LIVE | चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस

| Updated on: May 14, 2021 | 1:08 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 May 2021 10:06 PM (IST)

    चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस

    चंद्रपूरर : चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस

    2 दिवसापासून शहरात तापमानात आहे मोठी वाढ

    उच्चांकी तापमानानंतर वादळी वाऱ्यासह  पाऊस

    अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा

    वाढत्या तापमानाने त्रस्त असलेल्या चंद्रपूरकरांना अल्पसा दिलासा

  • 13 May 2021 10:05 PM (IST)

    बुलडाण्यातील तबलीगी जमातच्या 12 सदस्यांविरुद्धचा एफआयआर रद्द

    – बुलडाण्यातील तबलीगी जमातच्या 12 सदस्यांविरुद्धचा एफआयआर रद्द

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

    – कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियंमांचं उल्लंघन केल्याचा होता आरोप

    – बुलडाणा पोलिसांनी दाखल केलेला FIR न्यायालयाने केला रद्द

    – आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम 54 अन्वये नोंदवला होता एफआयआर

  • 13 May 2021 06:14 PM (IST)

    ‘रमजान ईद’निमित्त अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

    मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना केली आहे. रमजान ईद आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्वबंधूत्वाची, सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातील गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्तानं दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

  • 13 May 2021 05:45 PM (IST)

    औरंगाबादेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तुफान मारामारी

    औरंगाबाद : रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तुफान मारामारी

    वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी गावात घडली घटना

    शेतकऱ्यांसह महिलांनाही केली बेदम मारहाण

    मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    मारहाणप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    शिऊर पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक नाही

    महिलांचा विनयभंग करत केली बेदम मारहाण

    महिलांचा विनयभंग आणि बेदम मारहाण प्रकरणाची पोलिसांकडून अजूनही गंभीर दखल नाही

  • 13 May 2021 05:36 PM (IST)

    नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक प्रसिद्ध उद्योजक राधाकिसन चांडक यांचे निधन

    नाशिक - प्रसिद्ध उद्योजक आणि पंचवटी हॉटेलसचे मालक राधाकिसन चांडक यांचे निधन

    वयाच्या 80 व्या वर्षी झाले निधन

    हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • 13 May 2021 05:18 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी कृष्णा माईला साकडे, निवेदन पाण्यात सोडून अनोखे आंदोलन

    सांगली - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कृष्णा माईला साकडे

    कृष्णा नदीच्या पात्रात मागण्यांचे निवेदन अर्पण करून अनोखे आंदोलन

  • 13 May 2021 04:20 PM (IST)

    वर्ध्यातील माग्मो संघटनेचं कामबंद आंदोलन स्थगित

    वर्धा : वर्ध्यातील माग्मो संघटनेचं कामबंद आंदोलन स्थगित

    जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित

    आमदार रणजित कांबळे यांच्यावर दाखल गुन्ह्यात वाढ करण्यासह साथरोग कायद्याअंतर्गत गुन्ह्यात वाढ करण्याची केली आहे मागणी

    या संदर्भात कलम वाढवणार असल्याचे आश्वासन दिल्याची संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील बेले यांची माहिती

    सकाळी माग्मो संघटनेनं जिल्ह्यात तातडीची सेवा सुरू ठेऊन इतर कामबंद केल्याची माहिती

    आमदार रणजित कांबळेनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करत दिली होती धमकी

    जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी प्रकरणी आमदार कांबळे यांच्या विरोधात वर्धा शहर ठाण्यात तर दाखल आहे गुन्हा

  • 13 May 2021 02:58 PM (IST)

    तारापूर औद्योगिक परिसरातील प्लास्टिकच्या पाईपला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

    पालघर

    बोईसर तारापूर औद्योगिक परिसराच्या मैदानात ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पाईपला भीषण आग,

    आगबाजू उभ्या असलेल्या रिकामया केमिकल टेंकरला ही लागली आग,

    परिसरात आगीचे मोठे लोळ

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल,

    अग्निशमन जवानांकडून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

    आगीचे कारण अजूनही अस्पष्टच, कुठली ही जीवितहानी नाही,

  • 13 May 2021 01:01 PM (IST)

    कल्याणमध्ये बाईक चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अटक

    कल्याण स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेत बाईक चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. विक्की शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. विकीच्या अशा किती चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे याचा तपास पोलिस करीत आहे.

  • 13 May 2021 12:54 PM (IST)

    परमबीर सिंग यांना आम्ही अटक करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

    परमबीर सिंग यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच प्रकरण..

    पुढच्या सुनावणीपर्यंत परमबीर यांना आम्ही अटक करणार नाही - राज्य सरकारची हायकोर्टात माहिती...

    आठवड्याभरात परमबीर यांच्या याचिकेवर राज्यसरकारकडून रिप्लाय फाईल केला जाणार तोवर अटकेची कारवाई नाही...

    परमबीर यांनी त्यांच्यावर ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा यासाठी याचिका केलीय..

    अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय...

    20 मे ला होणार पुढील सुनावणी..

  • 13 May 2021 12:38 PM (IST)

    सहा दिवसांच्या लॉकडाऊनंतर लोणावळ्यात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

    लोणावळा,पुणे

    -सहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

    -लोणावळा शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता ब्रेक द चैन अंतर्गत लोणावळा शहरात मागील सहा दिवस कडक लॉकडाउन पाळण्यात आला होता

    -शासनाच्या आदेशानुसार आज लोणावळा शहरातील अत्यावश्यक सेवेमधील भाजीपाला व किराणा ही दुकाने सकाळी सात ते अकरा दरम्यान उघडण्यात आली होती त्यावेळी मोठी गर्दी उसळली

    -रमजान ईद आणि अक्षय तुतीया च्या पार्श्वभूमीवर साहित्य खरेदी करिता नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली

  • 13 May 2021 11:11 AM (IST)

    गडचिरोलीत चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

    गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात C 60 जवानांना यश

    मुरुमगाव जंगलात आज पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर चकमक केली

    या चकमकीच्या प्रत्युत्तर देताना गडचिरोली पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले

    एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती

    घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात नक्षलवाद्यांच्या शस्त्रसाठा जप्त

    अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू

    गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव येथील घटना मुरुमगाव छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेला जंगल क्षेत्र

  • 13 May 2021 10:40 AM (IST)

    मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती पडली लांबणीवर

    मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती पडली लांबणीवर,

    राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय होणार नाही शिक्षक भरती,

    मे आणि एप्रिल महिन्यात राज्यातील 3 हजार शिक्षकांची भरती होती प्रस्तावित,

    मात्र मराठा आरक्षण रद झाल्याने भरती प्रक्रीया कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह ...

    शिक्षक भरती होणाऱ्या पवित्र पोर्टलमध्येच तांत्रिक अडथळे मोठ्या प्रमाणात ,

    शिक्षण संचालनालयाने केला तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पाठवला प्रस्ताव

  • 13 May 2021 10:14 AM (IST)

    वादग्रस्त स्पर्ष हॉस्पिटलकडून नामांकित दैनिकाच्या पत्रकारावर खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

    पिंपरी चिंचवड -

    -वादग्रस्त स्पर्ष हॉस्पिटलकडून नामांकित दैनिकाच्या पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

    -सुहास भाकरे असं आरोपी पत्रकाराचे नाव

    -5 लाख रुपये खंडणी घेतल्याचा आरोप

    -पैसे दिले नाही तर स्पर्श रुग्णालयाविरोधात बातम्या देण्याची दिली होती धमकी

    -त्यामुळे भाकरे यांना देण्यात आले होते पैसे,काही रक्कम रोख तर काही बहिणीच्या खात्यावर टाकल्याचा स्पर्श चा दावा

    -महापालिकेचे ऑटो क्लस्टर कोविड सेंटर चालवले जात होते स्पर्श हॉस्पिटल कडून

    -बेड साठी पैसे घेणे, रेमडिसिव्हीर चा काळा बाजार, रुग्णांचे दागिने चोरी या मुळे महापालिकेने स्पर्श कडून काढून घेतले होते कोविड सेंटर

    -या नंतर आता स्पर्श कडून पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

  • 13 May 2021 09:47 AM (IST)

    जिल्हा आरोग्य अधिकारी शिवीगाळ प्रकरण, आमदार कांबळेवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्याची मागणी

    वर्धा -

    - आमदार रणजीत कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी शिवीगाळ प्रकरण

    - आमदार कांबळेवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या कलमात वाढ करा

    - डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेची मागणी

    - कलमात वाढ न केल्यास डॉक्टरांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

    - आज पासून काम बंद आंदोलन करणार असल्याची घोषणा

    - आमदार कांबळेवर वर्धा शहर आणि देवळी शहर पोलिसात दोन दिवसांपूर्वी दाखल झाला आहे गुन्हा

    - अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

  • 13 May 2021 09:36 AM (IST)

    जामखेड शहरात पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

    अहमदनगर

    जामखेड शहरात पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

    शहरातील बीड रोड परसातील घटना

    शिल्पा अजय जाधव वय २८ अस पत्नीचे नाव

    तर पत्नीने आत्महत्या केल्याच समजताच अजय कचरदास जाधव वय ३२ याने देखील दुसर्‍या ठीकाणी काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली

    पती पत्नी यांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप काही समजु शकले नाही.

    तर पतीने आत्महत्या करण्याच्या पुर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की माझ्या आत्महत्यास मी जबाबदार असुन कोणासही दोषी ठरवू नये

  • 13 May 2021 08:19 AM (IST)

    पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा आणि पीएसह दहा जणांवर जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा

    पिंपरी चिंचवड

    - पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा आणि पीएसह दहा जणांवर जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    -आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे असं आमदार पुत्राचे नाव आहे

    -11 मेच्या दुपारी पिंपरी पालिकेचे कंत्राटदार सिजू ऍंथोनी यांच्या कार्यालयात ते घुसले आणि दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल

    -लोखंडी टॉमी सारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे

    -ऍंथोनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार हे कुठं आहेत.हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदार पुत्र आणि PA सह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचं गुन्ह्यात दाखल

  • 13 May 2021 08:08 AM (IST)

    राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या 26 सप्टेंबरला होणार

    पुणे -

    - राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या 26 सप्टेंबरला होणार,

    - परीक्षेसाठी १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत,

    - यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते.

    - आतापर्यंत ३६ वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे.

    - गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती.

    - आता विद्यापीठाकडून ३७ व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे,

    - २६ सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे,

    - परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संके तस्थळावर देण्यात आली आहे,

    - पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची माहिती

  • 13 May 2021 07:34 AM (IST)

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्या अडचणीत वाढ, गर्दी जमवल्याच्या प्रकरणाची हाय कोर्टाकडून गंभीर दखल

    औरंगाबाद -

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्या अडचणीत वाढ

    गर्दी जमवल्याच्या प्रकरणाची हाय कोर्टाकडून गंभीर दखल

    संदीपान भुमरे यांना वगळून गुन्हा कसा काय दाखल हायकोर्टाची विचारणा

    उद्घाटन कार्यक्रमासाठी गर्दी जमवल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल

    संदीपान भुमरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या दत्ता गोर्डे यांनी दाखल केलीय इंटरमिशन याचिका

    याचिकेवर हाय कोर्टात आज पुन्हा सुनावणी

    सुनावणीत संदीपान भुमरे यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता

  • 13 May 2021 06:46 AM (IST)

    आर्वी येथील तहसील कार्यालय परिसरातील एका इमारतीला भीषण आग

    वर्धा

    # आर्वी येथील तहसील कार्यालय परिसरातील एका इमारतीला भीषण आग

    # तहसील कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांतील कागदपत्रे जळाली

    # रजिस्ट्रार कार्यालय, रेकॉर्ड रुमचेही मोठे नुकसान

    # पहाटे अंदाजे साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली

    # काही विभागातील रेकॉर्ड सुरक्षित हलविण्याचा प्रयत्न

    # अग्निशमन दलमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

    # घटनास्थळी अधिकारी दाखल

    # अचानक लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट

  • 13 May 2021 06:28 AM (IST)

    मेट्रोच्या बोगद्याने केली मुठा नदी पार; जमिनीच्या खाली साकारतेय पुण्याची 'नवी' ओळख

    पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा मुठा नदीखालच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. खोदकाम करणारे टीबीएम आता नदीपार करून पूढे पोहचले आहे. नदीच्या तळाखालून 13 मीटर खोलीवर हा बोगदा आहे. नदीपुढे आता कसबा पेठेतील महापालिकेच्या दादोजी कोडदेव शाळेकडे खोदकाम सुरू होईल.

  • 13 May 2021 06:27 AM (IST)

    26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'नॉटी'ने घेतला अखेरचा श्वास

    मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री भीषण दहशतवादी हल्ला मुंबईच नाही तर देशातील नागरिक कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्याच्यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी मारली. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या कामात अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या 'नॉटी' या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॉटीने सोमवारी (10 मे) अखेरचा श्वास घेतला. तो 14 वर्षांचा होता.

  • 13 May 2021 06:26 AM (IST)

    शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय

    नाशिक: इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (दि.14) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा शहर-ए-खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मगुरूंच्या विभागीय बैठकीत बुधवारी संध्याकाळी करण्यात आली.

  • 13 May 2021 06:23 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाचे उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दादागिरी

    गडचिरोली जिल्ह्यात आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाचे उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दादागिरी,

    कोरोणा रुग्णांची विचारपूस करिता ना नोडल अधिकारी डॉक्टर अभिजीत मारबते यांना मारहाण

    डॉक्टरला मारहाण प्रकरणी डॉक्टर संघटनेकडून निषेध

    गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची डॉक्टर संघटनेची मागणी

    डॉक्टर संघटनेची गडचिरोली ची मागणी

    अद्याप गुन्हा दाखल नाही

    डॉक्टर संघटनाकडून आरमोरी येथे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

Published On - May 13,2021 10:06 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.