Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजारांची तातडीची मदत

| Updated on: Jul 25, 2021 | 11:59 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजारांची तातडीची मदत
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jul 2021 10:00 PM (IST)

    महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजारांची तातडीची मदत

    महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजारांची तातडीची मदत, पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

  • 25 Jul 2021 06:52 PM (IST)

    सांगलीत नागरी वस्तीत मगरी करू लागल्या मुक्त विहार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    सांगली :

    नागरी वस्तीत मगरी करू लागल्या मुक्त विहार.

    नागरीक भयभीत पुराच्या पाण्याने मगरी बाहेर.

  • 25 Jul 2021 06:22 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 3 नवे कोरोनाबाधित, तर एकही मृत्यू नाही

    नागपूर :

    नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    तर मृत्यूसंख्या शून्य

    20 जणांनी केली कोरोना वर मात

    एकूण रुग्ण संख्या - 492816

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482474

    एकूण मृत्यू संख्या - 10115

  • 25 Jul 2021 06:20 PM (IST)

    मावळ तालुक्यातील कोसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

    मावळ, पुणे

    - मावळ तालुक्यातील कोसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

    -वडील पिराजी सुळे आणि मुले सचिन सुळे आणि साईनाथ सुळे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे

    -रविवारची सुट्टी असल्याने पिराजी सुळे हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहायला गेले असता त्या ठिकाणी असलेल्या दगड खाणीच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा कामशेत पोलिसांचा प्राथमिक अंदाज

    -तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात

  • 25 Jul 2021 05:37 PM (IST)

    अतिवृष्टीमुळे भोर-महाड रस्त्यावर 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

    पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भुस्खलन,

    30 ठिकाणी कोसळल्या दरडी,

    रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच, डोंगरावरून झाडं आली रस्त्यावर,

    आणखी पाच दिवस रस्ता मोकळा करण्यासाठी लागणार,

    धुकं असल्यानं मदतकार्यासाठी अडचणी,

    20 कीमी पर्यंत नागरिक घरातलं सामान घेण्यासाठी चालत,

    भोर महाड रस्त्याची चाळण कॅमेऱ्यात कैद,

    टीव्ही 9 ची टीम वाट काढत पोहोचली वरंधा घाटात

  • 25 Jul 2021 03:53 PM (IST)

    पुण्यातील भोर तालुक्यात कोंढरी गावाजवळ दरड कोसळली, संपूर्ण गावचं प्रशासनानं स्थलांतरित केलं

    पुण्यातील भोर तालुक्यात कोंढरी गावाजवळ पडली दरड,

    संपूर्ण गावचं प्रशासनानं केलं स्थलांतरित,

    कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत,

    भोर महाड रस्ता संपूर्ण दरड कोसळल्यानं बंद,

    गावात मोबाईल नेटवर्क नाही नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही

    गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी केलं स्थलांतरित

  • 25 Jul 2021 12:46 PM (IST)

    विरारच्या जीवदानी मंदिर परिसरात 100 झाडांची लागवड

    विरार :-झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत विरारच्या जीवदानी मंदिर परिसरात आज 100 झाडाची लागवड करण्यात आली आहे.

    ट्री प्लँटेशन ड्राईव्ह 2021 या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली आहे. आज 100 झाडाची लागवड करत..500 झाडाच्या वर जीवदानी डोगरावर या पुढे दर रविवारी झाड लावण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

    जीवदानी मंदिराच्या डोंगरावर भाविक भक्तांची मांदियाळी असते. याच लावलेल्या झाडातून येणाऱ्या भाविकांना एक छत्र उभे राहू शकते हीच संकल्पना घेऊन जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

    जीवदानी मंदिर ट्रस्ट, युवा विकास आघाडी, द प्रेस क्लब ऑफ वसई विरार यांच्यासह अन्य सहयोगी संस्थानच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

  • 25 Jul 2021 10:55 AM (IST)

    औरंगाबादेत लसींचा साठा संपला, मनपाचे लसीकरण पूर्णपणे बंद

    औरंगाबाद :-

    औरंगाबादेत लसींचा साठा समाप्त, मनपाचे लसीकरण पूर्णपणे बंद..

    महापालिकेला लस न मिळाल्यामुळे लसीकरण अक्षरशः बंद..

    आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस असते लसीकरण सुरू,बाकी दिवशी लसीकरण बंद..

    दुसरा डोस घेणाऱ्यांचे वाढतेय प्रमाण,दुसऱ्या डोस साठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या गेली लाखांच्या पुढे..

    लसींचा योग्य पुरवठा होत नसल्याने नागरिकांची होतेय वनवन..

  • 25 Jul 2021 10:48 AM (IST)

    औरंगाबाद पोलिसांसाठी आनंदाची बातमी, 1696 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरातील पोलिसांसाठी आनंदाची बातमी

    1696 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार..

    ग्रामीण पोलीस दल,अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन अधिकारी यांचे वाढणार वेतन..

    मूळ वेतनाच्या 3 % होणार पगार वाढ..

    1 जुलै पासून होणार पगार वाढ..

    येत्या ऑगस्ट महिन्याच्या पगारात असेल वाढीव वेतन..

  • 25 Jul 2021 10:47 AM (IST)

    औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    औरंगाबाद  :-

    औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

    लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    रांजणगावातील शिवनेरी कॉलनीत कुत्र्याने तोडला लहान मुलाच्या पायाचा लचका

    कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटिव्हीत मध्ये कैद

    कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

  • 25 Jul 2021 10:07 AM (IST)

    अजित पवार-रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बैठकीला सुरुवात, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात

    बारामती : अजित पवार-रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बैठकीला सुरुवात..

    विद्या प्रतिष्ठानच्या आयटी सेंटरमध्ये सुरु आहे बैठक..

    भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात..

  • 25 Jul 2021 10:06 AM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या सर्व मृत्यूचे ऑडिट होणार, नाशिक मनपा आयुक्तांचे आदेश

    नाशिक - कोरोना मृत्यूच्या ऑडिटचे मनपा आयुक्तांचे आदेश..

    संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर दिले आदेश..

    दुसऱ्या लाटे दरम्यान झालेल्या सगळ्या मृत्यूचे होणार ऑडिट..

    तिसऱ्या लाटेच्या नियोजनाचा भाग म्हणून ऑडिट असल्याचा दावा

  • 25 Jul 2021 09:32 AM (IST)

    नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे अमरावती दौर्‍यावर

    अमरावती

    शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे आदेश

    अमरावती शहरातील विमा कंपनीच्या कार्यालयात अचानकपणे कृषी मंत्र्यांची भेट

    नुकसानग्रस्त भागाची पाहणी करन्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे अमरावती जिल्हा दौर्‍यावर

  • 25 Jul 2021 08:54 AM (IST)

    हिंगोलीत वारंवार भूगर्भातून गूढ आवाज येण्याच सत्र सुरूच, नागरिक भयभीत

    हिंगोली - जिल्ह्यात वारंवार भूगर्भातून गूढ आवाज येण्याच सत्र सुरूच

    आज 8 वाजून 22 मिनिटांनी जमीन हादरली

    वसमत, औंढानागनाथ ,कळमनुरी तालुक्यातील काही गावात आज सकाळी जमीन हादरली

    नागरिक भयभीत..

  • 25 Jul 2021 08:50 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा..

    विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या भेटीला.. थोड्याच वेळात होणार अजित पवार यांचे आगमन

  • 25 Jul 2021 08:01 AM (IST)

    नागपूरला कोरोनापासून मोठा दिलासा, फक्त 2 नव्या बाधितांची नोंद

    नागपूर -

    नागपूरला कोरोना पासून मोठा दिलासा

    शहरात गेल्या 24 तासात फक्त 2 कोरोना बाधितांची नोंद तर जिल्ह्यात 9

    21 रुग्ण बरे झाले तर एकाही रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू नाही

    बाधित कमी असले तरी जिल्ह्यात तपासण्या मात्र सुरू

    24 तासात 6 हजार 800 जणांची करण्यात आल्या तपासण्या

    97. 90 टक्के वर पोहचल आहे बरं होणाऱ्यांचं प्रमाण

  • 25 Jul 2021 07:56 AM (IST)

    नागपूर जिल्हापरिषद मारहाण प्रकरण, गज्जू यादव काँग्रेसमधून निलंबित, नाना पटोलेंची कारवाई

    नागपूर -

    जिल्हा परिषद सदस्य मारहाण प्रकरणी गज्जू यादव ला काँग्रेस मधून करण्यात आले निलंबित

    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई

    पक्षशिस्त मोडून गैरवर्तवणूक केल्याचा ठपका

    जिल्हा परिषद पोट निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झाला होता वाद

    जिल्हा परिषद सदश दुधाराम सव्वालाखे याना करण्यात आली होती मारहाण

    गज्जू यादव जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव

    या प्रकरणाची करण्यात आली होती काँग्रेस कमिटी कडून चौकशी

    त्यानंतर दिले आदेश

  • 25 Jul 2021 07:00 AM (IST)

    दूधविक्रीच्या कारणावरुन विरारमध्ये एका विक्रेत्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

    विरार:- दूध विक्री च्या कारणावरून विरार मध्ये एका दूध विक्रेत्याला 7 ते 8 जणांच्या घोळक्याने दुकानातून बाहेर काडून ठोसा बुक्यांनी बेदम मारहाण केली आहे.

    शिवकुमार शेरबहाद्दूर सिंह (वय 32) असे मारहाण झालेल्या होलसेल दूध विक्रेत्या इसमाचे नाव आहे.

    22 जुलै रोजी सव्वा दहा वाजता विरार पूर्व नारंगी बायपास रोडवर सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली आहे.

    मारहाणीचा सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या 5 ते सहा जणांनी दूध विक्रेत्याला पकडून, ठोसा बुक्यांनी बेदम मारहाण करून, जबरदस्तीने गाडीत बसवून नेऊन त्याच्या जवळचे पैसे ही काडून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    विरार पूर्व व पश्चिम परिसरात दूध विक्री करण्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचे समोर आली आहे.

    याबाबत दोन जणांवर विरार पोलीस ठाण्यात भादवी 362, 506,147,143,149,3/25, 392 प्रमाणे दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजन पाटील, दिनेश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नाव आहेत.

Published On - Jul 25,2021 6:47 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.