Maharashtra News Live Update : राणेंना आजही बेल नाहीच, कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

| Updated on: Feb 01, 2022 | 10:46 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : राणेंना आजही बेल नाहीच, कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
सांकेतिक फोटो

मुंबई : आज सोमवार एक फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे (Elections) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. असेच आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.  या बातम्यांसह आपण सर्व घडामोडी येथे पाहणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Feb 2022 08:48 PM (IST)

    भाजपचं राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर

    जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप-

    प्रशांत जगताप यांच वक्तव्य हास्यास्पद आहे

    ज्या पक्षाचे महापालिकेत 40-45 नगरसेवक आहेत, त्यापक्षाचे शहराध्यक्ष हास्यास्पद वलग्ना करतायेत.

    जगतापांनी त्यांच्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांना थांबून दाखवावं

    आम्ही राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही

    प्रसिद्धीत राहण्यासाठी जगताप अशी वक्तव्य करतात

    प्रसिध्दीत राहून सत्ता मिळवता येत नाही

  • 01 Feb 2022 07:50 PM (IST)

    पुण्यात भाजपला खिंडार पडणार?

    पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे.

  • 01 Feb 2022 06:11 PM (IST)

    नितेश राणेंचे वकील काय म्हणाले?

    दोन पर्याय आहेत, उच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा जर आम्हाला सरेंडर करायचे असेल तर ते करु शकतो मॅजिस्ट्रेट समोर...पण आजच्या घडीला आमचा निर्णय हा आहे की आम्ही उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाचा निकाल चॅलेंज करणार आहोत. आज संध्याकाळ अर्ज करू कारण आता आम्हाला सत्र न्यायालयाच्या निकालाची ऑर्डर कॉपी मिळाली आहे.

  • 01 Feb 2022 05:18 PM (IST)

    नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला अर्ज

    जामिनासाठी केला अर्ज सिंधुदूर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला राणेंच्या याचिकेवर कधी सुनावणी हे उद्या स्पष्ट होईल

  • 01 Feb 2022 04:05 PM (IST)

    नितेश राणे हायकोर्टात धाव घेणार

    नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

    नितेश राणेंची चौथ्यांदा निराशा

    हायकोर्टात दिलासा मिळणार?

    जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाबाहेर राडा

  • 01 Feb 2022 02:17 PM (IST)

    अनिल परब यांच्या दापोली येथील रिसाॅर्टवर कारवाई होणार, सूत्रांची माहिती  

    मुंबई - अनिल परब दापोली रिसाॅर्ट प्रकरणी मोठी घडीमोड

    - अनिल परब यांच्या दापोलीच्या रिसाॅर्टबाबत महत्वाचा निर्णय झाल्याची मंत्रालयाच्या सूत्रांची माहीती

    - दापोली इथे परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसाॅर्ट आहे

    - या रिसाॅर्टवर तोडक कारवाईचे आदेश निघणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहीती…

  • 01 Feb 2022 10:55 AM (IST)

    कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

    सातारा : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

    सकाळी 9.47 ला जाणवला 3.3 रेकटर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का

    भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमिटर तर काडोली गावाच्या पश्चिमेला 7 किमी अंतरावर भूकंपाचा धक्का

  • 01 Feb 2022 10:05 AM (IST)

    परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्री आणि माध्यमिक बोर्डाच्या अध्यक्षांची आज बैठक

    मुंबई : आज मुंबईत शिक्षणमंत्री आणि माध्यमिक बोर्डाच्या अध्यक्षांची बैठक

    बैठकीत परीक्षेसंदर्भात होणार चर्चा

    परीक्षा ऑनलाईन घेणं शक्य नाही 30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं अशक्य आहे

    बोर्डाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण

    शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि बोर्ड अध्यक्ष शरद गोसावी यांच्यामध्ये होणार चर्चा

    ऑफलाईन परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण, ऑनलाईन शक्य नाही, बोर्ड अध्यक्षांचं स्पष्टीकरण

  • 01 Feb 2022 09:05 AM (IST)

    कोल्हापुरात विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

    कोल्हापूर : विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

    कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथील घटना, काल संध्याकाळची घटना

    अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग विझवली

    आगीमध्ये सहा ते सात लाखाच्या दुचाकींचे नुकसान

  • 01 Feb 2022 09:03 AM (IST)

    गोवा निवडणुकीसाठी 301 उमेदवार रिंगणात, 14 फेब्रुवारी रोजी होणार मतदान

    गोवा- गोवा निवडणुकीसाठी 301 उमेदवार रिंगणात

    गोव्यात 40 जागांवर 14 फेब्रुवारी रोजी होणार मतदान

    गोवा राज्यातील शिवोली मतदार संघात सर्वाधिक 13

    तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांखळीत मतदार संघातून 12 उमेदवार रिंगणात

    31 उमेदवारांची निवडणुकीतून माघार

    पणजी मतदार संघात 7 उमेदवार रिंगणात

  • 01 Feb 2022 08:26 AM (IST)

    राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचं मिशन पुणे महापालिका, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी करणार पुणे दौरा 

    पुणे : राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचं मिशन पुणे महापालिका

    6 आणि 7 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे करणार पुणे दौरा

    पदाधिकाऱ्याऱ्यांच्या विकासकामांचा करणार शुभारंभ

    महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेनेची मोर्चेबांधणी

    आदित्य ठाकरे घेणार पक्षाची पदाधिकारी बैठक

    टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 01 Feb 2022 08:22 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील 9 अवैध बायोडिझेल पंप चालकांना नोटीस 

    बुलडाणा : जिल्ह्यातील 9 अवैध बायोडिझेल पंप चालकांना नोटीस

    जिल्हा पुरवठा अधिकारी विभागाची कारवाई

    मलकापूर तालुक्यात सुरुय मोठ्या प्रमाणात अवैध आणि भेसळयुक्त डिझेल पंप

    बायोडिझेल पंपाला जिल्हा प्रशासनाने कोणततीही परवानगी दिली नसताना सुरु आहे विक्री

    कारवाईसाठी पुरवठा विभागाने कसली कंबर

  • 01 Feb 2022 07:53 AM (IST)

    हिंदुस्तानी भाऊल अटक, बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता

    हिंदुस्तानी भाऊल अटक

    बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता

  • 01 Feb 2022 07:28 AM (IST)

    हिंदूस्तानी भाऊला सकाळी 10 नंतर बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता

    मुंबई - हिंदूस्तानी भाऊला आज सकाळी नायर रुग्णालयात मेडीकलसाठी नेल्याची माहीती

    - 10नंतर बांद्रा कोर्टात हजर करणार असल्याची माहीती…

    - कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस ठाण्याबाहेर वाढणार बंदोबस्त…

    - मेडीकल करून पुन्हा धारावी पोलीस ठाण्यात आणणार..

    - कोणतीही अधिकृत माहीती देण्यास पोलिसांचा नकार…

  • 01 Feb 2022 07:13 AM (IST)

    पुण्यातील मनसे पदाधिकारी भाजपसोबत युतीसाठी आग्रही 

    पुणे - पुण्यातील मनसे पदाधिकारी भाजपसोबत युतीसाठी आग्रही

    - पुण्यातील युतीबाबत मुंबईतील बैठकीत होणार निर्णय

    - तीनचा प्रभाग असल्यामुळे भाजपसोबत युती करावी मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका

    - भाजपसोबत युती केल्यास मनसेच्या संख्याबळ वाढणार

    - पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडले राज ठाकरेंसमोर युतीचे गणित

Published On - Feb 01,2022 6:21 AM

Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.