Maharashtra News LIVE Update | महाविकास आघाडी ही एकत्र येवून निवडणुकांना सामोरे गेली तर 100 टक्के निकाल त्यांच्या बाजूने : शरद पवार

| Updated on: Oct 07, 2021 | 11:19 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | महाविकास आघाडी ही एकत्र येवून निवडणुकांना सामोरे गेली तर 100 टक्के निकाल त्यांच्या बाजूने : शरद पवार
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Oct 2021 08:09 PM (IST)

    महाविकास आघाडी ही एकत्र येवून निवडणुकांना सामोरे गेली तर 100 टक्के निकाल त्यांच्या बाजूने : शरद पवार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    शरद पवार On महानगरपालिका निवडणूक

    – यामध्ये मी फारसं लक्ष घालत नाही. हे राज्यातले प्रश्न आहेत. याबद्दल राज्यातील नेते निकाल घेतील.

    – या निवडणुका झाल्या पोटनिवडणुका होत्या. त्यामध्ये लागलेला निकाल हा संपूर्ण शहराचा मतप्रवाह असेल असे नाही.

    – काही संकेत आहेत. मात्र संबंध लोकांचा मतप्रवाह या निवडणुकांमधून व्यक्त झाला असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

    – महाविकास आघाडी ही एकत्र येवून निवडणुकांना सामोरे गेली तर निकाल हा १०० टक्के त्यांच्या बाजूने लागेल, असा प्राथमिक कल दिसतो आहे.

    शरद पवार On नितीन गडकरी 

    – पक्षीय अभिनिवेष न ठेवता विकासाला मदत करतात त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव येतं.

    – महाराष्ट्रात कोणत्याही विभागात कार्यक्रम असला की आम्ही जातो.

    – या निमित्ताने केंद्र सरकारकडून जे महत्वाचे रस्ते होते मार्गी लागले.

    – अनेक ठिकाणी काम सुरु असल्याचं पहायला मिळालं.

    – दळणवळणाची जी साधनं ही अर्थकारणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असतात. ती उत्तमच असली पाहिजेत. त्यासाठी काही कार्यक्रम होत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून पक्षीय अभिनिवेष न ठेवता सहकार्य केले पाहिजे. यात गडकरी यांच्यासारख्या शासकीय नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे.

    शरद पवार On  शेतकरी, पाऊस 

    – जिथे नुकसान झालंय तिथे मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे.

    – केंद्र सरकारचं याबाबत मदत करण्याचं धोरण होतं. केंद्रानं राज्याला मदत केली पाहिजे आणि राज्यानं ती शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचवली पाहिजे.

    – राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे याबद्दल प्रयत्न करत आहेत.

    – यापूर्वीही अशा घटना झाल्या, त्यावेळी ठोस पावले टाकली. त्याच पद्धतीची पावले आता टाकणे गरजेचं आहे आणि ती टाकली जातील असं दिसतंय.

    शरद पवार On नरेंद्र मोदी

    – कुणीही संवेदनशील व्यक्ती असेल तर त्यांनी एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण या बाबीची आवश्यकता आहे.

  • 07 Oct 2021 08:03 PM (IST)

    संपूर्ण मुंबई आपला बालेकिल्ला, पाऊस येतो पाऊस जातो, पण शिवसेनेची लाट कायम : संजय राऊत

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

    संपूर्ण मुंबई आपला बालेकिल्ला आहे.

    पाऊस येतो पाऊस जातो, पण शिवसेनेची लाट कायम असते

    412 चाव्या करा आणि राज्याच्या विरोधीपक्षाला ती चावी द्या

    आपण काय काम करतोय ते त्यांना कळू दे

    या राज्याचे मुख्यमंत्री, कष्टकऱ्यांना गती देणारे सरकार आहे.

    अन्न, वस्त्र, निवारा हा आपला धर्म आहे आणि शिवसेना तो पाळत आहे.

    मी काल राहुल गांधींना भेटलो. ते मला नेहमी विचारत शिसवेनेचे यशाचे रहस्य काय?

    त्यांना मी सांगणार हे 411 घराच्या चाव्या, रहस्य म्हणजे आम्ही काम करतो असे त्यांना सांगणार आहे.

    मुबंई महानगरपालिका निवडणूक आली आहे. निवडणूका येतील आणि जातील भगवा कायम असेल. स्वबळावर भगवा फडकणाव्याचा आहे.

  • 07 Oct 2021 05:55 PM (IST)

    कल्याणमध्ये ढगांच्या गडगडाटासह पुन्हा पाऊस, काही ठिकाणी 24 तासांपासून वीज ठप्प

    कल्याणमध्ये काल संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला होता. या मुसळधार पावासाची झळ आजही कल्याणकर सोसत आहेत. कल्याणच्या काही भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडीत आहे. त्यानंतर आज पुन्हा पाऊसाने एन्ट्री मारल्याने कल्याणकर त्रस्त झाले आहेत.

  • 07 Oct 2021 05:39 PM (IST)

    पुणयात दिवसभरात 129 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू

    पुणे :  दिवसभरात १२९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १०७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५. -१८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२१०१. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५८३. - एकूण मृत्यू -९०४६. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१४७२. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५६२.

  • 07 Oct 2021 05:30 PM (IST)

    विरारमध्ये घटस्थापनेच्या दिवशी तानसा नदीत 3 तृतीयपंथी बुडाले

    विरारमध्ये तीन तृतीयपंथी बुडाले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत आंघोळीसाठी गेले असता आज सकाळी साडे दहावाजता ही घटना घडली आहे.

    सुनीता गोणामुडी उर्फ पुरी- वय 27, हारिका अंदुकोरी - वय 39 प्राची आकुला - वय 23 अशी त्यांची नावे आहेत.

    आज घटस्थपाना असल्याने दुर्गा पूजा निमित्त सहा तृतीयपंथी आंघोळी साठी तानसा नदीवर आले होते.

    भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे जण बुडाले आहेत. तर तिघे बाहेर आले आहेत. सध्या वसई विरार महानगरपालिकेची अग्निमनदालाचे जवान, विरार पोलीस आणि स्थानिक नागरीक त्या तिघांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

  • 07 Oct 2021 05:05 PM (IST)

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, गोव्याच्या पणजी कंट्रोल रुमला अज्ञाताचा फोन, या फोनमुळे कोल्हापुरात खळबळ, फोननंतर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शोधक पथकाकडून तपासणी सुरु, मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

  • 07 Oct 2021 04:49 PM (IST)

    नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच, सेना आणि राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांमध्ये विकासाकामांवरून संघर्ष

    नाशिक : - नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच - सेना-राष्ट्रवादी संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता - सेना आणि राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांमध्य विकासाकामांवरून संघर्ष - देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचया आमदार सरोज आहिरे यांच्यावर सेनेच्या माजी आमदार योगेश घोलप यांनी केले आरोप - माझ्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय घेत खोटे बोलत असल्याचं आरोप - योगेश घोलप यांचा पराभव करत सरोज आहिरे आल्या होत्या निवडून - पालकमंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वादाच प्रकरण ताज असताना पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपली

  • 07 Oct 2021 04:41 PM (IST)

    दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कलाबेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

    दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कलाबेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल

    कला बेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत

    दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता

    शिवसेनेच्या रणनिती मुळे भाजपला धक्का

  • 07 Oct 2021 04:15 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानी आयटीचा छापा

    पुणे : - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानी आयटीचा छापा,

    - पुण्यातील पंचवटी भागात इंदुलकर यांचे निवासस्थान,

    - सकाळपासून इंदुलकर यांच्या घरात छापेमारी सुरुय,

    - स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाहीय.

    - केंदीय सुरक्षा पथकाचे जवान सुरक्षेसाठी तैनात

  • 07 Oct 2021 04:12 PM (IST)

    अमरावती जिल्हा बँक निवडणूक वाद विकोपाला, काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांचा हल्ला

    अमरावती :

    अमरावती जिल्हा बँक निवडणूक वाद विकोपाला

    काँग्रेस नेते व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांचा हल्ला

    राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच हल्ला करायला लावल्याचा वीरेंद्र जगताप यांचा आरोप

    पराभव झाला म्हणून बच्चू कडू राग काढत असल्याचा आरोप

    माझ्यावर हल्ला करून घर पेटवून देण्याचा प्रयत्न- माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा गंभीर आरोप

    चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात काँग्रेस आमदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव

    चांदुर रेल्वेत पोलीसांचा मोठा पोलीस बंदोबस्त

  • 07 Oct 2021 04:10 PM (IST)

    लखीमपूर प्रकरणावरून उत्तर प्रदेश-हरियाणा सीमेवर प्रचंड तणाव

    लखीमपूर प्रकरणावरून प्रचंड तणाव

    उत्तर प्रदेश-हरियाणा सीमेवर प्रचंड तणाव

    पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पोलिसांनी रोखलं

    यमुना आणि सहारनपुर जिल्ह्याच्या सीमेवर सिद्धुला रोखल्याने तणाव

    हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी उतरले रस्त्यावर

    मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

  • 07 Oct 2021 04:10 PM (IST)

    केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक संपली, काश्मीरमधील सद्य परिस्थितीवर चर्चा

    नवी दिल्ली :

    केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक संपली

    तब्बल दीड तास चालली बैठक

    अमित शहा आणि अजित डोवाल यांच्या उपस्थितीत बैठक

    काश्मीरमधील सद्य परिस्थितीवर बैठकीत चर्चा

    काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दहशतवादी टारगेट करत असल्याने तातडीची बैठक

    कायदा हातात घेणाऱ्यावर पोलीस आणि सुरक्षा दलांनी कडक कारवाई करावी

    बैठकीनंतर देण्यात आले निर्देश

  • 07 Oct 2021 04:08 PM (IST)

    नवरात्रीचा उपवास असल्याने फराळात भगर खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

    जालना :  नवरात्रीचा उपवास असल्याने फराळात भगर खाल्ल्यामुळे, अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झालीये. विषबाधा झालेल्या मध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्या पैकी चार जणांवर जवळच्याच वडीगोद्री येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर, एका महिलेची तब्येत जास्त बिघडल्याने त्या महिलेला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लहान मुलांना जास्त त्रास होत नसल्याने प्रथमोपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

  • 07 Oct 2021 03:52 PM (IST)

    काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या आघाडीचा शिवसेनेला पश्चात्ताप होईल : सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर :

    ताज्या निवडणूक निकालात शिवसेनेची पिछाडी म्हणजे असंगाशी संग केल्याचे भोग असल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया,

    काही वर्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत केलेल्या आघाडीचा शिवसेनेला पश्चात्ताप होईल असे मत,

    आजवर जोपासलेला शिवसेनेचा वैचारिक पाया नष्ट करण्याचे काम आघाडीतील घटक पक्ष करत असल्याचे प्रतिपादन,

    आघाडीसोबत जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे मत,

    शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांची विधाने म्हणजे केवळ खुर्चीसाठी चे एकत्रीकरण असल्याची टीका

  • 07 Oct 2021 03:15 PM (IST)

    जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे : किरीट सोमय्या

    किरीट सोमय्या यांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा :

    सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे

    अजित पवारांना आत्ताच कुटुंब आठवलं का?

    आता साखत कडू वाटायला लागली का?

    कारखाने लुटताना काही वाटलं नाही का?

    अजित पवारांनी राऊतांकडून शिकावं. बेनामी कारभार कोर्टात सांगा. मग कोणी धाड घालणार नाही

    ठाकरे-पावर घोटाळेबाज सरकार, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच

  • 07 Oct 2021 03:00 PM (IST)

    आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी, थोड्याच वेळात कोर्टात युक्तीवाद

    आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी, आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे कोर्टात दाखल, थोड्याच वेळात कोर्टात युक्तीवाद सुरु होणार

  • 07 Oct 2021 02:48 PM (IST)

    भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, राज्यातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, चित्रा वाघ राष्ट्रीय कार्यकारिणीवर

    नवी दिल्ली :

    भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

    येत्या 7 नोव्हेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणीची होणार बैठक

    राज्यातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, चित्रा वाघ राष्ट्रीय कार्यकारिणीवर

    वरुण गांधी, मनेका गांधी यांची कार्यकारणीमधून हकालपट्टी

    आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी रणनीती

  • 07 Oct 2021 02:04 PM (IST)

    आयुक्त सुनील केंद्रेकर शेतकऱ्यांच्या बांधावर, गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

    बीड : आयुक्त सुनील केंद्रेकर शेतकऱ्यांच्या बांधावर

    गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

    केंद्रेकारांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

    अतिवृष्टीत बीड जिल्ह्यातील खरिपाचे मोठे नुकसान

    केंद्रेकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा देखील बांधावर

    शेतीसह फुटलेल्या बंधाऱ्याची केली पाहणी

    सरकारकडून लवकरच मदत मिळण्याचे दिले आश्वासन

  • 07 Oct 2021 12:50 PM (IST)

    अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर आयकरचे छापे

    अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर आयकरचे छापे

    आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू

    विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले

    विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित

  • 07 Oct 2021 12:12 PM (IST)

    कोल्हापूरच्या शाहुवाडीतील आरव केसरे हत्या प्रकरण, बापानेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

    कोल्हापूर :

    कोल्हापूरच्या शाहुवाडीतील आरव केसरे हत्या प्रकरण

    बापानेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

    राकेश केसरे असं हत्या करणाऱ्या नराधम बापाचं नाव

    पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा राजेशला होता संशय

    पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांत वाद होते

    हत्या करून नरबळी भासवण्याचा केला होता प्रयत्न

    कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात लावला हत्येचा छडा

    राकेशनेच दिली होती मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद

  • 07 Oct 2021 11:21 AM (IST)

    सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडी चा पुन्हा छापा

    सातारा- सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडी चा पुन्हा छापा...

    जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या आहे ताब्यात...

    कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती जरंडेश्वर कारखान्याला भेट

  • 07 Oct 2021 07:53 AM (IST)

    नागपूर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसला चांगलं यश

    नागपूर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसला चांगलं यश

    काँग्रेस मध्ये पुन्हा आली चेतना

    कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाढल्या अपेक्षा

    येणाऱ्या नागपूर महापालिका निवडणूक।कडे लागलं आहे आता लक्ष

    भाजप ची एक हाती असलेली सत्ता काबीज करण्याची काँग्रेस ची तयारी

  • 07 Oct 2021 07:52 AM (IST)

    औरंगाबादेत होणार 2 दशकानंतर रेल्वे समस्यांवर विचारमंथन बैठक

    औरंगाबादेत होणार 2 दशकानंतर रेल्वे समस्यांवर विचारमंथन बैठक

    मराठवाडा, मनमाड,अकोला,मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्वपूर्ण बैठक

    राष्ट्रीय बँकेच्या अध्यक्षांच्या बैठकीनंतर आता औरंगाबादेत रेल्वे सदस्यांवर होणार विचारमंथन बैठक

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे राहणार बैठकीत उपस्थित

    20 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत होणार बैठक

  • 07 Oct 2021 07:50 AM (IST)

    औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचे वाजले बिगुल

    औरंगाबाद -

    औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचे वाजले बिगुल

    शहरात 38 प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आयोगाकडून आदेश

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश देताच यंत्रणा लागली कामाला

    115 वार्डमध्ये एकूण 38 प्रभाग, तीन वार्डाचे 37 प्रभाग तर चार वार्डाचा एक स्वतंत्र प्रभाग असणार

    आयोग कमला लागल्यामुळे महापालिकेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता

    प्रभाग रचना करताना राजकीय दबाव देऊ नये आयोगाच्या आदेश

  • 07 Oct 2021 07:49 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर औरंगाबादेत खबरदारी

    अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर औरंगाबादेत खबरदारी

    जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन चेकपोस्ट वरील सुरक्षा वाढवण्याची दिली सूचना..

    अहमदनगर कडून येणाऱ्या प्रवाशांची होणार कडक तपासणी..

    अहमदनगर जिल्ह्यात 61 गावांना 13 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन केल्याने इतर जिल्हे दक्ष..

    अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने पुन्हा राज्यभरामध्ये भीतीचे वातावरण..

  • 07 Oct 2021 07:48 AM (IST)

    सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक शिवराम पापळ यांची नेमणूक रद्द

    सोलापूर -

    जिल्हा दूध संघाचे प्रशासक शिवराम पापळ यांची नेमणूक रद्द

    शासकीय प्रशासक मंडळच राहणार कायम

    राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्र नंतर उच्च न्यायालयाने निकाल

    प्रशासक बदलणाऱ्या मंत्र्यांसह प्रशासक मंडळ रद्द करण्यासाठी तोंडघशी

    जिल्हा दूध संघ बचाव समितीने उच्च न्यायालयात केली होती याचिका दाखल

  • 07 Oct 2021 07:47 AM (IST)

    रामगिरी मेमो ट्रेन दीड वर्षानंतर बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर पोहोचली

    चंद्रपूर -

    रामगिरी मेमो ट्रेन दीड वर्षानंतर बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर पोहोचली

    बल्लारशाह स्थानकावर जोरदार स्वागत

    बल्लारपूर बहुप्रतिक्षित रामगिरी काझीपेठ बल्लारशाह मेमो जवळजवळ दीड वर्षांनी पुन्हा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर आगमन झाल्यावर, या ट्रेनचे जल्लोषात स्वागत करण्यात आले

    या ट्रेनच्या आगमनाने जिल्ह्यातील तेलगू भाषिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

  • 07 Oct 2021 07:47 AM (IST)

    रस्त्याने चालताना खड्ड्या मुळे त्रस्त नागपूरला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता

    नागपूर -

    रस्त्याने चालताना खड्ड्या मुळे त्रस्त नागपूरला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता

    स्थायी समितीने जास्त खड्डे असणाऱ्या रस्त्यावर पूर्ण डांबरी करण करण्याचा घेतला निर्णय

    15 रस्त्याचं होणार डांबरीकरणं, 16 कोटी रुपयांचा येणार खर्च

    पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने झाली होती मोठी टीका

  • 07 Oct 2021 07:46 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे आज बंद

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे आज बंद

    -लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आज बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे

  • 07 Oct 2021 07:44 AM (IST)

    रस्त्याने चालताना खड्ड्यांमुळे त्रस्त नागपूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता

    रस्त्याने चालताना खड्ड्यांमुळे त्रस्त नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता

    स्थायी समितीने जास्त खड्डे असणाऱ्या रस्त्या वर पूर्ण डांबरी करण करण्याचा घेतला निर्णय

    15 रस्त्याचं होणार डांबरीकरणं

    16 कोटी रुपये चा येणार खर्च

    पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने झाली होती मोठी टीका

  • 07 Oct 2021 07:43 AM (IST)

    भू-माफिया रम्मी राजपुतला बेड्या ठोकणाऱ्या पथकाला बक्षीस मिळणार

    नाशिक -

    भू-माफिया रम्मी राजपुतला बेड्या ठोकणाऱ्या पथकाला बक्षीस मिळणार

    8 तास क्राईम युनिट 1 च्या पथकाने हिमाचलप्रदेशच्या जंगलात राबवल होत सर्च ऑपरेशन

    अखेर राजपूतच्या मुसक्या अवळण्यात पथकाला यश आलं

    अनेक भुमाफिया प्रकरण समोर येणार, मुख्य सूत्रधार गजाआड केल्याने पोलिसांना विश्वास

Published On - Oct 07,2021 6:39 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.