Maharashtra News LIVE Update | दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 15 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Jul 2021 21:01 PM (IST)

  दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड

  पिंपरी चिंचवड :

  -कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड

  – पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून अटक केली

  -राकेश मौर्य असं त्याचं नाव असून तो लेबर युनियनचा अध्यक्ष आहे

  -अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेंव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या

 • 15 Jul 2021 20:48 PM (IST)

  अमेरिकेच्या स्पेस टुरिझम ‘न्यु शेफर्ड’च्या टिममध्ये कल्याणची तरुणी

  अंतराळात झेपावणारे यान बनवणाऱ्याच्या टीममधील कल्याण पूर्व मधील एका तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण शहराची पताका थेट अंतराळात आणि पर्यायाने अमेरिकेत फडकली आहे.

 • 15 Jul 2021 20:17 PM (IST)

  नवी मुंबईत भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीला दे धक्का, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

  नवी मुंबईत भाजपाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दे धक्का!

  तुर्भे आणि दिघा येथील या दोन पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

  भाजप आमदार गणेश नाईक, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ, संदीप नाईक, संजीव नाईक यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

  विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, तालुकाप्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

 • 15 Jul 2021 19:20 PM (IST)

  कल्याणच्या नेवाळी भागात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

  कल्याण :

  नेवाळीमध्ये पोहायला गेलेले दोन तरुण बुडाले

  शुभम जगदीश भोईर (१३),चांद सुरज पाटील (१५ ) अशी मृत मुलांची नावे

  चार मुले पोहायला गेले असल्याची प्राथमिक माहिती, अन्य दोघांचा शोध सुरू

  दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत

  पोलीस घटनास्थळी दाखल

 • 15 Jul 2021 17:13 PM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस

  बुलडाणा : जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस, पावसाने आज सकाळपासून दिली होती उघडीप, मात्र आता परत पावसाला सुरुवात.

 • 15 Jul 2021 17:11 PM (IST)

  शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, शेतकऱ्यांच्या हितासाठी काय चर्चा झाली? दादा भुसे म्हणतात….

  दादा भुसे यांची प्रतिक्रिया :

  पिक विमाच्या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. मुदतवाढ द्यावी. मुदतवाढ करताना राज्यावर बोजा पडू नये, अशी विनंती केली आहे

  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

  शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय घ्या, अशा सूचना पवार यांनी दिल्या

  फलोत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातदार यांच्या देखील तक्रारी होत्या

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले.

  आमच्याकडे संख्याबळ आहे. आम्ही कुठल्याही मतदानाला घाबरत नाही. गुप्त मतदान असूदे अथवा आवाजी मतदान

  देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत.

 • 15 Jul 2021 17:03 PM (IST)

  रत्नागिरीत आणखी एक पूल वाहून जाण्याच्या मार्गावर

  रत्नागिरी- आणखी एक पूल वाहून जाण्याच्या मार्गावर

  दापोली तालुक्यातील मुरुडचा पूल वाहून जाण्याच्या मार्गावर

  दापोली मुरुड येथील पुल खचला

  दापोली मुरुड पुल बनला धोकादायक,

  याआधी गुहागर पालशेत येथील पूल धोकादायक बनल्याने वाहतूक बंद आहे.

 • 15 Jul 2021 16:30 PM (IST)

  विरारमधे हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

  विरार:- विरारमधे एका हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

  विरार पश्चिमेकडील वाय के नगर परिसरात स्टार प्लॅनेट हॉटेल व्यावसायिकाने केली आत्महत्या

  हॉटेलचे मालक भाड्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याने कंटाळून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती

  करुणाकरण पुत्रण (वय 48) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकांचे नाव असून, पुत्रन यांना दोन लहान मूल आहेत.

  करोना च्या काळात हॉटेल चालकांचा धंदा मोठ्या प्रमाणावर मंदावला होता त्यातच ही भाडेवाढ मोठ्या प्रमाणात थकीत होती आणि त्यातूनच ही आत्महत्या केली असल्याची माहिती

 • 15 Jul 2021 16:14 PM (IST)

  एकानाथ खडसे शरद पवार अजित पवारांच्या भेटीला

  मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकानाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

  महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता

  एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीसाठी  सह्याद्रीवर दाखल

  शरद पवार आणि अजित पवार यांची घेणार भेट

 • 15 Jul 2021 16:00 PM (IST)

  स्वप्निलच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने 10 लाखांची मदत देणार : एकनाथ शिंदे

  पुणे : स्वप्निलच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने 10 लाखांची मदत देणार

  स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार

  MPSC चा कारभार पारदर्शक असला पाहिजे

  प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल

 • 15 Jul 2021 15:53 PM (IST)

  दीड तोळे सोन्याच्या चैनसाठी मित्रानीच केली अल्पवयीन मुलाची हत्या

  कल्याण नजीक बापगाव परिसरात धक्कादायक प्रकार

  दीड तोळे सोन्याच्या चैनसाठी मित्रानीच केली अल्पवयीन मुलाची हत्या

  14 वर्षीय मयत मुलाचे नाव सोहम बजागे

  पडघा पोलिसांनी आरोपी अक्षय वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

  बुधवारी संध्याकाळी घडला प्रकार

  रात्री सापडला सोहमचा मृतदेह

  मयत आणि आरोपी तिघे ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रहिवासी

 • 15 Jul 2021 15:18 PM (IST)

  डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग

  डोंबिवली : स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला मोठी आग,  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात आग लागली आहे. या आगीच्या धूर परिसरात पसरला आहे. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत
 • 15 Jul 2021 15:04 PM (IST)

  जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर 50 हजारांच्या उंबरठ्यावर

  जळगाव –

  जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर 50 हजारांच्या उंबरठ्यावर

  सोन्याचे दर प्रति तोळा 49 हजार 800 रुपये

  अमेरिकन डॉलर वाढल्याने सोन्याची दरवाढ

 • 15 Jul 2021 13:25 PM (IST)

  शिरूर तालुक्यातील पाबळ मधील स्मशानभूमीत अंधश्रध्दाचा अघोरी प्रकार उघड

  पुणे –

  -शिरूर तालुक्यातील पाबळ मधील स्मशानभूमीत अंधश्रध्दाचा अघोरी प्रकार उघड

  -एका काळ्या पिशवी त्यावर कोहळ्याचा भोपळा,त्यावर टाचणी टोचून मुलींचा फोटो लावलेल्या वस्तू आल्या आढळून

  – मुलीचा फोटो लावून अंधश्रद्धा पसरवण्याचा स्मशानभूमीत असा प्रकार घडल्याने गावात भितीचे वातावरण झाले निर्माण

  -पाबळ मधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना हा प्रकार आला उघड

 • 15 Jul 2021 12:18 PM (IST)

  राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्ट्ची साफसफाई शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांच्याकडून

  नाशिक –

  मनसेच्या मदतीला सेना आली धावून

  राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्ट्ची साफसफाई शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांच्याकडून..

  राज ठाकरे उद्यापासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर..

  मनसेने उभारलेल्या ठाकरे स्मारकाच्या स्वच्छतेसाठी बोरस्ते यांचा पुढाकार..

  नाशिकच्या स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकाकडे सत्ताधारी भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप..

 • 15 Jul 2021 12:12 PM (IST)

  खोदकामा करताना आढळले गुप्तधन, अहमदनगर जिल्हयातील बेलापूर येथील घटना

  खोदकामा करताना आढळले गुप्तधन

  अहमदनगर जिल्हयातील बेलापुर येथील घटना

  बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळले गुप्तधन

  हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात आढळली 1020 चांदिची नाणी

  नाण्याचे एकुण मुल्य 8 लाख रुपये

  जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने पंचनामा करून गुप्तधन घेतले ताब्यात

 • 15 Jul 2021 09:53 AM (IST)

  आईला मारल्याच्या रागातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, नागपुरातील घटना

  लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, आईला मारल्याच्या रागातून केली हत्या

  रामटेक तालुक्यातील देवलापूर पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या चारगाव येथील घटना,

  कृष्णा मसराम (वय 38) असं मृतकाचं तर प्रमोद मसराम (वय 36,) असं आरोपी भावाचं नाव,

  आरोपी भावाला पोलीसांनी केली अटक

 • 15 Jul 2021 08:33 AM (IST)

  पुणे महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी शासकीय वाहने मिळूनही वेगळा वाहन भत्ता लाटल्याचं समोर

  पुणे –

  – पुणे महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी शासकीय वाहने मिळूनही वेगळा वाहन भत्ता लाटल्याचं समोर,

  – यामुळे पालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसलाय,

  – या अधिकाऱ्यांना आता चाप लावण्यात येणार असून आतापर्यंत वाहनभत्ता म्हणून घेतलेली रक्कम वेतनामधून कपात करुन वसूल करण्याचा निर्णय,

  – यापुढे वाहन किंवा वाहन भत्ता यापैकी एकच सेवा पालिकेच्या अधिकाऱ्याला मिळणार आहे.

  – शिवाय दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांचे आदेश.

 • 15 Jul 2021 08:33 AM (IST)

  संत तुकाराम महाराज पादुका नीरा नदी स्नान

  संत तुकाराम महाराज पादुका नीरा नदी स्नान

  -संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज 15 व दिवस परंपरेनुसार या दिवशी वारीच्या वाटेवर पालखी पुणे जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते

  -त्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान करण्यात येते

  -यंदा हा सोहळा हा देहू मध्येच सुरुये

  -संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील परंपरा खंडित होऊ नये यासाठी हे नीरा स्नान हे देहू मधील इंद्रायणी नदी मध्ये प्रतिकात्मक पध्दतीने हा सोहळा पार पडत आहे

  -यावेळी मुख्य मंदिर ते इंद्रायणी नदी घाट हा आकर्षक फुलांनी सजवत पायघड्या घालण्यात आल्या आहेत

 • 15 Jul 2021 08:32 AM (IST)

  पहाटे सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

  पहाटे सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

  वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज

  अपघातात पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीचे नुकसान

  Mh- 46 BA 7089 ही गाडी पनवेल हून बेलापुरच्या दिशेने जात होती

  अपघातानंतर वाहन चालक आपली गाडी सोडून गेला

  याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा नोंद झाला नाही

 • 15 Jul 2021 08:13 AM (IST)

  सोलापुरात जिल्ह्यात 13 साखर कारखान्यांकडे 2020-21  हंगामातील 224 कोटी 30 लाख रुपयांचे उसबिल थकीत

  सोलापूर- जिल्ह्यात 13 साखर कारखान्यांकडे 2020-21  हंगामातील 224 कोटी 30 लाख रुपयांचे उसबिल थकीत

  थकीत ऊस बिले जमा करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने मालमत्ता जप्तीचे दिले आहेत आदेश

  आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते

  मात्र प्रत्यक्षात कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम मिळाली नाही

  साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास असमर्थता

  जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदारामार्फत दिल्या आहेत साखर कारखान्यांना नोटीस

  मात्र साखर विक्री झाली नसल्याने बिले थकीत राहिल्याचं कारखान्याकडून स्पष्टीकरण

 • 15 Jul 2021 07:52 AM (IST)

  सोलापुरात सहा महिन्यात आढळले डेंग्यूचे 78 रुग्ण

  सोलापूर- सहा महिन्यात जिल्ह्यात आढळले डेंग्यूचे 78 रुग्ण

  पावसाळ्यात आता  कोरोनासोबतच  डेंग्यू बाबतही काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  मागील सहा महिन्यात शहरात 63 तर जिल्ह्यात 15 रुग्ण आढळले

  साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पालिकेच्या दवाखाने,आरोग्य केंद्रासह रुग्णालयामध्ये प्रशासनाकडून उपायोजना

 • 15 Jul 2021 07:51 AM (IST)

  चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण, अपघात, वाहतूक कोंडीत वाढ

  पुणे

  – चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीत वाढ

  -ऑटो हब असलेल्या चाकण औद्योगिक वसाहत येथील राज्य महामार्गावरील चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे

  -खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून कंटेनर व ट्रेलर सारखी अवजड वाहने खड्डे चुकविताना अनेक अपघात होत आहेत

 • 15 Jul 2021 07:51 AM (IST)

  सहाय्यक पोलीस निरीक्षकास शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

  सोलापूर – सहाय्यक पोलीस निरीक्षकास शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

  अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची नियंत्रण कक्षात बदली

  गवळी यांनी सहायक पोलिस निरीक्षक रेवणसिद्ध काळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची वरिष्ठांकडे करण्यात आली होती तक्रार

  सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले आदेश

 • 15 Jul 2021 07:50 AM (IST)

  कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिपायानेच पुरवला कैद्यांना गांजा

  कोल्हापूर

  कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिपायानेच पुरवला कैद्यांना गांजा

  कारागृहातील तपासणी पथकाच्या झाडाझडती धक्कादायक बाब उघड

  तीन कैद्या चौघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  सतीश गुंजाळ अस गांजा पुरवणाऱ्या शिपायाच नाव

  कारागृहात या आधीही आढळले होता गांजा आणि मोबाईल

  पुन्हा एकदा कारागृहातील गांजा प्रकरण चव्हाट्यावर

 • 15 Jul 2021 07:32 AM (IST)

  नागपूर जिल्हयात पिण्याच्या पाण्याचे ११० नमुने दुषीत

  – नागपूर जिल्हयात पिण्याच्या पाण्याचे ११० नमुने दुषीत

  – जून महिन्यात आरोग्य विभागाने ९६७ नमुने तपासले होते

  – सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासलेले पाण्याचे ११० नमुने दुषीत

  – पावसाळ्याच्या तोंडावर आढळलेले दुषीत नमुने आजाराला निमंत्रण

  – पाणी उकळून पिण्याचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा सल्ला

 • 15 Jul 2021 07:32 AM (IST)

  तळेगांव दाभाडे येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची केली हत्या

  पुणे

  -तळेगांव दाभाडे येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची केली हत्या

  -धारधार कोयत्याने हल्ला करत केली हत्या,मध्यरात्रीची घटना

  -रेखा वाघमारे असं मयत सावत्र आईचे नाव असून

  -17 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा काही काम करत नाही नुसता फिरत असतो ही तक्रार सावत्र आई रेखा वाघमारे ही त्यांच्या पती कडे करत असल्याचा कारणावरून वाद होत झाली ही हत्या

  -17 वर्षीय अल्पवयीन मुलगा तळेगांव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात

 • 15 Jul 2021 07:06 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावात मेंढपाळांना बेदम मारहाण

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावात मेंढपाळांना बेदम मारहाण

  ओझर गावातील गावगुंडांकडून झाली बेदम मारहाण

  मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ झाले गंभीर जखमी

  नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना झाली मारहाण

  मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

  मारहाण करणाऱ्या तरुणांनवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  मात्र अजूनही मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक नाही

  गोदावरी नदीच्या परिसरात मेंढ्या चरताना झाली मारहाण

 • 15 Jul 2021 06:43 AM (IST)

  ठाणे महापालिका वैद्यकीय अधिकारी उपायुक्त डॉ. विश्वानाथ केळकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  ठाणे महापालिका वैद्यकीय अधिकारी उपायुक्त डॉ. विश्वानाथ केळकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

  करोना रुग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेऊन पोलीसात केली होती तक्रार..

  अखेर पीडित महिलेला मिळाला न्याय

Published On - 6:32 am, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI