Maharashtra News LIVE Update | अखेर दोन वर्षानंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

| Updated on: Sep 22, 2021 | 11:54 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | अखेर दोन वर्षानंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Sep 2021 09:50 PM (IST)

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

    एमपीएससी भरतीसंदर्भात 30 तारखेच्या आत मंजूर पदांचा आढावा घेऊन एमपीएससीला मागणीपत्र पाठवा,

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सगळ्या विभागांना निर्देश,

    राज्य सरकार एमपीएससी आयोगाला जागेसंदर्भात मागणीपत्र देत नसल्याचा विद्यार्थ्यांची ओरड होती,

    विद्यार्थ्यांची मागणी पाहता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत मागणीपत्र सादर करण्याच्या दिल्या सूचना,

    30 तारखेच्या आत मागणीपत्र आयोगाला सादर करा

    अखेर दोन वर्षानंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

    मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने केली होती आत्महत्या,

    अखेर मुलाखत कार्यक्रम जाहीर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी होणार मुलाखती,

    4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार मुलाखती

    दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा, मुलाखत कार्यक्रमाला होणार सुरुवात

  • 22 Sep 2021 09:48 PM (IST)

    अखेर दोन वर्षानंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

    अखेर दोन वर्षानंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

    मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने केली होती आत्महत्या,

    अखेर मुलाखत कार्यक्रम जाहीर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी होणार मुलाखती,

    4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार मुलाखती

    दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा, मुलाखत कार्यक्रमाला होणार सुरुवात

  • 22 Sep 2021 09:04 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या पत्रकार परिषद घेणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या पत्रकार परिषद घेणार

    राज्यातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा करणार

    मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील लेटरवॉर आणि मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पवार काय प्रतिक्रिया देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

  • 22 Sep 2021 07:33 PM (IST)

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अमित शाहांची भेट घेतली

    नवी दिल्ली :

    आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली

    जन आशीर्वाद यात्रेनंतर पहिल्यांदा भेट

    विविध विषयांवर विस्तृत चर्चा

    महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचा अंदाज

    अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट

  • 22 Sep 2021 07:26 PM (IST)

    आता नागरी सुविधा देण्यासाठी सोयीचे होणार : एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    प्रभाग सदस्य :

    नगर पंचायत -1 नगरपालिका -2 महापालिका -3

    3 सदस्य प्रभाग

    प्रभागातील विकासासाठी उपयुक्त होईल, असे मत समोर आले

    नगर पालिका हद्दीतील कामे लवकर व्हावी हा उद्देश

    नागरी सुविधा देण्यासाठी सोयीचे होणार आहे

    हा निर्णय एक मताने मंत्रिमंडळ बैठकीत झाला

    जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कामे झाले पाहिजे

    महाविकास आघाडी उमेदवाराला नक्की या प्रभाग रचनेचा फायदा होईल

    देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर प्रतिक्रिया

    न्यायालयात कोणीही जाऊ शकतो, नागरी सुविधा समोर ठेऊन निर्णय घेतला

  • 22 Sep 2021 07:20 PM (IST)

    जळगावात सर्वसामान्य महिलांनी निधी जमवून बुजविले रस्त्यांवरील खड्डे

    जळगाव :

    जळगाव शहरात रस्त्यांवरील खड्डयांनी नागरिक हैराण

    सर्वसामान्य महिलांनी निधी जमवून बुजविले रस्त्यांवरील खड्डे

    महापालिका प्रशासनाला दिली जोरात चपराक

    खड्डे बुजविण्यासाठी नागरिक आंदोलन करून थकल्यानंतर घेतला हा निर्णय

  • 22 Sep 2021 06:30 PM (IST)

    महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्त्वाचे निर्णय

    मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

    • भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता (नगर विकास विभाग)

    • प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारांकरिता निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग योजना राबविणार. (अल्पसंख्यांक विकास विभाग)

    • रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प पाचव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

    • महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (नगर विकास विभाग)

    • नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. (नगर विकास विभाग)

    • महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विकासाची वाटचाल मांडण्यासाठी साखर संग्रहालय उभारणार. (सहकार विभाग)

    • सहकारी सुतगिरणी आकृतीबंधातील मानव विकास कमी असणाऱ्या जिल्ह्याचा किंवा तालुक्यांचा समावेशाची अट रद्द करण्याचा निर्णय. (वस्त्रोद्योग विभाग)

    • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ६५ कलम ७५ व कलम ८१ मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता. (सहकार विभाग)

    • कापूस पणन महासंघाद्वारे २०२०-२१ च्या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी अतिरिक्त ६०० कोटींच्या कर्जास शासनहमी. (पणन विभाग)

    • गाळप हंगाम २०२१-२२ करिता सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देणार. (सहकार विभाग)

    • महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मध्ये सुधारणा. (ग्राम विकास विभाग)

  • 22 Sep 2021 05:24 PM (IST)

    आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात न्यायलयात याचिका दाखल

    अहमदनगर :

    आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात न्यायलयात याचिका दाखल

    निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांच्याकडून खासगी याचिका दाखल

    जगताप आणि त्यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा, भांबरकर यांनी केली मागणी

    जगताप यांनी जाहीरनाम्यात नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचा दावाही केला होता

    मात्र माहिती अधिकारात आयटी पार्क नसल्याचं उघड

    त्यामुळे जगताप यांच्या अडचणीत वाढ

  • 22 Sep 2021 05:01 PM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने होणार

    महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने होणार

    हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार

  • 22 Sep 2021 04:41 PM (IST)

    पुरातत्व खात्याकडून पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी परिसर पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

    मावळ (पुणे) : 

    -पुरातत्व खात्याकडून पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी आणि परिसर जो पर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

    -कार्ला येथील एकविरा देवी गडावर काल दरड कोसल्याची घटना घडली होती

    -आज मावळ तहसीलदारनी ज्या ठिकाणी दरड कोसळी त्यांची पहाणी केली

    -प्रशासनाकडून पर्यटकांनी कार्ला लेणी आणि परिसरात न येण्याचे आवाहन करण्यात आलेत

  • 22 Sep 2021 04:38 PM (IST)

    गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, संध्याकाळपर्यंत गंगापूर धरणातून 8000 क्यूसेस पाणी सोडणार

    नाशिक :

    गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले

    संध्याकाळपर्यंत गंगापूर धरणातून 8000 क्यूसेस पाणी सोडणार

    नाशिकला आला पहिला महापूर

    गोदा घाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    प्रशासनाने दिला सर्व यंत्रणांना अलर्ट

  • 22 Sep 2021 04:37 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

    -शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील विद्यमान नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे ते पती आहेत

    -शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे ते निकटवर्तीय

    -आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय

  • 22 Sep 2021 04:09 PM (IST)

    ओबीसी अध्यादेश हा फसवणुकीचा अध्यादेश नको : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरुन मुख्यमंत्र्यांकडून राजकारण

    राज्यपालांच्या प्रश्नाला उत्तर द्या, राजकारण नको

    शक्ती कायद्यावर निर्णय व्हायला हवा होता

    मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अपरिपक्व आहेत

    ओबीसी आरक्षण टिकेल, अशा अध्यादेश काढा

    ओबीसी अध्यादेश हा फसवणुकीचा अध्यादेश नको

    मविआ नेते फसवत आहेत, त्रुटी दूर करुन अध्यादेश काढा

  • 22 Sep 2021 03:33 PM (IST)

    इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला, अडकलेल्या मजुराला बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश

    पुणे :

    कल्याणीनगर, सुग्रा टेरेस येथे इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर अडकला होता. इतर मजूरांनी दोन तास प्रयत्न करुन ही सुटका न झाल्याने अग्निशमन दलास कळविताच येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक गणेश पराते, जवान वसंत कड, सुनिल खराबी, रतन राऊत यांनी तातडीने मातीत अडकलेल्या मजूराची सुटका करत त्याला रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता रवाना केले.

  • 22 Sep 2021 02:30 PM (IST)

    ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    10 ते 15 किलोमीटर पर्यंत लांबच रांगा, गेल्या 3 तासांपासून वाहतूक कोंडी

    सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

    MMRD प्रशासनाकडून रस्त्यावरील निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना फटका

  • 22 Sep 2021 01:13 PM (IST)

    गोदावरीला येणार पुन्हा पूर, गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    नाशिक -

    गोदावरीला येणार पुन्हा पूर

    गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा..

    गंगापूर धरणातून दुपार पर्यंत 6000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग..

  • 22 Sep 2021 01:13 PM (IST)

    तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांचा डिजेवर 'झिंगाट' डान्स प्रकरण, ठाणेदार अजय आखरे यांची कंट्रोल रूमला बदली

    अमरावती ब्रेकिंग

    तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांचा डिजेवर 'झिंगाट' डान्स प्रकरण

    झिंगाट डान्स प्रकरणी ठाणेदार अजय आखरे यांची कंट्रोल रूमला बदली..

    या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या कडे तपास.

    दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आदेश..

    पोलीस ठाण्यात डिजे लावल्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांची गंभीर दखल

  • 22 Sep 2021 01:12 PM (IST)

    मालवणात मच्छिमारांच्या जाळ्यात बांगड्या माशाचा बंपर कॅच

    सिंधुदुर्ग:-

    मालवणात मच्छिमारांच्या जाळ्यात बांगड्या माशाचा बंपर कॅच

    गेले दोन दिवस समुद्र काहीसा शांत झाल्याने मासेमारीला पुन्हा सुरवात.

    मालवण देवबाग समुद्रकिनारी रापणीला 'बांगडा' माशाचा बंपर कैच मिळाला त्यामुळे मच्छीमारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. बांगड्या बरोबर बोडारी आणि इतर लहान मासे देखील या रापणीत मिळाले

  • 22 Sep 2021 10:50 AM (IST)

    इगतपुरी मधील वैतरणा धरण 100 टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

    नाशिक -

    इगतपुरी मधील वैतरणा धरण 100 टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

    गेल्या 24 तासापासून वैतरणा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू

    वैतरणा धरणातून मुख्यतः मुंबईला होतो पाणीपुरवठा

    धरणातून सुमारे 3 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 22 Sep 2021 10:49 AM (IST)

    सोलापूर अक्कलकोट महामार्गाचा कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली

    सोलापूर -

    सोलापूर अक्कलकोट महामार्गाचा कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली

    पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले

    पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण हटविण्यात आले

    सोलापूर अक्कलकोट  महामार्गाच्या कामाला आली होती

    मात्र अक्कलकोट नाका , गांधीनगर परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामात आला होता अडथळा

  • 22 Sep 2021 10:49 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव ऑनलाइन की ऑफलाईन?

    नागपूर -

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव ऑनलाइन की ऑफलाईन?

    स्वयंसेवकांमध्ये संभ्रम कायम

    कोरोनस्थिती आणि प्रशासनाच्या नियमावली वरून ठरणार भूमिका

    संघाच्या विजयादशमी उत्सवाची जगात असते चर्चा

  • 22 Sep 2021 09:36 AM (IST)

    अल्पवयीन मुलीवर बापाने केला अत्याचार, यवतमाळच्या भोसा रोड परिसरातील घटना

    यवतमाळ-

    स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार

    यवतमाळच्या भोसा रोड परिसरातील घटना

    मुलीला अंघोळ करताना बघत होता त्यावेळी

    मुलीच्या आईने हटकले असता तिला केली मारहाण,

    यवतमाळ च्या अवधुतवाडी पोलिसात गुन्हा दाखल आरोपीला अटक

  • 22 Sep 2021 09:34 AM (IST)

    नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो आणि अजनीतील इंटर मॉडेल स्टेशनचा प्रश्न मार्गी लागणार

    नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो आणि अजनीतील इंटर मॉडेल स्टेशनचा प्रश्न मार्गी लागणार

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली चर्चा

    ब्रॉड गेज मेट्रो च्या माध्यमातून नागपूर शहर आजूबाजू च्या शहरांना जोडले जाणार आहे

    याविषयी येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती

  • 22 Sep 2021 07:51 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर कन्नड रोडवर ट्रॅव्हल्स बसला अपघात

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर कन्नड रोडवर ट्रॅव्हल्स बसला अपघात

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरच उलटली बस

    शिउर बांगला परिसरातील वळणावर बस वळताना उलटली बस

    बस मधील 11 प्रवाशी झाले जखमी

    अपघातानंतर बस चालक झाला फरार

    जखमी रुग्णांना कन्नड आणि वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात केले दाखल

  • 22 Sep 2021 07:43 AM (IST)

    कोल्हापुरात नाहरकत दाखला देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी

    कोल्हापूर

    नाहरकत दाखला देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी

    आंबेवाडी येथील ग्रामपंचायत शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    शिवाजी चौगुले असं कारवाई झालेल्या शिपायाचा नाव

    महापुरात नुकसान झालेल्या परमिट रूमच्या पंचनाम्यासाठी व्यवसाय चालू असल्याचा ना हरकत दाखला देण्यासाठी मागितली लाच

  • 22 Sep 2021 07:43 AM (IST)

    खानापूर तालुक्यातील विटामध्ये दवाखान्याचा छत कोसळून एक महिला ठार तर एक महिला जखमी

    सांगली -

    खानापूर तालुक्यातील विटामध्ये दवाखान्याचा छत कोसळून एक महिला ठार तर एक महिला जखमी

    दवाखान्याच्या इमारतीच्या पुढच्या छताचा भाग छताच्या खाली प्रतीक्षेत असलेल्या महिला रुग्णाच्या अंगावर कोसळला

    यांत डोक्याला आणि मेंदूला जबर मार लागल्याने अनिता माळी महिलेचा मृत्यू

    तर अलका शिंदे यांच्या डोक्यास, कंबर आणि खालच्या बाजूला जबर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीकडे पाठवले

    विटा येथिल लेगरे रोडवरील डॉ दीपक कुलकर्णी यांच्या दवाखान्यात ही घटना काल सायंकाळी घडली

  • 22 Sep 2021 07:42 AM (IST)

    जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, नाशिक जिल्ह्यात 961 कोरोना रुग्ण

    नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला

    नाशिक जिल्ह्यात 961 कोरोना रुग्ण

    एकट्या सिन्नर तालुक्यात आढळले 278 रुग्ण

    जिल्ह्यात लसीकरणाचा आकडा 25 लाखांच्या घरात

  • 22 Sep 2021 07:42 AM (IST)

    शिर्डी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाला हायकोर्टाचा दणका

    औरंगाबाद -

    शिर्डी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाला हायकोर्टाचा दणका

    नवीन विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास घातली बंदी

    16 सप्टेंबर रोजी अस्तित्वात आले होते 12 सदस्यांचे विश्वस्त मंडळ

    नवीन विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीविरोधात माजी विश्वस्तांने दाखल होती याचिका

    नवीन विश्वस्त मंडळ हे कायदा, नियम आणि उच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय अस्तित्वात आले होते

    परिणामी विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने घातली बंदी

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घातली बंदी

  • 22 Sep 2021 07:41 AM (IST)

    अंगणवाडी सेविकांचे शुक्रवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन

    कोल्हापूर

    अंगणवाडी सेविकांचे शुक्रवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन

    मोबाईल परत घेण्यासाठी राज्य पातळीवरून येत असलेल्या दबावाच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविका आक्रमक

    राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयावर काढणार मोर्चा

    निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घेण्याची तसेच पोषण ट्रॅकर ॲप मराठीत देण्याची अंगणवाडी सेविका ची प्रमुख मागणी

  • 22 Sep 2021 07:41 AM (IST)

    मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत नव्या प्रकल्पाला बंदी

    रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत नव्या प्रकल्पाला बंदी;

    न्यायालयाची राज्य सरकारला तंबी

    मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत

    विचारणा करत उच्च न्यायालयाने आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा डिसेंबरपर्यंत घेऊन

    लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

    तसेच हे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन विकास प्रकल्पाला परवानगी देणार नाही,

    अशी तंबी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिली.

    चिपळूण येथील ओवैस पेचकर यांनी न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.

    तसेच या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी खड्डे तीन आठवड्यांत बुजवा, असेही निर्देश न्यायालयाने म्हटले आहे.

  • 22 Sep 2021 07:13 AM (IST)

    नागपुरातील धरमपेठेतील लाहोरी बारवरच्या रुफ नाईन आणि गॅाडफादरमध्ये छापा

    - नागपुरातील धरमपेठेतील लाहोरी बारवरच्या रुफ नाईन आणि गॅाडफादरमध्ये छापा

    - वेळेनंतरंही रुफनाईन रेस्टॅारंट सुरु असल्याने पोलीसांची धाड

    - गॅाडफादरमध्ये बेकायदा सुरु होतं हुक्का पार्लर

    - कोरोना नियम धाब्यावर बसवून सुरु होतं रेस्टॅारंट

    - कोवीड नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

    - अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 22 Sep 2021 07:12 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील सत्त्यातर वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी

    - भंडारा जिल्ह्यातील सत्त्यातर वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी

    - लाखनी तालुक्यामधील पोहरा या गावचे 77 वर्षीय आजोबा गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी झाले आहेत.

    - त्यांना स्पेन मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

  • 22 Sep 2021 07:09 AM (IST)

    महामार्गावरील खड्यांबाबत छगन भुजबळ आक्रमक

    नाशिक - महामार्गावरील खड्यांबाबत छगन भुजबळ आक्रमक

    15 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुझवा, अन्यथा कारवाई

    छगन भुजबळ यांचा टोल कंपन्यांना इशारा

    भुजबळांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिला इशारा

    वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल पर्यंतच्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करू

    महामार्ग प्राधिकरण चे बैठकीत भुजबळांना आश्वासन

  • 22 Sep 2021 07:05 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेत 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता

    - नागपूर महानगरपालिकेत 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता

    - निवडणूक लढवण्यास इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी

    - 2011 च्या लोकसंख्येनुसार नविन वॅार्ड रचना

    - नविन वॅार्ड - प्रभाग रचनेत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता

    - नागपूर महानगरपालिकेत सध्या 151 नगरसेवक आहेत, ती संख्या 166 होण्याची शक्यता

    - आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

  • 22 Sep 2021 06:57 AM (IST)

    पुण्यात दहा हजाराची लाच घेताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात

    पुणे

    दहा हजाराची लाच घेताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात

    अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच

    हवेली पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना एसीबीच्या पथकाने घेतलं ताब्यात

    त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती माणिक कोलते, पोलिस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप असे ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे

  • 22 Sep 2021 06:52 AM (IST)

    मुंबईच्या फ्रिवेवर रात्री अचानक एक धावत्या कार मध्ये आग लागली, पाहता पाहता कार जळून खाक

    मुंबईच्या फ्रिवेवर रात्री अचानक एक धावत्या कार मध्ये आग लागली, पाहता पाहता कार जळून खाक

    दोन गाड्यांमध्ये टक्कर झाल्याने एकात गाडीत आग लागली अशी माहिती आहे

    सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारचा जीवितहानी झाला नसून मात्र कार जळून खाक झाली

  • 22 Sep 2021 06:51 AM (IST)

    दिवंगत गुंड अमर नाईकचा भाऊ - अश्विन नाईक आणि त्याच्या सात साथीदारांची निर्दोष मुक्तता

    दिवंगत गुंड अमर नाईकचा भाऊ - अश्विन नाईक आणि त्याच्या सात साथीदारांची निर्दोष मुक्तता

    मुंबई सत्र न्यायालयाने अपहरण आणि खंडणीच्या एका प्रकरणात मंगळवारी दिला निकाल

    2015 मध्ये अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि खंडणीच्या खटल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

    अश्विन नाईक सोबत प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सूरज गोवर्धन अशी दोषमुक्त झालेल्या इतर आरोपींची नाव

    डिसेंबर 2015 मध्ये, नाईकने त्याच्या सात साथीदारान सोबत दादरमधील एका बिल्डरचे अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी आणि 6000 वर्गफूटचा फ्लॅट मागितल्याचा होता आरोप

Published On - Sep 22,2021 6:35 AM

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.