Maharashtra News Live Update : महाराष्ट्रात 407 कोरोना रुग्णांची नोंद

| Updated on: Feb 28, 2022 | 10:52 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रात 407  कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : आज सोमवार 28 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकीय, सामाजिक यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचे आझाद मैदानातील उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळणार का? असा सवाल विचारला जात आहे. या दोन्ही राजकीय घडामोडींमुळे महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे, दोन दिवस उलटल्यानंतरही शिवसेना नेते आणि बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरुच आहे. तर युद्धभूमी युक्रेनमधून अनेक भारतीय विद्यार्थी मायभूमीत परत येत आहेत. यासारख्या विविध स्तरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Feb 2022 08:32 PM (IST)

    महाराष्ट्रात 407 कोरोना रुग्णांची नोंद

    महाराष्ट्रात 407 कोरोना रुग्णांची नोंद

  • 28 Feb 2022 08:30 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांना अटक

    तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना अटक

    जिल्हा रुग्णालय आय सी यु जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा दोषी

    जिल्हा रुग्णालयाच्या आय सी यु ला आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता

    त्यानंतर समिती स्थापन करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता

    त्यात पोखरणा दोषी असल्याचं सिद्ध झालं

    तर पोखरणा यांना शहर पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे यांनी केली अटक

    वैयक्तिक जामिनावर सुटका

  • 28 Feb 2022 05:46 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच उपमुख्यमंत्र्यांच कौतुक करतो,नियुक्त्यांचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय: संभाजी छत्रपती

    मुख्यमंत्र्यांच उपमुख्यमंत्र्यांच कौतुक करतो

    सगळ्या मागण्या या मिनीट्समध्ये आणल्यात

    टाईम बाऊंड ऑन पेपर आणून दिलंय

    मी आभार व्यक्त करतो

    नियुक्त्यांचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय

    मलाही विश्वास नव्हता मात्र तो निर्णय घेतलाय

  • 28 Feb 2022 05:39 PM (IST)

    सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करतील : एकनाथ शिंदे

    आनंदाचा दिवस आहे

    सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करतील,

    सारथीच व्हीजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत ठेवलं जाईल

    पदं ही 30 जूनपर्यंत भरण्याचा निर्णय घेतलाय

    उपकेंद्रासाठी जमिन देण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल,15 मार्चपर्यंत

    अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय

    कर्जाची मुदत ही 10 लाख रुपये होती ती 15 लाख रुपये केलीये

    15 मार्चपर्यंत संचालक मंडळांची नियुक्ती केली जाईल,

    उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यादी घेऊन वसतिगृह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल,

    कोपर्डीतील घटनेतील केस महाधीवक्यांकडून मेंशन करण्यात येईल,

    मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येईल,

    ज्यांचा सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील

    मराठा आंदोलनात मृत पावलेल्या लोकांना 18 नोकऱ्या मिळाल्यात

    इतरांना ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेतलाय

    छत्रपती संभाजीराजेंची मागणी होती, स्थिगितीपुर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडीचा पर्याय अधिसंख्येची पदं निर्माण करून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय एका महिन्यात मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल

    हा ऐतिहासिक निर्णय आहे..एक दिवस महत्वाचा आहे..

    महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा

    मागण्या होत्या त्यापेक्षा जास्तीचा विचार केलाय

    आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय

    आपण उपोषण मागे घ्यावौ

  • 28 Feb 2022 05:33 PM (IST)

    आपल्या लढ्याला यश मिळालं: एकनाथ शिंदे

    संभाजीराजे तुमची राज्याला, देशाला गरज आहे

    मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत

    काही कायदेशीर बाबी असतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अमित देशमुख आणि  सर्व विभागाचे अधिकारी होते

    मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू केलं

    तुमच्या सगळ्यांना गरज आहे

    तांत्रिक बाबी असतात त्यासाठी दिलीप वळसे पाटील, सगळ्या विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव होते,

    सरकार देऊ शकतं हा तुमचा आग्रह होता,

    मात्र राज्य सरकारच्या हातात जे आहे ते द्या ही भूमिका तुम्ही घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला

    आपले मुद्दे मांडले सकारात्मक नाही तर निर्णय झालेला आहे..

    आपल्या लढ्याला यश मिळालं आहे

  • 28 Feb 2022 05:28 PM (IST)

    मला वाचवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो: संभाजी छत्रपती

    संभाजीराजे बोलतायेत

    मला आनंदाने सांगायचंय

    आरक्षण हा दीर्घाकालीन लढा मात्र ज्या मागण्या ठेवल्या होत्या,

    संभाजीराजेंनी समन्वयकांना विचारलं

    त्यांच्याकडे राज्य सरकारच्या निर्णयाचा कागद दिलाय

    मला आनंदानं सांगायचं ज्या मागण्या सरकारपुढं ठेवल्या होत्या. त्यापैकी कोणत्या मागण्या मान्य झाल्यात त्या एकनाथ शिंदे आपल्यापुढं मांडतील. काही प्रतिक्रिया असेल तर फेसबुक पेजवर टाका, मी आभाराचं नंतर बोलेन पण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, राहुल शेवाळे यांचे आभार मानतो

    डॉ. श्रीकांत शिंदे हे माझे खास मित्र आहेत.

  • 28 Feb 2022 05:16 PM (IST)

    मी 25 तारखेला रात्री 9 वाजता जेवलोय, मी मागे जाऊन ज्यूस पिणारा नाही, लेखी मिळाल्याशिवाय माघार नाही : संभाजी छत्रपती

    मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण बंद केल्यानंतर समाजाच्या अनेक मागण्या समोर आल्या होत्या. त्यावेळी अनेक समन्वयकांसोबत चर्चा केल्यानंतर आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. पण, गरीब मराठ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी आम्ही मूक आंदोलन करायचं ठरवलं. कोविडचा काळ होता, कोविडची महामारी वाढत होती. या समाजानं आपल्या भावना 2016 मध्ये, समन्वयकांनी मांडल्या आहेत. त्यांना पुन्हा वेठीस धरायचं का? आम्ही बोललोय आता तुम्ही बोला, जे सत्तेत आहेत त्यांनी बोलाव, आमदार, खासदार यांनी बोलावं, असं ठरलं. पहिलं आंदोलन 16 जूनला कोल्हापूरला झालं. त्यानंतर सरकारनं तातडीनं 17 जूनला चर्चेला बोलावलं. अनेकांनी सरकरारशी चर्चेला जायला नको सांगितलं. त्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेते होते. त्यावेळी अटर्नी जनरल उपस्थित होते, त्यांनी 15 दिवसात प्रश्न सोडवतो, असं सांगितलं. त्यानंतर दोन महिन्याची मुदत घ्या पण प्रश्न सोडवा, असं म्हटलं. त्यानंतर नांदेड, रायगड इथं आंदोलन केलं. पण सरकारवर काही फरक पडला नाही. त्यामुळं पुन्हा समजाला वेठीस धरायचं का? अनेक लोक म्हणायला लागले राजे आपली पुढची भूमिका काय? म्हणून मी स्वत: निर्णय घेतला. आमरण उपोषणाचा निर्णय घ्यायला नको, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे बघून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला.

    मी 25 तारखेला रात्री 9 वाजता जेवलोय,

    मी मागे जाऊन ज्यूस पिणारा नाही

    जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही

    मी समाधानी नाही

    मंचावर दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, अमित देशमुख दाखल

    विजयबापू शिवतारे उपस्थित

    कार्यकर्त्यांना दिला संभाजीराजेंनी सल्ला

    घोषणा देऊ नका ,नसेल ऐकायचं तर बाहेर.जा

    मंचावरचं बैठक सुरू

    संभाजी छत्रपतींसमोर राज्य सरकारची भूमिका मांडली जाणार

  • 28 Feb 2022 04:06 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकारने छत्रपती संभाजीराजेंची फसवणूक केली : राधाकृष्ण विखे पाटील

    महाविकास आघाडी सरकारने छत्रपती संभाजीराजेंची फसवणूक केली,

    राजकीय स्वार्थापोटी आरक्षण घालवण्याचं काम या सरकारने केला

    माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे

    आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत, मात्र महाविकास आघाडी सरकार हे मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही

    त्यामुळे हे करण्याची वेळ आली..यांना आरक्षण टिकवता आलं नाही

    त्यामुळे सगळे खापर देवेंद्र फडणवीसांवर सरकार फोडतंय

    राधाकृष्ण विखे पाटलांची टिका

  • 28 Feb 2022 02:51 PM (IST)

    प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त

    प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय

    नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.

    नागपूर आणि अहमदनगरमधील जमीन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

  • 28 Feb 2022 02:07 PM (IST)

    नाशकात गोयंका प्लास्टिक कंपनीत भीषण आग

    इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारात असलेल्या कंपनीत भीषण आग

    गोयंका प्लास्टिक असे कंपनीचे नाव

    आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज

    कंपनीत प्लास्टिकचे पुतळे तयार केले जात असत

    गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद

    आगीत संपूर्ण प्लास्टिकचे पुतळे जळून खाक

    आकाशात लोटले धुराचे लोट

    या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

    अग्निशमन दलाचे 2 गाड्या घटनास्थळी दाखल

    आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

  • 28 Feb 2022 01:26 PM (IST)

    अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ

    मनसे नेते अमित ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचा पक्षातील पदाधिकाऱ्यांना आनंद झाला असून अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक आणि विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जमू लागले आहेत.

  • 28 Feb 2022 12:44 PM (IST)

    शिवसेना खासदार श्रीरंग बारणे संभाजीराजेंच्या भेटीला

    मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आझाद मैदानावर

    संभाजीराजेंचा मित्र म्हणून भेटीसाठी आलोय

    हे उपोषण मराठा समाजासाठी आहे, त्यांची मागणी योग्य आहे

    समाजासाठी लढणारा राजा त्यांचे ते वंशज आहेत

    सरकार सरकारच्या पद्धतीने निर्णय घेईल मी सरकारचा प्रतिनिधी नाही तर राजांचा मित्र म्हणून आलो आहे

  • 28 Feb 2022 12:25 PM (IST)

    उस्मानाबादेत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

    महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामींच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते. याचा निषेध म्हणुन बहुजन समाज संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून उस्मानाबादेत जोरदार घोषणाबाजी. तसेच उस्मानाबाद पोलीसात कायदेशीर गुन्हा दाखल करणार असून यापुढे छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही असा इशारा दिला.

  • 28 Feb 2022 11:11 AM (IST)

    ट्रिपल टेस्टचं काम जवळपास पूर्ण, ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे, भुजबळांची प्रतिक्रिया

    ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे, ओबीसी नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

    - आम्ही आतुरतेने वाट बघत होतो - आमच्या बाजूने निकाल येईल अशी आशा होती - ट्रिपल टेस्टचं काम जवळपास पूर्ण - आता 2 तारखेला सुनावणी - आणखी दोन दिवस वाट बघावी लागेल - मला 100 टक्के अपेक्षा आहे निकाल आमच्या बाजूने - इंपेरिकल डेटा दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आयोगाकडे द्यायला सांगितलं - आयोगाकडे आम्ही डेटा दिला - अंतरिम अहवालात ओबीसी लोकसंख्या 38 पेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे- 38 टक्के असताना 27 टक्के द्यायला हरकत नाही असं आयोगाने म्हटलं आहे - सरकारने सुप्रीम कोर्टात जावं असं इलेक्शन कमिशनने म्हटलं - आज आमच्या विनंती अर्जावर सुनावणी होती - दुर्दैवाने निकालविरोधात आला, तर देशातील सर्व राज्यांना याच अडचणीत
    - अधिवेशानंतर आणखी गती मिळेल - NDA आणि 12 वी परीक्षा एकत्र येत आहेत हे खरं आहे - वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून पेपर बाबत तोडगा काढणार - आपली मुलं NDA मध्ये जायला हवी
  • 28 Feb 2022 10:57 AM (IST)

    ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 2 मार्चला

    ओबीसी आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली, बुधवार 2 मार्चला पुढील सुनावणी होणार

  • 28 Feb 2022 10:52 AM (IST)

    शिवरायांविषयीचे वक्तव्य राज्यपालांनी मागे घ्यावे, उदयनराजेंची मागणी

    राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

  • 28 Feb 2022 10:47 AM (IST)

    संभाजीराजेंना पाठिंबा, पंढरपुरात कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूर बंदची हाक दिली आहे. सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आहे. आजच्या बंदमुळे पंढरपूर शहरातील सर्व व्यवस्था ठप्प झाले आहेत. बंद दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
  • 28 Feb 2022 10:45 AM (IST)

    कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध, पुणे महापालिकेबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे आंदोलन, पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलन, आंदोलकांना पालिकेत प्रवेशबंदी, प्रवेशद्वारावर आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची

  • 28 Feb 2022 10:42 AM (IST)

    संभाजीराजेंच्या दीर्घायुष्यासाठी पुण्यात महादुग्धाभिषेक

    खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण आणि इतर मागण्यासाठी आझाद मैदानावर सुरु झालेल्या आंदोलनाला आता ग्रामीण भागातून पाठिंबा मिळतोय. संभाजीराजेंच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत पुण्याच्या राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिरात महादुग्धाभिषेक करत पठण करण्यात आले

  • 28 Feb 2022 10:30 AM (IST)

    संभाजीराजेंच्या उपोषणाला समर्थन, नांदेडमध्ये टायरची जाळपोळ

    नांदेड: छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून रस्त्यावर टायर जाळले, नांदेड- हैदराबाद मार्गावर मारतळा गावाजवळची घटना, मराठा आंदोलकांनी टायर जाळल्याचा दावा

  • 28 Feb 2022 10:29 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांसमोर मराठा समाजाची भूमिका नीट मांडा, संभाजीराजेंची समन्वयकांना सूचना

    तिथे बोलताना आपण नीट बोला आणि चर्चा करा... मराठा समन्वयकांनी या चर्चेतून मार्ग काढून यावा... मराठा समन्वयक हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चेला जाणार आहेत... त्या चर्चेमध्ये आपल्या समाजाच्या भूमिका या योग्य पद्धतीने मांडा आणि योग्य ती भूमिका मांडा समाजासाठी हे महत्वाचं आहे पण चर्चेसाठी जा आणि चर्चा करा पण निर्णय सुद्धा तिथे घ्या पण नाही घेता आला तर तुम्ही इथे येऊन चर्चा करा कायदा हातात घेऊ नये ह्या मतांचा मी आहे सर्व समन्वयकांना मी सांगितले आहे की वर्षावर जा आज खुप त्रास होत आहे पण सरकारने आणि समाजाने ठरवावं मला कुठं न्यायचं आहे आज सकाळी मेसेज आला आहे की बसून मार्ग काढू काही अंहकार ठरवण्यापेक्षा समाजाचा प्रश्न निकाली लागला पाहिजे आम्ही प्रमुख 6 मागण्या मागितल्या आहेत आणि हे सर्व सरकार करु शकते त्यासाठी काय केंद्रात किंवा कोर्टात जावं लागत नाही ज्या सहा मागण्या आहेत त्यासाठी माझी इच्छा उपोषणाची नाही आहे पण महाराजांची एकच शिकवण आहे मी तुलना करत नाही पण महाराजांनी अन्यायाच्या विरोधात नेहमी लढा दिला आहे मी 2007 पासून गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे

  • 28 Feb 2022 10:25 AM (IST)

    छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

    छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

    11 वाजता सर्व विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची वर्षावर बोलवली बैठक

    मराठा समन्वयक जाणार वर्षावर

    आज वर्षावर संभाजीराजेंच्या प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक

    बैठकीनंतर पुढची दिशा ठरणार

    मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 28 Feb 2022 10:24 AM (IST)

    यशवंत जाधवांची इन्कम टॅक्स चौकशी संपली

    शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाकडून सुरु असलेली मॅरेथॉन  चौकशी अखेर संपली. तब्बल चार दिवसांनंतर या चौकशीला ब्रेक लागला आहे. शुक्रवार सकाळपासून इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. चौथ्या दिवशी, जवळपास 75 तासांनंतर अधिकारी निघाल्याची माहिती आहे. आतापर्यंत 33 ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण 2 कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईवरुन राजकारणही तापलं होतं. केंद्र सरकार सूड भावनेने ही कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता.

  • 28 Feb 2022 09:38 AM (IST)

    राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपने भूमिका घ्यावी : संजय राऊत

    संजय राऊत लाईव्ह :

    नक्कीच आतापर्यंत जगात अनेक युद्ध झाली पण अश्या प्रकारे एका देशात भारतीय नागरिकांना विद्यार्थ्यांना अशी मारहाण झाली नाही विद्यार्थ्यांचा आक्रोश हे सरकारच अपयश आहे निवडणुका आहेत म्हणुन आँपरेशन गंगा हे निवडणुकीचं राजकारण करणं बंद केलं पाहिजे देशाची मुलं आज संकटात असताना राजकारण सरकारने राजकारण बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे

    राज्यपालांच्या वक्तव्यावर-

    भाजपने आता नवे व्याख्याते निर्माण केले आहेत यावर भाजपने उत्तर द्यावे दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपचे रस्त्यावर उतरले असते यावर ताबडतोब भाजपने भूमिका घेणं गरजेचं आहे

    निवडणुका

    विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करेल हे पाहिलं पाहिजे 2024 ला बदल होणार, परिवर्तन होणार नेता महाराष्ट्रातला सुद्धा होऊ शकतो रावसाहेब दानवेंना चिंता करायची गरज नाही

    मराठा आरक्षण

    मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील आहे चर्चेतून मार्ग निघावा ही सर्वांची भूमिका आहे संभाजीराजेंनी टोकाची भूमिका न घेता चर्चेतून मार्ग काढला पाहिजे

  • 28 Feb 2022 08:16 AM (IST)

    केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना एमआयएम दाखवणार काळे झेंडे

    औरंगाबाद : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना एमआयएम दाखवणार काळे झेंडे

    एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

    विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत दाखवणार काळे झेंडे

    गॅस पाईपलाईनच्या उद्घाटनासाठी हरदीप सिंग पुरी 2 मार्चला औरंगाबाद शहरात

    औरंगाबादला मिळणाऱ्या चार हजार कोटी रुपयांच्या गॅस प्रकल्पास इम्तियाज जलील यांचा विरोध..

    शहराला पाण्याची गरज मात्र गॅस पाईपलाईन कशाला असे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल..

  • 28 Feb 2022 08:15 AM (IST)

    दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा यंदा होण्याचे संकेत

    कोल्हापूर - दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षी होण्याचे संकेत

    एप्रिल महिन्यात होणार ज्योतिबा चैत्र यात्रा

    कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून रद्द करावी लागली होती यात्रा

    कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावर्षी यात्रा भरवण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आज हालचाली

  • 28 Feb 2022 08:13 AM (IST)

    औरंगाबाद जळगाव महामार्गावर चालत्या गाडीला आग

    औरंगाबाद जळगाव महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट

    गाडीतील चालक आणि प्रवाशांनी गाडीतून मारल्या उड्या

    काही वेळातच गाडी पूर्णपणे आगीच्या कचाट्यात सापडून स्फोट

    औरंगाबाद जळगाव महामार्गावरील फरदापूर येथील घटना..

    सुदैवाने कुठल्याही प्रकारे जीवितहानी नाही..

  • 28 Feb 2022 08:11 AM (IST)

    राडा झालेल्या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रवादीला चितपट, 11 पैकी 11 जागांवर भाजप विजयी

    औद्योगिक वसाहतीच्या संचालक निवडणुकीत काल भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
    परभणीच्या जिंतूरमध्ये दोन्ही गटांमध्ये सिने स्टाईलमध्ये तुफान हाणामारी झाली होती
    दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या.
    पोलिसांनी लाठीचार्ज केला, कशीबशी निवडणूक पार पडली
    दुपारी आलेल्या निकालात मात्र भाजपने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत 11 च्या 11 जागांवर विजय मिळवला.
    दरम्यान, विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला.
  • 28 Feb 2022 08:08 AM (IST)

    पेट्रोल पंपावर टोळक्याची ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

    सोलापूर : पेट्रोल पंपावर टोळक्याची ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
    - रांगेतून पेट्रोल घेण्यास सांगितल्याने टोळक्याचा हल्ला
    - चार ते पाच जणांनी गाडी तसेच पेट्रोल पंपावरील स्वॅप मशीनसह विविध वस्तूंची केली तोडफोड
    - सोलापुरातील नवल पेट्रोल पंपावरील घटना सीसीटीव्हीत कैद
    - पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही
    - काल रात्री 9 वाजता घडली घटना
  • 28 Feb 2022 07:33 AM (IST)

    कसबे डिग्रज येथील MSEB चे सब स्टेशन पेटवले

    कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यात महावितरण विरोधातील आंदोलनाचा भडका

    कसबे डिग्रज येथील MSEB चे सब स्टेशन पेटवले

    मध्यरात्री अज्ञातांनी पेटवले सब स्टेशन

    शेतीला दिवसा वीज द्या या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून राजू शेट्टी यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे

    आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने तीन दिवसांपूर्वीच अज्ञातांनी कागल मधील कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय पेटवलं होतं

  • 28 Feb 2022 07:29 AM (IST)

    पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडणूक तारीख ठरली

    पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 4 मार्चला

    - 14 मार्चला महापालिकेची मुदत संपत असल्याने नवीन अध्यक्षांना केवळ दहा दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे,

    - स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 1 मार्च रोजी संपणार असल्याने नुकतीच नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली,

    - निवडणुकीचे वर्ष असल्याने जेमतेम दोन महिने अध्यक्षपदाच्या कामकाजासाठी मिळणार आहेत.

  • 28 Feb 2022 07:28 AM (IST)

    राजधानी नवी दिल्ली कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्त

    राजधानी नवी दिल्ली आजपासून कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्त होणार आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त मास्क लावण्याची सक्ती यापुढे राजधानीत असेल, मात्र कारमध्ये मास्क लावण्याची सक्ती आजपासून मागे घेण्यात आली आहे, तर दंडाच्या रकमेतही मोठी कपात करण्यात आली आहे. मेट्रोमधील प्रवास आणि दुकानांवरचे सगळे निर्बंध आजपासून हटवण्यात आल्याने राजधानी निर्बंध मुक्त होणार आहे

  • 28 Feb 2022 07:26 AM (IST)

    नाशकात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

    नाशिक - अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

    मलम लावण्याचा बहाणा करत मुलीला नकोसा स्पर्श

    मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रतिबंधित कायद्या अन्वये गुन्हा दाखल

  • 28 Feb 2022 07:25 AM (IST)

    भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

    - नागपुरात राजकीय तणाव, भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप

    - भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात तोडफोडीनंतर वाढला तणाव

    - पोलिसांकडून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात वेगवेगळे गुन्हे

    - भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

    - काल पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने केले आरोप, आज भाजपचे विक्की कुकरेजा यांची पत्रकार परिषद

  • 28 Feb 2022 07:24 AM (IST)

    वृक्षतोड प्रकरणात नागपूर मनपाच्या अभियंत्यावर गुन्हा

    - नागपूर मनपातील कनिष्ठ अभियंत्यासह कंत्राटदाराविरोधात एफआयआर दाखल

    - अजनी रेल्वे क्वार्टर परिसरातील विनापरवाना वृक्षतोड प्रकरणात कारवाई

    - नागपूर मनपाच्या उद्यान विभागाद्वारे अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

    - पहिल्यांदाच वृक्षतोड प्रकरणात मनपाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

  • 28 Feb 2022 06:18 AM (IST)

    मनपा आयुक्तांवर शाईफेक, आमदार रवी राणांच्या जामिनाकडे लक्ष

    अमरावती : अमरावती महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाई फेक प्रकरण, आज आमदार रवी राणा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार, रवी राणा यांना अटकपूर्व जामीन मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने दिलेली ट्रांजिस्ट बेलची मुदतही आज संपणार, शाईफेक प्रकरणातील पाच आरोपी अजूनही फरारच..

  • 28 Feb 2022 06:17 AM (IST)

    चौथ्या दिवशीही यशवंत जाधव यांच्या घरी आयकर छापेमारी सुरु

    मुंबई : सलग चौथ्या दिवशीही शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरु असलेली छापेमारी अजूनही चालूच आहे. रात्री यशवंत जाधव यांच्या घरी काही अधिकारी ठाण मारून बसले आहेत. बाहेर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • 28 Feb 2022 06:15 AM (IST)

    राजपेठ उड्डाणपुलाच्या नामकरणासाठी संभाजी भिडे अमरावतीत

    शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आज अमरावतीत येणार

    बहुप्रतीक्षित राजपेठ उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्याला राहणार उपस्थित

    राजपेठ उड्डाणपुलाचे नामकरण आता राजे संभाजी महाराज उड्डाणपूल होणार

    रात्री सात वाजता होणार नामकरण सोहळा

    याच उड्डाणपूलावर आमदार रवी राणा यांनी बसवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा

  • 28 Feb 2022 06:14 AM (IST)

    खासदार संभाजीराजेंचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु

    मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या विभिन्न मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. रात्री संभाजीराजे आझाद मैदानात मंचावर, तर मराठा समाजाचे काही नागरिक मंचासमोर बसले आहेत.

Published On - Feb 28,2022 6:12 AM

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.