Maharashtra News Live Update : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, काय आहे ते पत्रचाळ प्रकरण?

| Updated on: Jul 31, 2022 | 4:27 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update :  संजय राऊत ईडीच्या ताब्यात, काय आहे ते पत्रचाळ प्रकरण?
मोठी बातमी

आज रविवार 31 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. गोरेगाव पत्रा चाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्यामुळे संजय राऊत (SANJAY RAUT) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Jul 2022 04:25 PM (IST)

    संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्या नंतर आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्या नंतर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  संजय राऊत  यांना खूप आधी अटक व्हायला पाहिजे होती. ईडीकडे संजय राऊत विरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. संजय राऊत दोन ते तीन वर्षे जेलमध्ये राहतील. जेलमध्ये गेल्यावरच संजय राऊत यांचा डोकं ठिकाणावर येईल अशी टीका केली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यात मोठा भूकंप येईल. संजय राऊत यांनी केले व अवैध संपत्ती कमावली ती जप्त सुद्धा ईडी करेल असेही रवी राणा म्हणाले.

  • 31 Jul 2022 03:37 PM (IST)

    संजय राऊतांची ईडी चौकशी राजकीय हेतूने असता कामा नये? एकनाथ खडसे

    संजय राऊत यांची इडी कडून सकाळपासून चौकशी सुरू आहे यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  संजय राऊत यांची जी ईडीची चौकशी सुरू आहे ते राजकीय हेतूने असता कामा नये? चौकशीत काही तथ्य असेल तर कारवाई व्हावी. मात्र, राऊत यांच्यावरील ईडीची ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असेल तर निषेधार्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

  • 31 Jul 2022 02:17 PM (IST)

    सत्तेत असताना शेतकऱ्यांना दमडी फेकून मारली नाही!

    सत्तेत असताना शेतकऱ्यांना दमडी फेकून मारली नाही!

    गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका

    अजित पवारांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न कळताय, गिरीश महाजनांनी साधला निशाणा...

    गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, एक दमडी फेकून मारली नाही, अजित पवार अर्थमंत्री होते त्यांनीही मदत केली नाही, आता ते विरोधी पक्षनेते आहेत, ते शेतकऱ्यांसाठी मागणी करताय ही चांगली गोष्ट आहे, असा चिमटाही गिरीश महाजन यांनी काढलाय

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले

  • 31 Jul 2022 01:15 PM (IST)

    सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने रौप्यपदक मिळाले

    पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करणार. पीपीपी मॉडेल यशस्वी होत नाही. त्यामुळे सरकारच काम करणार ठाकरे स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्काळ करण्यासारखे प्रस्ताव, मीड टर्म आणि लाँग टर्मचे प्रस्ताव पाठवून ते मार्गी लावू गोपीनाथ मुंडे स्मारकातील अडचणी दूर करू.

    सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने रौप्यपदक मिळाले. त्याला ३० लाख देणार. त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख देणार

  • 31 Jul 2022 01:13 PM (IST)

    क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला साकार - मुख्यमंत्री

    क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला साकार करणार आहे. पडेगाव ते समृद्धी मार्ग यात अडचण होते. ते कामही पूर्ण करणार आहे. एमएसआरडीसीच्या कामात त्याचा अंतर्भाव करू

    मराठवाड्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आत्महत्या होऊ नये म्हणून प्रिव्हेंटीव्ह अॅक्शन घेतली पाहिजे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना प्लान तयार करायला सांगितलं आहे. बँकांनाही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि बँकाचे अधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत.

  • 31 Jul 2022 01:12 PM (IST)

    मराठवाड्याचा आढावा घेतला. दुष्काळाची माहिती घेतली. घराचं नुकसान, पंचनामे, शेतीचं नुकसान आदींची माहिती घेतली

    मराठवाड्याचा आढावा घेतला. दुष्काळाची माहिती घेतली. घराचं नुकसान, पंचनामे, शेतीचं नुकसान आदींची माहिती घेतली. हे युतीचं सरकार आहे. ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱयांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊ. या जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न होता. जुनी योजना पाण्याची. ७०० मीमी जलवाहिनी बदलण्याची मागमी होती. पाईप बदलले तर २०० कोटी लागेल. त्यामुळे १७ ते १८ लाख लोकांना फायदा होईल. आता सात दिवसाने पाणी मिळतं. नंतर एक दिवस आड मिळेल. ७० एमएलडी पाणी उपलब्ध होईल

  • 31 Jul 2022 01:12 PM (IST)

    वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी आली होती - एकनाथ शिंदे

    शिंदे

    वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी आली होती. नांदेड शहराच्या रस्त्याचे प्रस्ताव आला. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. नांदेड-जालना एक समृद्धी हायवे करणार आहोत. नांदेडातील भूमिगत गटार योजना मंजूर करू. लातूरचं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. त्यासाठी मोफत जमीन देण्याच्या अडचणी दूर करू. घाटी रुग्णालयाचं खासगीकरण करणार नाही याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

  • 31 Jul 2022 12:48 PM (IST)

    देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरी केला जात आहे

    देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरी केला जात आहे तर दुसरीकडे आदिवासी समाजाला न्याय दिला जात आहे मात्र या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात राहणारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाण्यातुन जीवघेणी कसरत करुन शाळा गाठावी लागत असल्याच विदारक चित्र समोर आले आहे. उमराणी गावाअंतर्गत येमाऱया काल्लेखेतपाडा शाळेवरच्या विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या शाळेत परिसरातल्या सावरीपाडा, देवपाडा, मोवाडीपाडा, पाटीलपाडा, होळीपाडा, खालचापाडा, नीलपीपाडा या पाड्यावरून 60 ते 70 विद्यार्थी शाळेत येत असताता. मात्र या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना शाळा लगतच्या नाल्यातुन यावे लागते. या नाल्याला सध्या पुर आला असुन त्यातही पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे चिमुकल्यांना रोज दोरीच्या सहाय्याने नाला पार करावा लागत आहे. यात जोखीम असल्याने स्वत शिक्षक आणि ग्रामस्थ देखील नाल्यात उभे राहुन विद्यार्थ्यांना नाला पार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना रोज दिवसातुन दोन वेळा जीव धोक्यात घालुन आपला शैक्षणिक प्रवास करावा लागत असल्याच विदारक चित्र समोर य़ेत आहे.

  • 31 Jul 2022 12:47 PM (IST)

    पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

    पुणे शहरात एकाच वेळी नऊ जुगार अड्ड्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

    पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई.

    सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत ९४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे

    आत्तापर्यंतची शहरातील सगळ्यात ही मोठी कारवाई मानली जाते आहे.

    शहरातील बिबवेवाडी भागातील सहा दुकानांवर व इतर सार्वजनिक ठिकाणी दुचाकीवर सुरू असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन लाॅटरी जुगार, सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणारे व खेळवणारे अशा एकुण ९४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    खेळींना आकर्षित करण्यासाठी काही जुगार चालवणाऱ्यांनी तर चक्क "आ़ओ चलो खिलाडी, खेल शुरु है बिबवेवाडी" असे मेसेज नागरिकांना पाठवले होते. यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

  • 31 Jul 2022 12:40 PM (IST)

    संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवरून इम्तियाज जलील यांनी भाजपवर जोरदार टीका

    औरंगाबादला खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. औरंगाबादच्या नामांतरावरून जलील यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा घेतला होता. मात्र मुख्यमंत्री यांनी त्यांना भेटीला बोलावलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून आम्ही नामांतर करू नका असं मुख्यमंत्र्यांना सांगितले असं जलील यांनी म्हटलेलं आहे.

    तसेच संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवरून इम्तियाज जलील यांनी भाजपवर जोरदार टीका केलीये. जे जे भाजप विरोध बोलतात त्यांच्यावर सर्वांवर ईडीची कारवाई होणार आहे असा टोला जलील यांनी लगावलाय. तसेच जेव्हा पासून भाजप सत्तेवर आला आहे तेव्हापासून विरोधात बोलले की ईडीची कारवाई केली जाते असा आरोप त्यांनी केलाय. तर जो विरोधात बोलेल त्याला भाजप आत मध्ये टाकू शकते अस मत जलील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांनी....

  • 31 Jul 2022 12:39 PM (IST)

    मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल ही चर्चा ऐकून ऐकून आम्ही थकलो आहोत - नाना पटोले

    मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल ही चर्चा ऐकून ऐकून आम्ही थकलो आहोत...

    त्यामुळे दोन जणांच्या या सरकारने शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी

    विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे... आता बहुतांशी शेतकरी फक्त रब्बी हंगामावर अवलंबित आहेत...

    त्यामुळे शेतकरी खचले आहेत... मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल या चर्चेत न अडकता विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी

    आता विदर्भात सर्वत्र पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे तातडीने पंचनामे करणे शक्य असून प्रशासनाने ती कारवाई लवकर करावी

    संजय राऊत ईडी कारवाई वर बोलले नाही

  • 31 Jul 2022 12:37 PM (IST)

    पीएमटीचे शहरातील 25 मार्ग बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय, तर नव्याने चार मार्ग देखील सुरू होणार

    पीएमटीचे शहरातील 25 मार्ग बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय, तर नव्याने चार मार्ग देखील सुरू होणार

    पुणे शहरातील जवळपास 25 मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमटी प्रशासनाने घेतला आहे. तर नव्याने ४ मार्ग सुरू करण्याचा निर्णय देखील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरातील एकूण 25 मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद खूप अल्प प्रमाणात मिळत आहे त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पीएमटी प्रशासनाला मोठं नुकसान होत असल्याने हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी तोट्यातील हे मार्ग बंद करण्यात येणार आहेत.तर शहरातील काही मार्गांवरचा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत 20 मार्गांवर बसच्या फेऱ्या अधिक वाढवण्याचा निर्णय देखील पीएमटी प्रशासनाने घेतला आहे. येत्या तीन दिवसात याची देखील अंमलबजावणी होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

  • 31 Jul 2022 11:57 AM (IST)

    कनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा

    राजधानीत विमानतळावर रात्री महत्त्वपूर्ण चर्चा

    अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचीही चर्चा

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झाली महत्त्वपूर्ण चर्चा सूत्रांची माहिती

    तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे झाली चर्चा

    चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते महाराष्ट्रात परतले

  • 31 Jul 2022 11:04 AM (IST)

    अर्जुन खोतकर यांचं पूर्ण वक्तव्य एकल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे

    छगन भुजबळ On संजय राऊत - अशी कारवाई होन अपेक्षितच होत - एकदा तपास सुर झाला की हे होत - ऑफिस घर आणखी असेल तिथेही धाडी पडतात - आपण जिथे उभ आहोत तिथे कितीदा धाडी पडल्या मोजता येत नाही इतक्या धाडी पडल्या(भुजबळ फार्म)

    On अर्जुन खोतकर

    - अर्जुन खोतकर यांचं पूर्ण वक्तव्य एकल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे - मी आणि माझं कुटुंब अडचणीत आलो आहे म्हणून मला शिंदे गटात जावं लागत आहे - आता पर्यंत आपण सांगत होतो दबावातून जाताय आता तेच सांगताय आणखी काय सांगायला हव

  • 31 Jul 2022 10:34 AM (IST)

    महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला

    महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला

    सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर सुनावणी

    प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला 3 ऑगस्टला

    निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का?याच दिवशी कळणार\

  • 31 Jul 2022 10:28 AM (IST)

    महाराष्ट्रातल्या आजवरच्या विद्यार्थी चळवळीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन!!

    महाराष्ट्रातल्या आजवरच्या विद्यार्थी चळवळीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन!!

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार शिक्षण क्षेत्रात मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उद्या मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी १६वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्री. अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील तब्बल १०० महाविद्यालयांत 'मनविसे युनिट उदघाटन सप्ताह' राबवण्यात येणार आहे. अक्षरशः शेकडो नव्हे हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी श्री. अमितजी ठाकरे यांच्यासोबत मनविसेत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

    दि. १ आणि २ ऑगस्ट रोजी श्री. अमितजी ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबईतील २५हून अधिक महाविद्यालयांतील मनविसे युनिट फलकाचे अनावरण होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महामुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथेही प्रत्येक जिल्ह्यात अनेक महाविद्यालयांत पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग असलेले 'मनविसे युनिट' स्थापन होणार आहेत.

  • 31 Jul 2022 09:46 AM (IST)

    मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटलेला

    मराठा आरक्षणा संदर्भात घेणार भेट

    रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना देणार

  • 31 Jul 2022 09:44 AM (IST)

    बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमी जास्त पावसाला सुरुवात

    बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमी जास्त पावसाला सुरुवात झालीय. मध्यरात्री झालेल्या पावसानं सिंदफणाच्या उपनदीला पूर आलाय. नदीवरील पूल देखील वाहून गेला आहे त्यामुळे पाच गावाचा संपर्क तुटला आहे.  गेवराई तालुक्यातील खांडवी तलाव ते अर्धा मसला, काजळवाडी, रुई, टाकळी या शिवारातून प्रवाहित होत सिंदफना नदीला येऊन मिळणाऱ्या उपनदीने रौद्ररूप धारण केले. तर  बीड तालुक्यातील चौसाळा, बोरखेड, अंधापुरी, पिंपळनेर, नाथापूर, घाटसावळी आदी गावांना देखील पावसानं झोडपून काढले आहे.

  • 31 Jul 2022 08:48 AM (IST)

    संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू

    संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. संजय राऊतांच्या समर्थनार्थ त्यांच्या घरी

  • 31 Jul 2022 08:33 AM (IST)

    संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

    संजय राऊतांची घरी दहा ईडीच्या अधिकाऱ्य़ांकडून चौकशी सुरु अशी माहिती त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी दिली आहे.

  • 31 Jul 2022 08:31 AM (IST)

    राऊतांच्या चौकशीला सुरुवात

  • 31 Jul 2022 08:20 AM (IST)

    राऊतांच्या घरी ज्यावेळी ईडी टीम दाखल झाली, त्यावेळची परिस्थिती

  • 31 Jul 2022 08:17 AM (IST)

    राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल, किरीट सोमय्याचं ट्विट चर्चेत

  • 31 Jul 2022 07:51 AM (IST)

    संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल 

    संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल

    आज अटक होण्याची शक्यता

  • 31 Jul 2022 06:40 AM (IST)

    खासदार उदयनराजे भोसले यांचे ट्वीट

    खासदार उदयनराजे भोसले यांचे ट्वीट

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे.

  • 31 Jul 2022 06:39 AM (IST)

    नवी मुंबई पोलीसांनी उरण मोठी कारवाई केली आहे

    नवी मुंबई पोलीसांनी उरण मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये उरण तालुक्यातील जासई येथील गोडाऊनमध्ये हजारो टन गव्हाचा साठा आढळून आला आहे. हा गव्हाचा साठा या गोडाऊनमध्ये कुठून आला, याची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे.

  • 31 Jul 2022 06:39 AM (IST)

    राज्यभर पावसाची विश्रांती; ४ ऑगस्टपर्यंत परिस्थिती कायम:

    राज्यभर पावसाची विश्रांती; ४ ऑगस्टपर्यंत परिस्थिती कायम: हवामान विभागाचा अंदाज मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून विदर्भात काही प्रमाणात पाऊस पडत आहे.

Published On - Jul 31,2022 6:28 AM

Follow us
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.