LIVE | देशातील सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 21:30 PM, 2 Mar 2021
LIVE | देशातील सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Mar 2021 21:30 PM (IST)

  सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

  सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे. तसेच , केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत.

 • 02 Mar 2021 21:05 PM (IST)

  विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद

  अकोला :  अकोल्यात आज विदर्भातील सर्वात जास्त तापमानाची नोंद,आज 39.5 सेल्सिअस तापमानाची नोंद….!

 • 02 Mar 2021 20:56 PM (IST)

  माझा लढा सत्यासाठी, पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता, शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप

  बीड: माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे.  मी सत्यासाठी लढा देत आहे. मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी गेला नाहीत न्याय मागण्यासाठी, पुजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांची खंत

  तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता, असा आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा, शांताबाईंचा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना आवाहन

 • 02 Mar 2021 20:22 PM (IST)

  नाशिक कोरोना अपडेट

  नाशिक कोरोना अपडेट –

  दिनांक: 2 मार्च 2021

  आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-315

  आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 383

  नाशिक मनपा- 266
  नाशिक ग्रामीण- 78
  मालेगाव मनपा- 27
  जिल्हा बाह्य- 12

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2114

  आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -05
  नाशिक मनपा- 03
  मालेगाव मनपा- 00
  नाशिक ग्रामीण- 02
  जिल्हा बाह्य- 00

 • 02 Mar 2021 20:22 PM (IST)

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपूर कोरोना अपडेट –

  नागपुरात आज 995 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  10 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

  तर 579 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या – 151660

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 138465

  एकूण मृत्यू संख्या – 4351

 • 02 Mar 2021 20:21 PM (IST)

  चंद्रपुरात गेल्या 24 तासात 64 नव्या रुग्णांची नोंद

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात 64 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 0 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 23760

  कोरोनामुक्त : 22997

  ऍक्टिव्ह रुग्ण : 364

  मृत्यू : 399

  एकूण नमूने तपासणी : 216032

 • 02 Mar 2021 19:35 PM (IST)

  यवतमाळ कोरोना अपडेट

  यवतमाळ कोरोना अपडेट

  यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट

  यवतमाळमध्ये दिवसभरात आज 511 जण कोरोना पॉझिटिव्ह, तर 194 जणांची कोरोनावर मात

  जिल्ह्यात सध्या 1803 अॅक्टिव्ह पोझिटिव्ह रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या 18 हजार 086 झाली आहे. त्यातील 15 हजार 816 जण बरे झालेलं आहेत. आतापर्यंत 467 जणांच्या मृत्यूची नोंद आहे

 • 02 Mar 2021 19:32 PM (IST)

  पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी फोडली पाईपलाईन

  सातारा : पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क फोडली पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन,

  मुंबई पुणे सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईन ला साताऱ्यातील सासवड गावाजवळ पाडले भगदाड…

  हजारो लीटर पेट्रोलचा जमिनीत झाला निचरा…

  वेळेत अलार्म वाजल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र पेट्रोल जमिनीत मुरल्याने शेतातील विहिरीतील पाण्याचा रंग बदलला….

  शेतांतील उभ्या पिकांचे देखील झाले नुकसान…

 • 02 Mar 2021 19:30 PM (IST)

  उस्मानाबादेत कोरोनाचे 40 रुग्ण, गेल्या आठ दिवसात किती रुग्णांची नोंद?

  उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे 40 रुग्ण सापडले

  उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 22 रुग्ण आज सापडले

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 169 ऍक्टिव्ह रुग्ण

  कोरोनाबाधित रुग्ण

  23 फेब्रुवारी – 12
  24 फेब्रुवारी – 17
  25 फेब्रुवारी – 26
  26 फेब्रुवारी – 16
  27 फेब्रुवारी – 28
  28 फेब्रुवारी – 20
  1 मार्च – 9
  2 मार्च – 40

  ग्राफिक्स –

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 169 ऍक्टिव्ह रुग्ण

  उस्मानाबाद – 1 लाख 29 हजार 597 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 338 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 13.44 टक्के

  16 हजार 587 रुग्ण बरे , 95.67 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

  582 रुग्णांचा मृत्यू , 3.36 टक्के मृत्यू दर

 • 02 Mar 2021 18:56 PM (IST)

  पुणे कोरोना अपडेट 

  पुणे कोरोना अपडेट
  …….
  – दिवसभरात 688 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात 498 रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. 1 रूग्ण पुण्याबाहेरील.
  – 278 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०३७९६.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५०९१.
  – एकूण मृत्यू -४८६४.
  -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९३८४१.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६१२४.

 • 02 Mar 2021 18:53 PM (IST)

  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होते, वानवडी पोलिसांत तक्रार

  पुणे –

  – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची वानवडी पोलिसांत तक्रार
  – अँड. रमेश खेमू राठोड यांनी केला पोस्टाने अर्ज
  – यामध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, युवा मोर्चा पुणे शहर आणि इतर अनेक गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  – पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचाही अर्जात उल्लेख
  – फ्लॅट बंद असतांना मोबाइल आणि लॅपटॉप मधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर गेली कशी असा सवालही उपस्थित करण्यात आलाय
  – मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांनाही याबाबत पत्रव्यवहार

 • 02 Mar 2021 18:24 PM (IST)

  अविनाश चव्हाण टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

  यवतमाळ- नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर हल्ला करणाऱ्या अविनाश चव्हाण टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, अविनाश चव्हाणसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई, अविनाश चव्हाण या रेती तस्कराने केला होता नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर चाकू हल्ला

 • 02 Mar 2021 18:23 PM (IST)

  अमरावतीत कोरोनाचा कहर सुरु, 636 जणांना लागण

  अमरावती कोरोना फ्लॅश

  अमरावती जिल्ह्यात  कोरोनाचा कहर सुरूच…

  जिल्हात आज 636 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण….

  आज तब्बल 12 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू….

  -अमरावती जिल्हात आतापर्यंत 36452 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण ..

  -आज 317 रुग्णांनी केली कोरोनावर मात…

  -आतापर्यंत29848 रुग्णांनी केली कोरोनावर मात…

  -जिल्हात आतापर्यंत 533 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

  -6071 रुग्णांवर उपचार सुरु

 • 02 Mar 2021 18:21 PM (IST)

  मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर

  मुंबई/ नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे.  याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे  (Raj Thackeray) ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.

 • 02 Mar 2021 18:02 PM (IST)

  हिंगोलीत 56 जणांना कोरोनाची लागण

  हिंगोली – आज 56 जणांना नव्याने कोरोनाची लागण,

  10 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला,

  हिंगोलीची करोनाबधितांची संख्या पोचली 4195 वर,

  त्या पैकी 3839 जणांना मिळाला डिस्चार्ज ,

  296 रुग्णांवर उपचार सुरु तर

  आता पर्यंत 60 रुग्णांचा मृत्यू..

 • 02 Mar 2021 17:35 PM (IST)

  मौजमजेसाठी अल्पवयीन मुलाकडून सायकल चोरी, नाशिक पोलीसांकडून अटक

  नाशिक : मौज मजा करण्यासाठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने सुरू केला सायकल चोरीचा नवा फंडा
  – नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलाला पाहून पोलीस ही झाले आवाक
  – 8 चोरीच्या सायकली पोलिसांनी केल्या हस्तगत
  – गेल्या अनेक दिवसांपासून इंदिरानगर परिसरात सायकल चोरी होत असल्याने पोलीस होते चोरट्यांच्या मागावर
  – गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

 • 02 Mar 2021 17:29 PM (IST)

  रायगडमध्ये धावत्या मोटार सायकलने अचानक घेतला पेट

  रायगड

  धावत्या मोटार सायकलने अचानक घेतला पेट

  मुंबई गोवा महामार्गावर महाड एस टी स्टँड समोरची घटना

  आगीत मोटार सायकल जळून खाक

  प्रतापगडहून मुंबईकडे निघाला होता दुचाकीस्वार

  प्रसंगावधानतेमुळे बचावला दुचाकीस्वार

 • 02 Mar 2021 17:02 PM (IST)

  भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करणार, शिवसेना उपजिल्हा प्रमुखाची माहिती

  भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार

  औरंगाबाद ग्रामीण पोलीस जाणीपूर्वक आ.प्रशांत बंब यांच्यावर कारवाई करत नाही

  शिवसेना उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर

  गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील अपहार प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे मात्र याप्रकरणी अद्यापही ठोस अशी कारवाई होत नसल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला आहे… याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस जाणीपूर्वक टाळाटाळ करत असून आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचं डोणगावकर यांनी सांगितले.

 • 02 Mar 2021 16:38 PM (IST)

  पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप वकील आघाडीतर्फे खाजगी खटला दाखल

  ब्रेक –

  – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप वकील आघाडीतर्फे खाजगी खटला दाखल,

  – पुण्यातल्या लष्कर कोर्टातमध्ये खटला दाखल,

  – पोलिसांना संबंधित प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश कोर्टाने देण्याची मागणी,

  – भाजप वकील आघाडीच्या अध्यक्षा ऍड. ईशानी जोशी यांनी दाखल केला खटला,

  – आज 4 वाजता लष्कर कोर्टात होणार सुनावणी

 • 02 Mar 2021 16:36 PM (IST)

  उरण तालुक्यातील BPCL प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा

  रायगड

  उरण तालुक्यातील BPCL प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा.

  BPCL प्रकल्पातील 80 % जमिन ही भेडंखळ गावातील शेतकऱ्याकडून सपांदित केली आहे.

  उरण तालुक्यातील भेडंखळ गावातील 207 एकर जमीन प्रकल्पासाठी 1990 मध्ये सपांदित करुनही अद्याप 90 प्रकल्पग्रस्तांना कपंनीकडून रोजगार नाही.

  पैकी 4 प्रकल्प ग्रस्तांना नोकरीत सामाविष्ट करुन घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश असतानाही कपंनीने कोणतीही दाद दिली नाही.

  अखेर प्रकल्पग्रस्तांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसून कपंनी विरोधात आक्रमक आंदोलन व उपोषणाची भूमिका घेतली आहे.

 • 02 Mar 2021 15:45 PM (IST)

  पिंपरी चिंचवडमधील जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार

  पुणे : पिंपरी चिंचवडमधील जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू केले जाणार, जम्बो हॉस्पिटलमध्ये आता केवळ व्हेंटिलेटर बेड सुरु केले जाणार, आयसीयूच्या रुग्णांवर ससूनमध्ये उपचार केले जाणार, येत्या आठवड्याभरात जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

 • 02 Mar 2021 15:42 PM (IST)

  नवी मुंबईत आघाडीत बिघाडीचे चिन्ह कायम, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी

  नवी मुंबई

  नवी मुंबईत आघाडीत बिघाडीचे चिन्ह कायम

  निवडणुकीआधीच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी

  नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर पक्ष सोडण्याच्या तयारीत

  70 % राष्ट्रवादी युवक नवी मुंबईतील पक्षांच्या वरिष्ठवर नाराज

  निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची राजेश भोर यांची tv9 ला दिली माहिती

  जागावाटपात सुद्धा घोळ असल्याचा आरोप

  पक्षात सुरू असलेल्या गटबाजी वरून सतत होणाऱ्या राजकारण आणि राजकीय कुचंबना याला कंटाळून वरिष्टांवर व्यक्त केली नाराजी

  लवकरच पत्रकार परिषद घेऊन कुठल्या पक्षात जाणार करणार घोषणा

 • 02 Mar 2021 14:46 PM (IST)

  वसई, विरार, नालासोपारासह आजूबाजूच्या परिसरात जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 8 जणांना अटक

  वसई, विरार, नालासोपारासह आजूबाजूच्या परिसरात जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करून फरार होणाऱ्या टोळीचा वसईत वालीव पोलिसांनी भांडाफोड, या टोळीतील 8 जणांना अटक केले असून त्यांच्याकडून 19 गंभीर गुन्ह्याचा उकल करीत 9 लाख 24 हजार 655 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे

 • 02 Mar 2021 14:45 PM (IST)

  पुणे, पिंपरी-चिंचवडचे जम्बो हॉस्पिटल सुरु केले जाणार

  पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवडचे जम्बो हॉस्पिटल सुरु केले जाणार, जम्बो हॉस्पिटलमध्ये आता केवळ व्हेंटिलेटर बेड सुरु केले जाणार, आयसीयुचे रुग्ण ससूनमध्ये ट्रीट केले जाणार, आठवड्याभरात जम्बो सुरू होणार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

 • 02 Mar 2021 13:58 PM (IST)

  सांगली महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर भाजपकडून कारवाईला सुरुवात

  सांगली : महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर भाजपकडून कारवाईला सुरुवात, सहा भाजप नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस, तर सहयोगी नगरसेवक घाडगे बाबत ही वकिलांशी चर्चा करून कारवाई करणार, भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांची माहिती

 • 02 Mar 2021 13:02 PM (IST)

  गोकुळ दूध संघ निवडणुकीचा मार्ग मोकळा

  कोल्हापूर – गोकुळ दूध संघ निवडणुकीचा मार्ग मोकळा, निवडणूक पुढे ढकलण्या संदर्भातील याचिका सत्ताधारी गटाने घेतली मागे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारी गटाने केली होती याचिका, निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडीना येणार वेग, पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येणार

 • 02 Mar 2021 12:59 PM (IST)

  अकोल्यात आज 147 रुग्ण पॉझिटीव्ह, एकूण कोरोना बाधितांचा आकडा 16,820 वर

  आज सकाळच्या अहवालात 147 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत, एकूण कोरोना बाधितांचा आकडा 16,820 झाला आहे, आज सकाळी उपचारा दरम्यान 1 जणाचा मृत्यू झाला आहे,

  *कोरोनामुळे आतापर्यंत 371 जणांचा मृत्यू

  *आज 272 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे

  *तर 12574 जणांनी कोरोनावर मात केली आहे

  *उपचार घेत असलेले रुग्ण 3875 आहेत

  *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती

 • 02 Mar 2021 11:44 AM (IST)

  पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल चोरी जोमात

  पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल चोरी जोमात, खारघरमध्ये सोसायटीच्या गाड्यांमधून पेट्रोल चोरी, चोरी करतानाची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

 • 02 Mar 2021 11:33 AM (IST)

  भाजप नेत्या चित्रा वाघ या बीकेसी पोलीस ठाण्यात पोहोचल्या, फोटो माॅर्फिंग प्रकरणी रश्मी करंदिकर यांची भेट घेणार

  भाजप नेत्या चित्रा वाघ या बीकेसी पोलीस ठाण्यात पोहोचल्या, फोटो माॅर्फिंग प्रकरणी रश्मी करंदिकर यांची भेट घेणार, काही दिवसांपुर्वी झाला होता फोटो व्हायरल, याची रितसर तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचल्या पोलीस ठाण्यात

 • 02 Mar 2021 11:16 AM (IST)

  मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस-दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात

  सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे शिवशाही बस आणि दारु वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, दारु वाहतूक करणारा आयशर टेम्पो थांबला असताना मागून शिवशाही बसने दिली धडक, अपघातस्थळी दारूच्या बाटल्यांच्या काचेचा खच, दोन्ही गाड्यांचे नुकसान, शिवशाही बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी.

 • 02 Mar 2021 10:40 AM (IST)

  बीडच्या शासकीय वेअर हाऊसला भीषण आग, 75 कोटींचा कापूस जळून खाक

  बीड : शासकीय वेअर हाऊसला भीषण आग, 75 कोटींचा कापूस जळून खाक, जप्ती पारगाव येथील वेअर हाऊसला भीषण आग, अग्निशामक दलाकडून दहा तासांनंतर आग नियंत्रणात, आगीत सर्वच कापूस जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

 • 02 Mar 2021 10:31 AM (IST)

  खेड नगरपरिषदेचे मनसे नगराध्यक्ष अपात्र प्रकरण, आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी

  रत्नागिरी – खेड नगरपरिषदेचे मनसे नगराध्यक्ष अपात्र प्रकरण, आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी, सुनावणीकडे सर्वांचे लक्ष, खेड नगरपरिषदेतील 9 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात तब्बल 15 अपात्रतेचे प्रस्ताव, वैभव खेडेकर यांच्यावर 77 लाखांचा डिझेस घोटाळ्याचा मुख्य आरोप

 • 02 Mar 2021 10:28 AM (IST)

  ज्येष्ठ नागरीकांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस, नागपूर मनपाच्या लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी

  ज्येष्ठ नागरीकांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस, नागपूर मनपाच्या लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा,  कोव्हिडचे नियम धाब्यावर बसवून सुरु आहे लसीकरण,  नागपूर महानगरपालिकेच्या लसीकरणा दरम्यान अपुरी व्यवस्था

 • 02 Mar 2021 10:25 AM (IST)

  भाजप आमदार राम सातपुतेंचे वीज बिलांविरोधात आंदोलन

  भाजप आमदार राम सातपुते यांनी वाढीव वीज बिलांवरुन विधानभवन परिसरात आंदोलन केले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

 • 02 Mar 2021 09:39 AM (IST)

  प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरल्यामुळे नायर रुग्णालयाच्या ‘त्या’ डॉक्टरची आत्महत्या

  प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरल्यामुळे नायर रुग्णालयाचे डॉक्टर भीमसंदेश तुपे यांनी आत्महत्या केली, 15 फेब्रुवारीला नायर रुग्णालयात डॉक्टर भीमसंदेश तुपे यांनी आत्महत्या केली होती, आता त्याचं कारण उघड झालं आहे, डॉक्टर भीमसंदेश तुपे यांच्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरल्यामुळे डॉक्टर तुपे यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासत समोर आलं आहे, तुपे यांच ज्या महिलेवर प्रेम होतं, ती नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, हे दोघे MBBS चं शिक्षण घेत होते जिथे या दोघांच एकमेकांवर प्रेम झालं, पुढील अभ्यासासाठी तुपे मुंबईत आले आणि महिला नागपूरमध्ये शिक्षण घेऊ लागली, ज्यानंतर दोघं फोन आणि मॅसेजवर एकमेकांच्या संपर्कात होते

 • 02 Mar 2021 09:17 AM (IST)

  नंदुरबार तालुक्यातील ठानेपाडा जंगलात मोठी आग

  नंदुरबार : तालुक्यातील ठानेपाडा जंगलात मोठी आग, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागली आग, स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचारी व नंदुरबार पालिकेच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू, जंगलात मोठ्या प्रमाणात मोर आणि इतर वन्यजीव आसल्याने त्यांना धोका पोचण्याची शक्यता

 • 02 Mar 2021 09:15 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखाना अखेर विक्रीला, राज्य सहकारी बँकेने कारखाना काढला विक्रीला

  औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखाना अखेर विक्रीला, राज्य सहकारी बँकेने कारखाना काढला विक्रीला, राज्य सहकारी बँकेकडून कारखाना विक्रीसाठी वर्तमान पत्रात जाहिरात, कारखाना विक्रीसाठी निघाल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का, गंगापूर साखर कारखान्यात झाले होते मोठ्या प्रमाणात घोटाळे, कारखाना घोटाळा प्रकरणी संचालक मंडळावर दाखल होते गुन्हे, सभासदांची देणी थकल्यामुळे कारखाना विक्रीला काढल्याची प्राथमिक माहिती

 • 02 Mar 2021 09:14 AM (IST)

  सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याविषयी 7 मार्चनंतर निर्णय

  सोलापुर – विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याविषयी 7 मार्चनंतर होणार निर्णय, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन घ्यायची की नियमित घ्यायची याचा निर्णय घेणार, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या परीक्षा घेण्याचे नियोजन, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत ऑनलाईन

 • 02 Mar 2021 08:34 AM (IST)

  भरधाव घंटागाडीची दुचाकीला धडक, धुळे सोलापूर महामार्गावरील घटना

  औरंगाबाद : भरधाव घंटागाडीची दुचाकीला धडक, धुळे सोलापूर महामार्गावर दिली धडक, अपघातात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू, तर दुचाकीचालक पती गंभीर जखमी, कन्नड नगरपरिषदेच्या घंटागाडीची दिली होती जोरदार धडक

 • 02 Mar 2021 08:10 AM (IST)

  शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून होणार सुरु

  कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 22 मार्चपासून होणार सुरु, विविध पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश, ऑनलाइन ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार परीक्षा, परीक्षेसाठी ओएमआर शीट चा वापर करण्याची परीक्षा नियोजन समितीची शिफारस, 80 टक्के अभ्यासक्रमवार होणार परीक्षा

 • 02 Mar 2021 08:10 AM (IST)

  कोल्हापुरात शिक्षिकेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, जयसिंगपूरमधील शाळेतील प्रकार

  कोल्हापूर – शिक्षिकेचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह, जयसिंगपूरमधील शाळेतील प्रकार, शिक्षिकाच पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ, संपर्कात आलेल्या 20 शिक्षकेसह 120 विद्यार्थी होम क्वारंटाईन

 • 02 Mar 2021 08:06 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात 702 ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण

  नागपूर जिल्ह्यात 702 ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण, 45 वर्षावरील 47 लाभार्थ्यांना कोरोनाची लस, नागपूर मनपा हद्दीत 575 ज्येष्ठ नागरीकांनी घेतली लस, ग्रामीणमध्ये ज्येष्ठांचा फारसा प्रतिसाद नाही, 127 नागरिकांनी घेतली लस, कोरोना लसीकरणाचा ज्येष्ठ नागरीकांना आधार

 • 02 Mar 2021 08:04 AM (IST)

  पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठांच्या विरुद्धच्या लसीकरणास अॅपचा खोडा

  पिंपरी चिंचवड – शहरातील ज्येष्ठांच्या विरुद्धच्या लसीकरणास अॅपचा खोडा, पहिल्या दिवशीच उडाला फज्जा अनेक नागरिकांची नावे नसल्याने गोंधळ, पहिल्याच दिवशी तासन-तास केंद्रावर ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागला त्रास, शहरात 11 खासगी रुग्णालयांमध्ये तर 08 महापालिका रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध,त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जात आहे

 • 02 Mar 2021 08:00 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 रुग्णांची वाढ, कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला 50,591 वर

  औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 रुग्णांची वाढ, कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला 50,591 वर, सध्या रुग्णालयात 2192 रुग्णांवर उपचार सुरू, तर जिल्ह्यातील 130 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, उपचारादरम्यान काल दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर मृतांचा आकडा पोचला 2192 वर

 • 02 Mar 2021 07:53 AM (IST)

  आजपासून नाशिक शहरातील शाळा 15 मार्च पर्यंत बंद

  नाशिक – आजपासून शहरातील शाळा 15 मार्च पर्यंत बंद, कोव्हिड रुग्णांचा वाढता आकडा बघता प्रशासनाचा निर्णय, 15 मार्चला घेणार पुढचा आढावा, पालकांची संमती असेल तरच 10 आणि 12 च्या विद्यार्थ्याना प्रवेश

 • 02 Mar 2021 07:52 AM (IST)

  येत्या 4 तारखेला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

  नाशिक – येत्या 4 तारखेला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, उदयनराजे यांच्या आप्तेष्ठांच्या विवाहसोहळ्याला लावणार हजेरी, दौऱ्या दरम्यान निवडक मनसे पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा, गर्दी न करण्याचे राज यांचे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी याना आवाहन

 • 02 Mar 2021 07:19 AM (IST)

  नागपुरात वडिलाने केली चिमुकलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या

  वडिलाने केली चिमुकलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या, नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील घटना, गणेशपूर गावात घडली धक्कादायक घटना,  पती, पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली होती, पत्नी पोलिसांत तक्रार द्यायला गेली असता पतीने केली मुलीची हत्या,  राधिका किशोर सयाम असं मृतक दोन वर्षांच्या चिमुकलीचं नाव, बुट्टीबोरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

 • 02 Mar 2021 07:16 AM (IST)

  मालमत्ता कर थकल्याने नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात

  मालमत्ता कर थकल्याने नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात,  नागपूरातील 3.27 लाख मालमत्ताधारकांकडे 480 कोटी थकीत, सरकारी कार्यालयाकडे 100 कोटींची मालमत्ताकराची थकबाकी, मुख्य आर्थिक स्त्रोत असलेला मालमत्ता कर थकबाकीचा मनपाला मोठा फटका, मालमत्ताकर वसुलीसाठी मनपाचे प्रयत्न सुरु

 • 02 Mar 2021 07:01 AM (IST)

  नागपुरात ‘मी जबाबदार’ मोहीमेला, बेजबाबदारांकडून केराची टोपली, एसटीचे वाहक आणि चालकंच विनामास्क

  मी जबाबदार मोहीमेला, बेजबाबदारांकडून केराची टोपली, एसटीचे वाहक आणि चालकंच सर्रास वावरतात विनामास्क, कोरोनाच्या या स्प्रेडरवर कारवाई कधी होणार?, रोज हजारो प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक विनामास्क, टीव्ही-9 च्या कॅमेऱ्याच कैद झाले, बस स्थानकातील बेजबाबदार, नागपूर गणेशपेठ बसस्थानकातील वास्तव, तिकीट काढतानाही वाहक सर्रास विनामास्क, एसटी महामंडळ या बेजबाबदारांवर कारवाई करणार?, विदर्भात रोज हजारो रुग्ण वाढतात, तरिही लोक विनामास्क सर्रास

 • 02 Mar 2021 06:44 AM (IST)

  आज या वर्षातील  पहिली अंगारकी संकष्टी, सिद्धिविनायक मंदिरात ऑफलाइन दर्शन पूर्णपणे बंद

  आज या वर्षातील  पहिली अंगारकी संकष्टी, राज्यात करोनाच्या संसर्गाचा प्रभाव वाढता लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक ऑफलाइन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, ऑनलाईन पद्धतीच्या नियोजित वेळेत क्यूआर कोड असणाऱ्या भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे, आठच्या नंतर मंदिर प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मंदिराच्या बाहेर स्क्रीन लावून दर्शनासाठी सुविधा करण्यात आलेली आहे, दरवर्षी अंगारकी चतुर्थीला जशी गर्दी असते तशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी पाहायला मिळत नाही,  बरेच लोक बाहेरुनच सिद्धिविनायक गणपतीच दर्शन घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे

 • 02 Mar 2021 06:26 AM (IST)

  नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात अधिकाऱ्यांची टंचाई

  तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात अधिकाऱ्यांची टंचाई निर्माण झालीय,  बिलोली तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयाचे कामकाज प्रभारींच्या जीवावर चालतंय, सीमावर्ती भाग असल्याने इथे येण्यास अनेकजण उत्सुक नसतात, त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालये प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात सोपवण्यात आलीय, प्रभारी अधिकाऱ्यांना निर्णय क्षमतेचे अधिकार नसल्याने सर्वसामान्यांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. त्यातून सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, बिलोली तालुक्यातील हा प्रभारी राज संपवून अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय

 • 02 Mar 2021 06:24 AM (IST)

  अहमदनगर जिल्ह्यात अट्टल दरोडेखोरांना अटक, 25 तोळे सोन्यासह 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश, या दरोडेखोरांकडून तब्बल 25 तोळे सोन्यासह 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे