Maharashtra News LIVE Update | राज्यातील 24 साखर कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा, पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुख यांनासुद्धा दणका

| Updated on: May 28, 2021 | 12:17 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्यातील 24 साखर कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा, पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुख यांनासुद्धा दणका
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 May 2021 11:32 PM (IST)

    राज्यातील 24 साखर कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा, पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुख यांनासु्द्धा दणका

    पुणे : पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुखांना साखर आयुक्तांचा दणका

    – थकीत एफआरपीप्रकरणी पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुख यांच्या कारखान्यासह राज्यातील 24 साखर कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा

    – 657 कोटी थकीत एफआरपीप्रकरणी राज्यातील 160 पैकी 24 कारखान्यांना नोटिसा

    – यामध्ये आमदार समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्याही कारखान्यांचा समावेश

  • 27 May 2021 08:14 PM (IST)

    मुंबईमध्ये मेट्रो तीन आणि मेट्रो सातचे ट्रायल 31 मे रोजी होणार, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

    अस्लम शेख

    मुंबई : मेट्रो तीन आणि मेट्रो सातचे ट्रायल 31 मे रोजी होणार

    मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

    पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

    काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना मेट्रो महाराष्ट्रात सुरू झाली

    दुसऱ्या टप्प्याला उशीर झालाय. पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मी मेट्रो आणि कोस्टल रोडचा आढावा घेत आहोत.

    मेट्रो आणि कोस्टल रोड आमच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आधी पूर्ण करायचा आहे. आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे.

    कार शेडचा प्रश्नही लवकर सुटेल असा विश्वास आहे

    मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा विश्वास

  • 27 May 2021 07:54 PM (IST)

    अवकाळी पावसाचा तडाखा, रावेर तालुक्यातील तापी पट्ट्यात केळीच्या बागा भुईसपाट

    जळगाव : अवकाळी पावसाचा तडाखा

    -रावेर तालुक्यातील तापी पट्ट्यात केळीच्या बागा भुईसपाट

    गारपीट, पाऊस, वादळाने अनेक घरांचे नुकसान

    तालुक्यातील विटवा, ऐनपूर, निंबोल, खिर्डी, सुलवाडी, वाघाडी रेंभोटा यासह परिसरात परिसरातील केळीच्या बागा भुईसपाट

    याशिवाय अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर

    वादळामुळे वीजपुरवठादेखील खंडित

  • 27 May 2021 07:35 PM (IST)

    दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम, मूल्यमापन करून उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव

    मुंबई - दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

    - दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव

    - मूल्यमापनासाठी नववी आणि दहावीतील आतापर्यंतच्या गुणांचा आधार घेतला जाण्याची शक्यता

    - मुख्यमंत्र्यांबरोबर झाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा

  • 27 May 2021 07:18 PM (IST)

    चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

    नागपूर : चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 27 May 2021 07:07 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 2675 नवे कोरोनाबाधित, 33 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    सातारा : सातारा जिल्ह्यात आज 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 33 बाधितांचा मृत्यू

    1127 नागरिकांना आज डिस्चार्ज

    आजपर्यंतची कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -737795 एकूण बाधित - 158026 घरी सोडण्यात आलेले -132990 मृत्यू -3562 उपचारार्थ रुग्ण-21465

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 27 May 2021 06:55 PM (IST)

    फिल्म प्रोड्युसर आणि बिल्डर युसूफ लकडावाला याची ईडीकडून चौकशी

    मुंबई : फिल्म प्रोड्युसर आणि बिल्डर युसूफ लकडावाला याची चौकशी सुरू

    ईडीच्या अधिकाऱ्यां कडून चौकशी सुरु

    आज युसूफ याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यलयात आणलं

    युसूफ लकडावाला याच्या विरोधात EOW ने गुन्हा दाखल केला आहे

    हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरू केला आहे.

    लकडावाला याच्यावर हैदराबादच्या निजामाची खंडाळा येथील 50 कोटी रुपयांची जमीन लटल्याचा आरोप आहे.

  • 27 May 2021 06:38 PM (IST)

    पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास मनविसेचा विरोध 

    पुणे - पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास मनविसेचा विरोध

    - 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची मनसेची मागणी

    - विज्ञान शाखा वगळता इतर अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसताना 100 % अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची ? मनसेचा सवाल

    - एकंदरीत विद्यापीठाचे हे धोरण शिक्षण हीत न जपता हेकेखोर वृत्तीचे फलित असल्याचा आरोप

  • 27 May 2021 06:33 PM (IST)

    तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना 252 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

    तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर

    सुमारे 252 कोटी रुपयांची राज्य सरकार नुकसान भरपाई देणार

    कोकणवासीयांना दिलासा देण्याचा सरकारचा निर्णय

    मंत्री उदय सामंत यांची माहिती

  • 27 May 2021 06:17 PM (IST)

    मान्सूनबाबत दिलासादायक बातमी, मान्सून अंदमान आणि दक्षिणपूर्व बंगालमध्ये दाखल  

    मुंबई : मान्सूनची दिलासादायक बातमी

    मान्सूनच्या प्रवासात प्रगती

    मान्सून अंदमान आणि दक्षिणपूर्व बंगालमध्ये दाखल

    बंगालच्या विविध भागात मान्सूनची आज हजेरी

    लवकरचं मान्सून केरळात होणार दाखल

    पुणे हवामान वेधशाळेची माहिती

  • 27 May 2021 05:44 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड परिसराला वादळी पावसाचा तडाखा

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड परिसराला वादळी पावसाचा तडाखा

    अर्ध्या तासाहून अधिक काळ कोसळला वादळी पाऊस

    वादळी पावसामुळे पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

    वादळी पावसामुळे पाचोड परिसरातील फळ-पिकांचे मोठे नुकसान

    अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • 27 May 2021 05:32 PM (IST)

    औंधमध्ये ईडीची वेरॉन ग्रुपच्या ऑफिसवर धाड, 166 कोटीची मालमत्ता केली जप्त 

    पुणे : औंधमध्ये ईडीची वेरॉन ग्रुपच्या ऑफिसवर धाड

    औंधच्या आनंद पार्क परिसरात आहे वेरॉन ग्रुपचं कार्यालय

    बँक घोटाळा प्रकरणी कार्यालयावर धाडी

    रत्नागिरी, मुंबई आणि पुण्यात ईडीची कारवाई

    ईडीनं 166 कोटीची मालमत्ता केली जप्त

    ईडीने दुपारच्या सत्रात टाकली धाड

    बनावट बिलांच्या आधारे लेटर ऑफ क्रेडीटमध्ये सवलत दिल्याचा आरोप

  • 27 May 2021 05:30 PM (IST)

    चंद्रपूरमधील दारू बंदी उठवली, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    चंद्रपूरमधील दारू बंदी उठवली

  • 27 May 2021 05:10 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट

    जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पाऊस

    तालुक्यातील नायगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

    अनेक घरांचे पत्रे उडाली, लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 27 May 2021 05:08 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील कामरागाव परिसरात रिमझिम पाऊस

    वाशिम : वाशिममध्ये वातावरण बदलाचा परिणाम

    जिल्ह्यातील कामरागाव परिसरात रिमझिम पाऊस सुरू

  • 27 May 2021 04:37 PM (IST)

    इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र देशात पहिला, मागील वर्षी 36 लाख टन साखर शिल्लक

    पुणे - इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र देशात पहिला

    - 93 टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिले आहे

    - 19 साखर कारखान्यांनी तैवानला ऑक्सिजन प्लांटची ऑर्डर दिली आहे, लवकरच ते कार्यान्वित होतील

    - मागील वर्षी 36 लाख टन साखर शिल्लक होती

    - यावर्षी 106 लाख साखरेचं उत्पादन झाले आहे

    - गेल्या पाच वर्षात इथेनॉलचे उत्पन्न झाले नाही ते यावर्षी झाले आहे

    - एकूण 189 सहकारी आणि खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला

    - गाळपची क्षमता 76 हजार टन वाढली आहे

    - 1012 लाख टन यावर्षी गाळप झाले आहे

  • 27 May 2021 02:43 PM (IST)

    गडचिरोलीत विनाकारण फिरणे पडले महागात, 100 हून अधिक दुचाकी जप्त

    गडचिरोली सिरोंचा येथे विनाकारण फिरणे पडले महागात

    सिरोंचा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी विनाकारण फिरणार यांवर कारवाई करून जवळपास शंभर दुचाकी जप्त केलेली आहे

    मास्क ना लावणे विनाकारण फिरणे अशांवर कारवाई करून जवळपास दहा हजार रुपयांचा दंड या 100 नागरिकांकडून वसूल केले,

    गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू असल्याने अकरानंतर मोठी गर्दी बाजारात दिसली त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली

    आज काळक कारवाई करीत पोलिस विभाग चोख बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी देत आहे

    कोरोना पादुर्भावला आळा घालण्यासाठी पोलिस विभागाचे मोठे प्रयत्न

  • 27 May 2021 02:21 PM (IST)

    सातवा वेतन आयोग लागू करा, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

    पुण्यात महापालिका कर्मचाऱ्याचे सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी निषेध आंदोलन,

    महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचारी काळ्या फिती लावून करतायेत महापालिकेचा निषेध,

    कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करण्याची करण्याची मागणी,

    महापालिकेच्या आरोग्य विभाग, अग्निशमन दल,अभियंता विभाग आणि नोंदणीकृत कर्मचारी संघटनांच निषेध आंदोलन,

    पुण्यातील भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत महापालिकेचा केला निषेध ....

  • 27 May 2021 12:59 PM (IST)

    नागपुरातील धक्कादायक घटना, दारुड्या बापाकडून चिमुकल्याचा खून

    नागपूर -

    नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच एक वर्षीय चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    सत्यम भजन कौरती (१) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे

    तर भजन कौरती असे आरोपीचे नाव असून खापरखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

  • 27 May 2021 12:47 PM (IST)

    येणाऱ्या काळात विसंवादाचा स्फोट होईल : प्रविण दरेकर

    प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेटीवर प्रतिक्रिया

    • शरद पवार आणि माननीय मुख्यमंत्री यांची काल भेट झाली. • भेटीत तपशीलवार चर्चा काय झाली हे त्यांनाचं माहीत आहे. • आलेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या संबंधात नाराजी व्यक्त केली असेल तसेच पवार साहेबांनी सुद्धा आज राष्ट्रवादी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. • त्यामुळ पवार साहेब या संदर्भातील माहिती घेतील. • एकंदर या सर्व प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे हे दिसून येत आहे. • येणाऱ्या काळात या विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.

  • 27 May 2021 12:32 PM (IST)

    चंद्रपुरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 43.2 अंशापर्यंत तापमान वाढले

    चंद्रपूर:--ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 43.2 अंशा पर्यंत वाढले तापमान, 25 मे पासून नवतपा सुरू झाल्याने 3 जून पर्यंत तापमान वाढते राहण्याचा अंदाज, चंद्रपुरात दरवर्षी तापमानाचा असतो उच्चांक, मात्र यंदा 29 एप्रिल रोजी 44 अंश तापमानाची झालीये सर्वोच्च नोंद, नेहमी उन्हाळा 48 डिग्री तापमानाचा असताना यंदा तौक्ते आणि यास वादळ परिस्थितीने बदलले हवामान, मॉन्सून चंद्रपूर विदर्भात 7 जून रोजी ठरलेल्या वेळेत पोचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

  • 27 May 2021 12:03 PM (IST)

    अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण, आज तीन बार मालकांची चौकशी

    अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण

    आज तीन बार मालकांची चौकशी होणार

    तीन बार मालकांना ईडीच समन्स

    आज हजर राहण्याचे आदेश

    अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच दिल होत टार्गेट

    परमबीर सिग यांनी केला होता आरोप

    या बाबत ईडी अधिकाऱ्यांनी केला आहे गुन्हा दाखल

  • 27 May 2021 11:58 AM (IST)

    पुण्यात पावसाळीपूर्व कामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी, 500 मीटरपर्यंत रांगा

    पुणे

    पुण्यात पावसाळीपूर्व कामामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी,

    सातारा रस्त्यावर वाहनांची लागली 500 मीटरपर्यंत रांग,

    पावसाळीपुर्व कामं,रस्त्याच्या डांबरीकरण करण्यासाठीचं डांबर संपलं

    तौक्ते चक्रीवादळामुळं कोकणातून येणारं डांबराचा पुरवठा विस्कळीत,

    शहाराच्या विविध भागात सकाळी 12 पर्यंत होतीये मोठी वाहतूक कोंडी,

    लॉकडाऊनचे निर्बंध असतानाही पुणेकर मोठ्या प्रमाणावर पडतायेत बाहेर,

    चेकपोस्ट नाक्यावर पोलीसांची तपासणी सुरू असल्यानं वाहतूक कोंडीत आखणी भर,

  • 27 May 2021 11:41 AM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक

    पिंपरी चिंचवड

    -राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला अटक,रत्नागिरीतील पावस इथून अटक

    -काही दिवसांपूर्वी अण्णा बनसोडे यांच्यावर झाला होता गोळीबार

    -त्या प्रकरणात आरोपी तानाजी पवार याने आमदार पुत्र आणि त्याच्या साथीदारावर केला होता अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

    -तानाजी पवार यांच्या कंपनीकडून ही आमदार पुत्रावर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा झाला होता गुन्हा दाखल

    -दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात हव्या असलेल्या सिद्धार्थ बनसोडे याला अटक

  • 27 May 2021 11:07 AM (IST)

    कोकणातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

    - कोकणातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्र्यांची व्हीसी सुरु

    - उपमुख्यमंत्री अजीत पवार, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसी

    - कोकणातील नुकसान भरपाईचा आढावा घेण्यासाठी व्हीसी

    - चक्रीवादळानंतर उपाययोजनांबाबत वडेट्टीवार यांनी लिहीलं होतं अजीत पवार यांना पत्र

  • 27 May 2021 11:02 AM (IST)

    आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात, 1 जूनला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

    आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात

    1जून रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची होणार बैठक

    केलेल्या कामांचा घेणार आढावा

    त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची होणार बैठक

  • 27 May 2021 10:26 AM (IST)

    आषाढी यात्रा सोहळा कसा होणार याबाबत उद्या स्पष्टता, अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक

    सोलापूर--- आषाढी यात्रा सोहळा कसा होणार याबाबत उद्या होणार स्पष्टता

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बोलावली बैठक

    बैठकीनंतर आषाढी यात्रा नेमकी कशी होणार याबाबत स्पष्ट निर्देश मिळणार

    एक जुलै रोजी संत तुकाराम तर दोन जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

    मात्र कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाल्याने यात्रेवर कोरोनाचे सावट

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढि पायी पालखी सोहळा निघणार की गतवर्षीप्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने आणणार

    याकडे संपूर्ण वारकऱ्यांचे लागले लक्ष

  • 27 May 2021 10:24 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करा, शेतकऱ्यांची मागणी

    गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

    गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र अघाप सुरू नाही

    शेतकऱ्यांची दुसऱ्या राज्यात धान विक्री साठी धावपळ

    तेलंगणा राज्यात दुसर्‍या राज्यातून विक्री करू नये म्हणून घाण विक्रीवर बंदी

  • 27 May 2021 10:23 AM (IST)

    कोल्हापूर माथेरान नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का, 14 पैकी 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

    कोल्हापूर

    माथेरान नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का

    शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांचा भाजप मध्ये प्रवेश

    कोल्हापूरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक करणार भाजप पक्ष प्रवेश

    माजी मंत्री रविंद्र चव्हाण ही उपस्थित

  • 27 May 2021 09:46 AM (IST)

    आरक्षण रद्दचा निर्णय बदलू नये, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, आबासाहेब पाटील यांचा इशारा

    आरक्षण रद्दचा निर्णय बदलू नये मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

    अन्यथा राज्यभर आंदोलन करणार आबासाहेब पाटील यांचा इशारा ,,,

    नाना पटोले यांच्यात हिम्मत असेल तर सरकार मधून बाहेर पडून दाखवा ,,

    पदोन्नती आरक्षण शासन निर्णय रद्द केल्यास राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी संपावर जातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची मराठा क्रांती ठोक मोर्चा घेणार जबाबदारी

    पदोन्नती आरक्षणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक भूमिका ...

  • 27 May 2021 09:17 AM (IST)

    कर्जत पोलिसांची अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

    अहमदनगर

    कर्जत पोलिसांची अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची वाळू माफियाविरोधात धडक कारवाई

    सदर कारवाईमध्ये एकूण 15 लाख किंमतीच्या 43 यांत्रिक लोखंडी फायबर बोटी तर 9 लाख रुपये किमतीच्या तीन सेक्शन बोट असा एकूण 24 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

    याप्रकरणी 6 जणांना विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 27 May 2021 09:14 AM (IST)

    यवतमाळमध्ये RTO ऑफिसमागील जुगार अडड्यावर धाड, काँग्रेस नगरसेवकासह 20 जणांना अटक

    यवतमाळ- यवतमाळ शहरातील आरटीओ ऑफिस मागे सुरू असलेल्या जुगारावर रात्री पोलिसांची धाड कॉग्रेस नगरसेवकासह 20 जुगाऱ्याना अटक 2 लाख 44 हजाराचा मुद्देमाल केला जप्त कॉग्रेस नगर सेवक सलीम शहा उर्फ सलिम सागवान सह 20 जणांवर कारवाई

  • 27 May 2021 08:35 AM (IST)

    नागपुरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट, सक्रीय रुग्ण संख्या आली 9 हजार 763 वर

    नागपूर -

    नागपुरात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट

    सक्रिय रुग्ण संख्या आली 9 हजार 763 वर

    तर कोरोनावर मात करणाऱ्यांच प्रमाण वाढलं असून 96 .11 वर पोहचल

    तर मृत्यू च्या प्रमाणात सुद्धा घट होत असल्याने नागपूर ला मोठा दिलासा

    आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हायला सुरुवात

    मात्र तिसऱ्या लाटे साठी तयारी सुरू करण्यात आली

  • 27 May 2021 08:34 AM (IST)

    एमआयडीसीचा पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

    पिंपरी चिंचवड

    -एमआयडीसीचा शहरातील काही भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

    -रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पावसाळा पूर्वीचे देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या आज करण्यात येणार आहे

    -त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे

    -एमआयडीसीकडून होणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार

    -त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा,असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

  • 27 May 2021 08:33 AM (IST)

    तौक्ते चक्रीवादळामुळे उद्धवस्थ झालेल्या आंबा बागायतदार विम्यापासून वंचित रहाणार

    रत्नागिरी -

    तौक्ते चक्रीवादळामुळे उद्धवस्थ झालेल्या आंबा बागायतदार विम्यापासून वंचित रहाणार

    वादळ धडकण्याआधी एक दिवस विम्याचा कालावधी संपुष्ठात

    याचा फटका २१ हजार ३५१ बागायतदारांना बसणार फटका

    विम्यासाठी ग्राह्य कालावधी प्रमाणे अवळी पावसासाठी १ डिसेंबर ते १५ मे असा कालावधी निश्चित

    आंब्या प्रमाणे काजूला हि बसणार फटका, तीन हजार ९३ बागायतदारांनी उतरवला होता वीमा

  • 27 May 2021 08:30 AM (IST)

    तासगाव तालुक्यातील सावळज येथे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त

    सांगली -

    तासगाव तालुक्यातील सावळज येथे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त

    या प्रकरणी प्रवीण भीमराव साळूखे ला पोलिसांनी केली अटक

    स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई

  • 27 May 2021 07:48 AM (IST)

    संचारबंदीतही सुरू होता पुलगाव येथे जुगार अड्डा

    वर्धा

    - संचारबंदीतही सुरू होता पुलगाव येथे जुगार अड्डा

    - पुलगाव शहरातील चिंतामणी कॉलनी येथे सुरू होता जुगार

    - जुगार अडयावर पोलिसांनी छापा टाकत १५ जुगाऱ्याना घेतले ताब्यात

    - १६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

    - छुप्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून या ठिकाणी सुरू होता जुगार

  • 27 May 2021 07:48 AM (IST)

    मिरजेत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य पूर आपत्ती बचाव प्रात्यक्षिक

    सांगली -

    मिरजेत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य पूर आपत्ती बचाव प्रात्यक्षिक

    कृष्णा घाटावर आपत्कालीन प्रात्यक्षिके

    महापौरांसह पदाधिकारी यांची उपस्थिती

  • 27 May 2021 07:47 AM (IST)

    पुण्यात आज पेट्रोलनं गाठली शंभरी, तर डिझेल 90 रुपयांवर

    पुण्यात आज पेट्रोलनं गाठली शंभरी,

    तर डिझेल 90 रुपयांवर,

    पॉवर पेट्रोलचा दर 103 रुपये

    तर साधं पेट्रोल 99 रुपये 60 पैशांवर,

    वाढत्या पेट्रोलच्या किंमतीनं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ,

    दोन महिन्यानंतर पुण्यात पेट्रोलची शंभरीपार

  • 27 May 2021 07:45 AM (IST)

    ‘यास’ चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता

    - ‘यास’ चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता

    - २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो

    - नागपूर हवामान विभागाने वर्तवला अंदाज

    - यास चक्रिवादळ ओडिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता

    - छत्तीसगडलगतच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडण्याची शक्यता

    - या भागात तासी १४० ते १५० किलोमिटर वेगाने वारे वाहू शकतात

  • 27 May 2021 07:43 AM (IST)

    बारावीच्या परीक्षेला पर्याय काय?, विद्यार्थी पालक आणि शासनही संभ्रमात

    पुणे

    बारावीच्या परीक्षेला पर्याय काय?

    विद्यार्थी पालक आणि शासनही संभ्रमात ,

    राज्यात यंदाच्या वर्षी 12 वीच्या परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 973 विद्यार्थ्यांनी केलीये नोंदणी,

    त्यामध्ये पुणे विभागात 2 लाख 30 हजार 980 विद्यार्थ्यांनी केलीये नोंदणी,

    सरकारने परीक्षांचा निर्णय जाहीर करावा विद्यार्थ्यांची मागणी,

    कोणताचं निर्णय होत नसल्यानं विद्यार्थी मानसिक तणावात,

    शिक्षण तज्ञांनी परीक्षेसंदर्भात सरकारला सूचवले पर्याय

  • 27 May 2021 07:41 AM (IST)

    पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू वर्षात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत झाली वाढ

    पुणे

    गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू वर्षात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत झाली वाढ,

    1 जानेवारी ते 23 मे पर्यंत 298 सापळे रचून 411आरोपींना अटक करण्यात आलंय,

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्यात 8 विभाग आहेत,

    त्यामध्ये औरंगाबाद विभाग कारवाई करण्यात एक नंबरवर आलाय तर पुणे विभाग हा दूसऱ्या क्रमांकावर आहे,

    पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सर्वाधिक शासकीय कार्यालय आहेत,

    तरीही लाचखोरीचा आकडा कमी आहे, लाचखोरी कमी झालीये की ? पोलीस कारवाई करण्यात कमी पडले हा प्रश्न निर्माण झालाय,

    आतापर्यंत तीन जणांवर असंपदा प्रकरणी आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आलेत

  • 27 May 2021 07:39 AM (IST)

    खरीप हंगामात पुन्हा बियाणे बनावट निघण्याचे संकेत, प्रशासनाने केले शेतकऱ्यांना सावध

    वर्धा

    -खरीप हंगामात पुन्हा बियाणे बनावट निघण्याचे संकेत, प्रशासनाने केले शेतकऱ्यांना सावध

    - शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती जपून ठेवण्याची सूचना

    - यंदा पडू शकतो बनावट बियाण्यांच्या तक्रारींचा पाऊस

    - शेतकऱ्यांना खबरदारी चा इशारा

    - मागील वर्षी सोयाबीन बियाण्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या समोर

  • 27 May 2021 07:38 AM (IST)

    कोल्हापुरात उद्या मराठा समाजाचे धरणे आंदोलन

    कोल्हापूर :

    कोल्हापुरात उद्या मराठा समाजाचे धरणे आंदोलन

    मराठा आरक्षणावर तातडीने अधिवेशन बोलावण्याची प्रमुख मागणी

    कोल्हापुरातील शिवाजी चौकात होणाऱ्या आंदोलनात समाज बांधव काळ्या फिती लावून सहभागी होणार

    लोकप्रतिनिधी सहभागी होण्याच समाजाच आवाहन

  • 27 May 2021 07:37 AM (IST)

    यास चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

    यास चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार,

    पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा,

    यास चक्रीवादळाचं बिहरामध्ये जाऊन त्याचं रुपांतर हे कमी दाबाच्या पट्टयात झालंय,

    त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर कायम राहणार आहे,

    त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे,

    कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात हा पाऊस होईल

    पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज

  • 27 May 2021 07:17 AM (IST)

    उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी पीएमपीच्या बसमधून कुरिअर आणि मालवाहतूक सेवा सुरु करण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय

    पुणे

    उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी पीएमपीच्या बसमधून कुरिअर आणि मालवाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाचा निर्णय

    पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पीएमपीचे दोन्ही महापालिकांवरील आर्थिक अवलंबित्त्व काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा

    पीएमपीच्या ताफ्यात २२०० बस त्यांचा वापर या सेवेसाठी करण्यात येणार

  • 27 May 2021 07:07 AM (IST)

    देऊळगाव राजा तालुक्यातील 62 गावांपैकी 27 गावात पाणीटंचाईचे सावट

    बुलडाणा

    देऊळगाव राजा तालुक्यातील 62 गावांपैकी 27 गावात पाणीटंचाईचे सावट, आतापर्यंत 40 विहिरींचे अधिग्रहण, तालुक्यातील पाणी टंचाई निवणारणासाठी प्रशासनाने केली 20 लाखांची तरतूद, खडकपूर्णा नदी काठच्या गावांना सुद्धा पाणी टंचाई च्या झळा, तर 20 विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पडून, मात्र देऊळगाव राजा तालुका अद्यापही टँकरमुक्त

  • 27 May 2021 07:06 AM (IST)

    नागपुरात कोरोनाच्या टॅासिलिझुमॅब इंजेक्शनचा गोरखधंदा उघडकीस

    - नागपुरात कोरोनाच्या टॅासिलिझुमॅब इंजेक्शनचा गोरखधंदा उघडकीस

    - पोलीसांच्या कारवाईत होमियोपॅथी डॅाक्टरसह तिघांना अटक

    - एक लाख रुपयाला टॅासिलिझुमॅब इंजेक्शन विकताना रंगेहात पकडले

    - रुग्णसंख्या घटली तरिही कोरोनाच्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरुच

    - काळाबाजार रोखण्याकडे एफडीएचं दुर्लक्ष

  • 27 May 2021 06:42 AM (IST)

    पुण्यात सीमाशुल्क विभागाची परवानगी न घेता परदेशी प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

    पुणे :

    वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नसताना तसेच सीमाशुल्क विभागाची परवानगी न घेता परदेशी प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

    लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली दोघांना अटक

    तरुणकुमार मोहन (वय २६, रा. चेन्नई) आणि श्रीनिवास कमल (वय २०, रा. तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे

    दोघेही आरोपो चेन्नई एलटीटी एक्प्रेसने करत होते प्रवास

    या दोघांकडून कडून 279 कासव, एक हजार 207 इग्वाना आणि 239 फायटर मासे करण्यात आले जप्त

  • 27 May 2021 06:40 AM (IST)

    पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील नद्यांच्या पात्रांतील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढून टाकावीत

    पुणे :

    पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील नद्यांच्या पात्रांतील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढून टाकावीत तसेच राडारोडा, भराव काढा

    जलसंपदा विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांना एका पत्राद्वारे दिला आदेश

    या बाबत कार्यवाही न केल्यास 'एनजीटी'च्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जलसंपदा विभागाने केले स्पष्ट

Published On - May 27,2021 11:32 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.