक बाजार समितीत दाखल

    - टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये फेकले आहेत टोमॅटो

    - अक्षरशः टोमॅटोचा झालाय खच

    - सदाभाऊ खोत करतायत पाहणी

  • 26 Aug 2021 04:27 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात भर दिवसा मारहाण

    वर्धा - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात भर दिवसा मारहाण

    - मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला चार आरोपींनी केली फावड्याने मारहाण

    - मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल

    - चार आरोपीला पोलिसांनी केली अटक

    - जखमी दिलीप मारुती दानव यांच्यावर उपचार सुरु

  • 26 Aug 2021 04:24 PM (IST)

    डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर सांगलीमध्ये अंत्यसंस्कार

    सांगली - आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर अंत्यसंस्कार

    सांगलीमध्ये डॉ. गेल ऑम्वेट यांना अखेरचा निरोप

  • 26 Aug 2021 03:32 PM (IST)

    कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार, दोन तरुणांकडून 10 ते 12 दुचाकी, चारचाकी गाड्यांची तोडफोड

    कल्याण : रात्री दोनच्या सुमारास कल्याण पूर्व भागातील चिकणीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत परिसरात आले. हे दोघे एका तरुणाच्या शोधात होते. तो सापडला नाही. या दोघांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना निशाणा केला. बाईक, कार, रिक्षांची तोडफोड केली. एका तरुणाला जखमी केले. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. अखेर दहशत माजविणारे हे दोन तरुण कोण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

  • 26 Aug 2021 03:20 PM (IST)

    सोलापुरात काँग्रेस भवनात काँग्रेस पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावले

    सोलापूर : काँग्रेस भवनात काँग्रेस पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावले

    प्रदेश्याध्यक्ष  नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कार्यालयात सुरू होती बैठक

    माजी परिवहन सभापती केशव इंगळे बैठकीत रागाने  शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावर निशाणा साधत अंगावर धावून गेले

    शहराध्यक्ष  प्रकाश वाले हे आपल्याला बैठकीला बोलावत नसल्याचा केला आरोप

    बैठकीत आल्यानंतरही  बोलू देत नाहीत

    अध्यक्षपद सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी

  • 26 Aug 2021 11:41 AM (IST)

    भाजप नगरसेवकाला शिवसैनिकांनी काळं फासल्याचं प्रकरण, पाचव्या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    उल्हासनगर :

    भाजप नगरसेवकाला शिवसैनिकांनी काळं फासल्याचं प्रकरण

    पाचव्या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    ज्ञानेश्वर मरसाळे (३४), हरीश खेत्रे (२७), महेंद्र पाटील (४२), विनोद साळेकर (४८) या चौघांना आधी झाली होती अटक

    आता मोहम्मद हुसेन अब्दुल रज्जाक शेख (३९) याला अटक

    इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती

    भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे शिवसेनेच्या विरोधात बोलत असल्यानं त्यांना मंगळवारी काळं फासण्यात आलं होतं

    याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 341, 143, 147, 149, 427, 506 (2) या कलमांनुसार आहे गुन्हा दाखल

  • 26 Aug 2021 11:40 AM (IST)

    मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालकांचे मृत्यू, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं

  • 26 Aug 2021 11:30 AM (IST)

    महिला आणि बालकांच्या अपहरणाचा शोध आता एसीपी आणि डीवायएसपीच्या खांद्यावर

    औरंगाबाद-

    महिला आणि बालकांच्या अपहरणाचा शोध आता एसीपी आणि डीवायएसपीच्या खांद्यावर

    राज्यात अपहरणाच्या शोधासाठी 45 कक्षांची स्थापना

    एसीपी आणि डीवायएसपीच्या सोबत पीआय आणि पीएसआय यांची असणार फौज

    स्वतंत्र कक्षासाठी तब्बल 573 पदे करण्यात आली मंजूर

    एका कक्षात एसीपी सह 14 कर्मचारी असणार नियुक्त

    अपहरण प्रकरणासाठी राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

  • 26 Aug 2021 10:56 AM (IST)

    टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक, औरंगाबाद-मुंबई हायवेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

    औरंगाबाद -

    टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक

    औरंगाबाद मुंबई हायवेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

    अनेक ट्रॅक्टर टोमॅटो रस्त्यावर ओतून शेतकरी करणार आंदोलन

    औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन इथे शेतकरी झाले आक्रमक

    औरंगाबाद मुंबई हायवे जॅम करून शेतकरी करणार आंदोलन

    रस्त्यावर टोमॅटो ओतून शेतकरी करणार रस्ता जॅम

  • 26 Aug 2021 10:55 AM (IST)

    औरंगाबादेत उद्योजकाला धमकावून मागितली 60 लाखांची खंडणी

    औरंगाबाद -

    औरंगाबादेत उद्योजकाला धमकावून मागितली 60 लाखांची खंडणी

    इन्कम टॅक्स विभागाचा धाक दाखवून मागितली खंडणी

    उद्योजकाची पोलीस ठाण्यात धाव

    पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल नाही

    खंडणी मागतानाचा व्हिडीओ आला समोर

    सुशांत दत्तात्रय गिरी अशी तक्रारदाराचे नाव

  • 26 Aug 2021 08:48 AM (IST)

    राज्यात घडत असलेल्या राणे-ठाकरे वादानंतर शिवसेनेचे संसदिय नेते संजय राऊत मुंबईत येणार

    राज्यात घडत असलेल्या राणे-ठाकरे वादानंतर शिवसेनेचे संसदिय नेते संजय राऊत मुंबईत येणार

    - भूवनेश्वर दौरा मध्येच सोडून संजय राऊत संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार

    - सामना कार्यालयात बोलणार असल्याची माहीती

  • 26 Aug 2021 08:47 AM (IST)

    कोल्हापूर शहरातील 11 कोविड सेंटर तात्पुरती झाली बंद

    कोल्हापूर :

    कोल्हापूर शहरातील 11 कोविड सेंटर तात्पुरती झाली बंद

    कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने महापालिका प्रशासनाचा निर्णय

    18 पैकी 11 सेंटर झालीत बंद

    बंद झालेल्या 11 सेंटर मध्ये आज पर्यंत दहा हजारहून अधिक कोरोना रुणांनी उपचार घेतल्याची महानगरपालिका प्रशासनाची माहिती

  • 26 Aug 2021 08:46 AM (IST)

    नागपूर मेट्रोवर आता पदभरतीच्या महाघोटाळ्याचा आरोप

    - नागपूर मेट्रोवर आता पदभरतीच्या महाघोटाळ्याचा आरोप

    - ‘पदभरती करताना ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले’

    - राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांचा महा मेट्रोवर गंभीर आरोप

    - ‘एससीच्या १३२ जागा असताना केवळ ४२ उमेदवारांना नोकरी’

    - ‘ओबीसीच्या २३८ जागा असताना केवळ ११३ जणांना नोकरी’

    - ‘खुल्या वर्गात ३५७ जागा असताना ६५० उमेदवारांना दिली नोकरी’

    - खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का?

    - ‘आरक्षणाच्या धोरणाला मेट्रोकडून तिलांजली’

    - राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांच्याकडून पदभरतीच्या चौकशीची मागणी

  • 26 Aug 2021 08:25 AM (IST)

    शिवसेना आमदाराने अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल फेकल्या

    शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी नागपूर कृषी विभागाच्या आत्मा योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेत शेतकऱ्यांना शेती साहित्यासाठी तब्बल तीनपट जास्त किंमत लावली आणि त्या बदल्यात निकृष्ट कृषी साहित्य पुरवठा केला, असा आरोप आशिष जैसवाल यांनी केलाय. यावर संतापलेल्या आमदार जैसवाल यांनी या योजनेशी संबंधित पाईल कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकत जाब विचारलाय.

  • 26 Aug 2021 08:22 AM (IST)

    नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन

  • 26 Aug 2021 08:01 AM (IST)

    4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 August 2021

  • 26 Aug 2021 08:01 AM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केला 150 किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक

    पुणे

    -पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केला 150 किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक

    -या प्रकरणी किरण अजिनाथ गायकवाड व मौलाना सत्तार शेख असे आरोपींचे नाव असून शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथे एका महिलेला गांजा विकण्यास येत असताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    -चारचाकी गाडीतून गांजाची वाहतुक करत असताना गाडी पंक्चर झाल्याने आरोपी हे त्याचं ठिकाणी थांबले असता त्यांना मोठ्या शिताफीने रांजणगाव गणपती पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

    -ह्या कारवाई मध्ये एकूण 150 किलो गांजा यात जप्त करण्यात आलाय,जप्त केलेला मुद्देमाल तब्बल 35 लाख रुपये किंमतीचा

  • 26 Aug 2021 08:00 AM (IST)

    शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी अधिकाऱ्याच्या टेबलवर फेकल्या फाईल्स

    नागपूर -

    - शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी अधिकाऱ्याच्या टेबलवर फेकल्या फाईल्स

    - कृषी विभागाच्या आत्मा योजनेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप

    - ‘आत्मा’ योजनेत कृषी साहित्य पुरवठ्यात भ्रष्टाचार झाल्याने आमदार संतप्त

    - शेतकऱ्यांना तीनपट जास्त किंमत लावून निकृष्ट कृषी साहित्याचा पुरवठा

    - ‘आत्मा योजनेतील अधिकारी भ्रष्टाचारात सामिल असल्याचा आरोप’

    - कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची आशिष जैसवाल यांची मागणी

    - साहित्य पुरवठा करणाऱ्यांचा कंपन्यांचा एकाची अनेक पुरवठादारांचा पत्ता

    - साहित्य पुरवठा करणारे भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप

  • 26 Aug 2021 07:59 AM (IST)

    नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे

  • 26 Aug 2021 07:57 AM (IST)

    नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचा कहर, गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या दुप्पट

    नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचा कहर

    गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या दुप्पट

    आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट वर

    एकट्या जिल्हा रुग्णालयात बाधितांचा आकडा हजारांच्या घरात

    तर खाजगी रुग्णालयांमध्ये देखील प्रचंड गर्दी

    सुरुवातीला लवकर निदान होत नसल्याने नागरिकांमध्ये कोरोना की डेंग्यू याबाबत संभ्रम

  • 26 Aug 2021 07:57 AM (IST)

    कोल्हापुरात महापुरात बुडालेल्या उसावर शेतकऱ्यानी फिरवला नांगर

    कोल्हापुरात महापुरात बुडालेल्या उसावर शेतकऱ्यानी फिरवला नांगर

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावातील चित्र

    सरकारची तोकडी मदत पाहता काहींनी ऊस पेटवण्यात तर काहींनी ऊस कुट्टी करण्यात मानलं समाधान

    महापुरात शिरोळ तालुक्यातील 43 गावातील 16 हजार हेक्टर वरील ऊसाला बसलाय फटका

    उसाला प्रति गुंठा 135 तर एकरी 5400 इतकी झालीय तुटपुंजी मदत

    उसावर नांगर फिरल्याने यंदा ऊस उत्पादनात घट होणार

  • 26 Aug 2021 07:56 AM (IST)

    नाशकात टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त

    नाशिक -

    टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त

    भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समिती आवारातच दिले फेकून

    शेतकऱ्यांनी आणलेला आपला माल फेकून दिल्याने बाजार समिती आवारात रस्त्यावर टोमॅटोचा खच पाहायला मिळाले

    भाजीपाला नंतर आता टोमॅटोचे देखील दर घसरल्याने शेतकऱ्यांना बसत आहे मोठा आर्थिक फटका

  • 26 Aug 2021 07:20 AM (IST)

    ‘कोविशिल्ड’चा साठा संपला, पिंपरी चिंचवड शहरात आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

    पिंपरी चिंचवड

    -‘कोविशिल्ड’चा साठा संपला, शहरात आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

    -18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे

    -किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे

    -आज शहरातील 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे

  • 26 Aug 2021 07:20 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादीचे 100% सर्वेक्षण पूर्ण

    सोलापूर -

    जिल्ह्यातील मतदार यादीचे 100% सर्वेक्षण पूर्ण

    यादीतील 15 हजार 109 दुबार नावे झाले कमी

    निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक विभागाने मतदार यादीचे केले सर्वेक्षण

    मतदाराशी चर्चा करून त्यांच्या विनंतीनुसार दोन पैकी एकाच ठिकाणचे नाव केले कायम

  • 26 Aug 2021 07:20 AM (IST)

    म्युकरमायकोसिसमुळे सोलापूर जिल्ह्यात आणखी एक रुग्णाचा मृत्यू, संख्या 94 वर

    सोलापूर - म्युकरमायकोसिसमुळे जिल्ह्यात आणखी एक रुग्णाचा मृत्यू

    आत्तापर्यंत जिल्ह्यात 94 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत 656 रुग्ण आढळले

    त्यातील 529 जणांवर झाले उपचार

  • 26 Aug 2021 07:19 AM (IST)

    सोलापुरात 24 तासात 11 जणांचा कोरोनाने मृत्यू

    सोलापूर -

    24 तासात 11 जणांचा कोरोनाने मृत्यू

    तर 528 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

    पंढरपूर आणि माढा तालुक्यात गेल्या चोवीस तासात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळले

    ग्रामीण भागात 20 हजार 819 चाचण्यांमधून 524 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

    1 हजार 96 चाचण्यामधून 4 जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह

  • 26 Aug 2021 07:18 AM (IST)

    पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यावर आज फुगेवाडी ते संत तुकाराम नगर मार्गावर आज पुन्हा मेट्रो धावली

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यावर आज फुगेवाडी ते संत तुकाराम नगर मार्गावर आज पुन्हा मेट्रो धावली

    -त्याच बरोबर मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांनी सायकल प्रवास करावा या उद्देशाने सायकल रॅलीच आयोजन करण्यात आले

  • 26 Aug 2021 07:08 AM (IST)

    वाघांच्या हाडासह नागपूर जिल्हयातील शिकाऱ्याला मध्य प्रदेशात अटक

    - वाघांच्या हाडासह नागपूर जिल्हयातील शिकाऱ्याला मध्य प्रदेशात अटक

    - शिकाऱ्याकडून वाघाचे आठ किलो हाडं आणि हरीणाचे अवयव जप्त

    - आरोपीने तीन ते चार वाघांची शिकार केल्याची शक्यता

    - वन विभागाच्या विशेष पथकाने केली कारवाई

    - आरोपी शिकारी बालचंद बरकदे नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती

  • 26 Aug 2021 07:02 AM (IST)

    महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात एका दिवसात 5,031 कोरोनाबाधित, 216 जणांचा मृत्यू

    महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी

    राज्यात एका दिवसात 5031 कोरोनाबाधित तर 216 जणांचा मृत्यू

    कोरोनाच्या तिसर्या लाटेत राज्यात ६० लाख रूग्ण होऊ शकतात

    आरोग्य विभागाच्या अहवालातून दिलाय इशारा

    कोविड नियमाच पालन करण्याचीही राज्य सरकारकडून आवाहन

  • 26 Aug 2021 07:01 AM (IST)

    केरळानं वाढवली देशाची चिंता, केरळात कोरोनाची तिसरी लाट?

    केरळानं वाढवली देशाची चिंता

    केरळात कोरोनाची तिसरी लाट?

    केराळात एका दिवसात ३१ हजार ४४५ नवे रूग्ण

    देशातील रूग्णसंख्येच्या ६८ टक्के रूग्ण केरळातून

  • 26 Aug 2021 07:01 AM (IST)

    अफगाणी नागरिकांकडून पोलिओ आजार पसरण्याची भीती, औरंगाबाद महापालिका घेणार अफगाणी नागरिकांची सखोल माहिती

    औरंगाबाद -

    अफगाणी नागरिकांकडून पोलिओ आजार पसरण्याची भीती

    औरंगाबाद महापालिका घेणार अफगाणी नागरिकांची सखोल माहिती

    औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर महापालिका ठेवणार लक्ष

    अफगाणिस्तानमध्ये पोलिओचा आजार अजूनही कायम असल्यामुळे महापालिका सतर्क

    अफगाणी नागरिकांमुळे पसरू शकतो औरंगाबादेत पोलिओ

    पोलिओ पसरू नये यासाठी औरंगाबाद महापालिका करणार अफगाणी मुलांचे पोलिओ लसीकरण

  • 26 Aug 2021 07:00 AM (IST)

    पुणे मेट्रोची फुगेवाडी ते संत तुकाराम नगर ट्रायल रन

    पुणे

    पुणे मेट्रोची फुगेवाडी ते संत तुकाराम नगर ट्रायल रन

    सायकल सह आज पुणे मेट्रोतुन प्रवास

    अनेक सायकलस्वार आज मेट्रोमधून आपल्या सायकल सह प्रवास करतायेत

    मैत्रीतून सायकल सह प्रवास कसा असेल याचे हे प्रात्यक्षिक

  • 26 Aug 2021 06:48 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात आढळली 728 तीव्र कुपोषित बालके

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यात आढळली 728 तीव्र कुपोषित बालके

    औरंगाबादच्या आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाला जोरदार झटका

    17 ऑगस्ट पासून सुरू केलेल्या मोहिमेत आढळली 728 तीव्र कुपोषित बालके

    411 पथके स्थापन करून घेतला तीव्र कुपोषित बालकांचा शोध

    शोध मोहिमेत धक्कादायक माहिती आली समोर

    तीव्र कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीव्र कुपोषित बालकांना अधिक धोका होण्याचाही अंदाज

  • 26 Aug 2021 06:44 AM (IST)

    बदलापूरजवळ दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

    बदलापूरजवळ दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

    दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

    बदलापूरच्या एरंजाड गावाजवळ घडला अपघात

  • 26 Aug 2021 06:41 AM (IST)

    अंबरनाथमध्ये अंगणवाडी सेविकांनी केले निकृष्ट मोबाईल परत

    अंबरनाथमध्ये अंगणवाडी सेविकांनी केले निकृष्ट मोबाईल परत
    फोन वारंवार हँग होत असल्याच्या केल्या तक्रारी
    चांगल्या प्रतीचे मोबाईल देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी

Published On - Aug 26,2021 6:35 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.