Devendra Fadnavis Live | जलयुक्त शिवाराच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

| Updated on: May 25, 2023 | 7:20 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Devendra Fadnavis Live | जलयुक्त शिवाराच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर आप आणि टीएमसीचा बहिष्कार. येत्या 28 मे रोजी होणार नव्या संसदेचं उद्धाटन. पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामाचा आढावा. गोंदिया जिल्हा झाला कोरोनामुक्त. शेवटच्या रुग्णालालाही मिळाला डिस्चार्ज. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व जोरदार पावसाला सुरुवात. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 May 2023 11:07 PM (IST)

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ

    लाहोर :

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ

    इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे बडे नेत्यांची पक्षाल सोडचिठ्ठी

    इम्रान खान यांचा पुन्हा शाहबाज सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाबोल

    सरकार आणि लष्कर मिळून आमच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकत असल्याचा इम्रान खान यांचा आरोप

  • 24 May 2023 09:04 PM (IST)

    विठ्ठल मंदिराचा 73 कोटी रुपयांचा नवीन विकास आराखडा मंजूर

    मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने केलेल्या विकास आराखडा मंजूर

    पुरातन वास्तू कलेशी सुसंगत होणार मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत बदल

    नव्याने होणाऱ्या मंदिराचे पहिले ॲनिमेटेड रूप खास प्रेक्षकांसाठी

    पुरातन वास्तु सौंदर्य नव्याने होणाऱ्या विकासा आराखड्यात दिसणार

    आषाढी यात्रेपासून नवीन विकास आराखड्याचे होणार काम सुरू

  • 24 May 2023 05:44 PM (IST)

    Devdenra Fadnavis Live | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे-केजरीवाल भेटीवरुन काय म्हणाले?

    केजरीवाल-ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपची ताकद दिसते, फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    सापनाथ, नागनाथ साथ आओ, फडणवीस यांचा टोला

    इंदिरा गांधी यांनी संसदेचं उद्घाटन केलेलं लोकशाही विरोधी होतं का? फडणवीस यांचा सवाल

    विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही : देवेंद्र फडणवीस

  • 24 May 2023 05:37 PM (IST)

    Devendra Fadnavis On Jalyukta Shivar Yojana 2.0 | जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात : देवेंद्र फडणवीस

    जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा

    बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतल्याची फडणवीस यांची माहिती

    जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस याचा निर्धार

    शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजना

    शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यासाठी प्रयत्नशील

    गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गती

  • 24 May 2023 05:24 PM (IST)

    Brij Bhushan Singh Narco Test | खासदार ब्रिजभूषण सिंह नार्कोटेस्टसाठी तयार

    महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरण, खासदार ब्रिजभूषण सिंह नार्कोटेस्टसाठी तयार

    माझ्यासह कुस्तीपटूंचीही नार्को टेस्ट करावी , यापूर्वी पोलिसांनी माझ्याकडे पाच-सहा तासांची चौकशी केली आहे यापुढेही पोलीस चौकशी करू शकतात

    ब्रिजभूषण सिंह यांनी नार्कोटेस्टला तयारी दर्शवल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेकडे कुस्ती जगताचे लक्ष

  • 24 May 2023 05:20 PM (IST)

    DCM Devendra Fadnavis Pune Tour | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुणे दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 मे रोजी पुणे दौऱ्यावर

    फडणवीस यांच्याकडून अभाविपच्या राष्ट्रीय बैठकीत मार्गदर्शन

    पुण्यात आजपासून अभाविपची कार्यकारणी बैठक

  • 24 May 2023 05:15 PM (IST)

    Sewari Nhava Sheva Sea Link | शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाचं काम पूर्ण

    शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 21.81 किमीचं काम पूर्ण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थोड्याच वेळात पाहणी

    एमएमआरडीएकडून सागरी सेतूचं बांधकाम पूर्णत्वास

  • 24 May 2023 04:48 PM (IST)

    आशिष शेलार शरद पवार यांच्या भेटीला

    शेलार सिल्व्हर ओकवर पवार यांची भेट घेणार

    भेटीमागचं कारण लवकरच कळणार

    सिल्व्हर ओकवर शेलार दाखल

  • 24 May 2023 04:40 PM (IST)

    शिवडी-न्वाहाशेवा प्रकल्पाचं काम पूर्ण

    मुख्यमंत्री सी लिंकवरुन आज करणार पाहणी

    जवळपास 21 किलोमीटराचा मार्ग

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करतील पाहणी

  • 24 May 2023 04:36 PM (IST)

    G-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट

    महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचा पुरातन वारसा पाहिला

    हेरिटेच वॉकसह केला अभ्यास दौरा

    वास्तूरचना आणि इमारतीची भव्यता पाहून शिष्टमंडळ गेले भारावून

  • 24 May 2023 04:27 PM (IST)

    नवीन संसदेच्या उद्धघाटन वादात आता AIMIM ची उडी

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करा उद्धघाटन

    एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांची मागणी

    पंतप्रधानांच्या हस्ते उद्धघाटन होणार असेल तर जाणार नाहीत

  • 24 May 2023 04:21 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार

    नुकसान भरपाई न दिल्याने शेतकरी आक्रमक

    फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर

    अखिल भारतीय किसान सभेने दिला इशारा

  • 24 May 2023 04:16 PM (IST)

    नवीन संसदेच्या उद्धघाटन कार्यक्रमावर आपचा बहिष्कार

    या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित न केल्याचा आरोप

    हा आदिवासी, मागास वर्गातील लोकांचा अवमान

    आपचे खासदार संजय सिंह यांचा आरोप

  • 24 May 2023 04:10 PM (IST)

    गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वे सोडाव्यात

    अजित पवार यांनी केली मागणी

    कोकणातील चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी सुविधा मिळावी

    रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठविले पत्र

  • 24 May 2023 04:05 PM (IST)

    हा तर नाटकी बहिष्कार

    विरोधकांनी नवीन संसद भवनाच्या उद्धघाटनाला केला विरोध

    आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी लगावला टोला

    विरोधक बहिष्काराचे नाटक करत असल्याचा केला आरोप

  • 24 May 2023 03:57 PM (IST)

    सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर

    शेतकऱ्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडवण्याचा इशारा

    विविध मागण्या पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेचा इशारा

    नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाही

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत 385 कोटी रुपये शेतकर्‍यांना कारखानदारांकडून येणे बाकी

    अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी दिला इशारा

  • 24 May 2023 03:37 PM (IST)

    डोंबिवली : महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला

    पथकासोबत आलेल्या पोलिसांनादेखील मारहाण

    कल्याण ग्रामीण भागातील खोणी गावातील घटना

    खोणी गावातील वीजपुरवठा महावितरणकडून खंडीत

    महावितरण कर्मचाऱ्यांच्या गाडीची तोडफोड

  • 24 May 2023 03:23 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : संभाजी ब्रिगेडकडूनही लोकसभेच्या तीन जागांची मागणी

    महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाचा ट्वीस्ट

    संभाजी ब्रिगेडही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत

    संभाजी ब्रिगेडकडून पुणे, हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी

    दोन किंवा तीन जागांवर लोकसभा उमेदवार उभे करण्याचे संभाजी ब्रिगेडची तयारी

    शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागा संभाजी ब्रिगेडला देण्याची मागणी

    दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे तीन जागांची मागणी केल्याची माहिती

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली माहिती

  • 24 May 2023 03:10 PM (IST)

    पुणे : गौतमी पाटीलवरून पुन्हा वादाची शक्यता

    पुण्यात आज गौतमी पाटीलच्या विरोधात पार पडली बैठक

    गौतमी पाटीलचे आडनाव गौतमी चाबुकस्वार आहे

    पाटील आडनाव लावून ही पाटलांची बदनामी करत आहे

    गौतमी पाटीलनं पाटील आडनाव लावू नये

    अन्यथा महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे कार्यक्रम होऊ देणार नाही

    राजेंद्र जराड पाटील मराठा समन्वयक यांनी दिला इशारा

  • 24 May 2023 03:00 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 तारखेला पुणे दौऱ्यावर

    अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

    आजपासून 28 तारखेपर्यंत पुण्यात अभाविपची राष्ट्रीय बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ला पुण्यात येणार

  • 24 May 2023 02:55 PM (IST)

    संसद भवनाच्या उद्घाटनावरून खासदार सुजय विखेंचा संजय राऊत यांना टोला

    संसदेच्या उद्घाटनाला बाकी कोणी जाऊ न जाऊ मात्र संजय राऊत यांना जायचा मुळीच अधिकार नाही

    ज्या लोकांच्या मतावर ते खासदार झाले ते त्यांना सोडून गेले

    संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे

  • 24 May 2023 02:50 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष होते

    पतसंस्थेच्या कार्यालयात काल गळफास घेत केली आत्महत्या

    आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही

    पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय

  • 24 May 2023 02:43 PM (IST)

    पुणेकरांना 40 टक्के करसवलत मिळणार 

    राज्य शासनानं जाहीर केलेल्या 40 टक्के करसवलतीचा मसुदा महापालिकेकडून तयार

    मसुदा विधी समितीकडे पाठवण्यात आला आहे

    मुख्य सभेच्या मान्यतेनंतर महापालिका राज्य शासनाला पाठवणार प्रस्ताव

    राज्य सरकारच्या मंजूरीनंतर मिळणार कायदेशीर व तांत्रिक मंजूरी

    पुणेकरांना 40 टक्के करसवलत मिळणार

    प्रशासनाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे

  • 24 May 2023 02:37 PM (IST)

    उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार बारावीचा निकाल!

    या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

    Maharesult.nic.in

    hsc.maharesult.org.in

    hscresult.mkcl.org

  • 24 May 2023 02:37 PM (IST)

    पुणे: खेड बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    पुणे जिल्ह्यातील खेड बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कैलास लिंभोरे यांची निवड

    उपसभापती पदी विठ्ठल वनगरे यांची निवड

  • 24 May 2023 02:30 PM (IST)

    कल्याण: ड्रग लेडी गजाआड

    कल्याणच्या इराणी वस्ती मधून ड्रग लेडी गजाआड

    सबा सैय्यद असे महिलेचे नाव

    महिलेकडून एम डी ड्रग्ज आणि चरस हस्तगत

    कल्याणच्या आंबिवली , मोहने, आणि आजूबाजूच्या परिसरात एम डी ड्रग्ज, चरस विक्री करत असल्याची माहिती

    कल्याण खडकपाडा पोलिसांनी केली रंगेहाथ अटक

  • 24 May 2023 02:20 PM (IST)

    अमरावती: बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा

    दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड

    अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष

    बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा

    अपंग कल्याण मंत्रालय स्थापन झाल्याने अमरावतीत आनंद उत्सव साजरा

    अमरावतीत फटाके फोडून लाडू मिठाई वाटप करत प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • 24 May 2023 02:12 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी निघालेली मराठा वनवास यात्रा पुण्यात दाखल

    पुण्यातील हडपसरमध्ये वनवास यात्रा दाखल झाली आहे

    मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण मिळावं ही याची प्रमुख मागणी आहे

    उद्या पुण्यात सकाळी स्वारगेट ते लाल महालापर्यंत निघणार पदयात्रा

    लाल महालासमोर उद्या सभा

    मराठा समन्वयक पुढच्या आठवड्यात मुंबईत मंत्रालयावर मारणार धडक

    तुळजापूर ते मुंबई अशी निघाली आहे मराठा वनवास यात्रा

  • 24 May 2023 02:01 PM (IST)

    दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड

    अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष

    बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रिपदाचा दर्जा

    अपंग कल्याण मंत्रालय स्थापन झाल्याने अमरावतीत फटाके फोडून लाडू मिठाई वाटप करत प्रहार कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा

  • 24 May 2023 01:54 PM (IST)

    विरोधक त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात - सामंत

    जे अस्तित्वाने कमी आहेत त्यांची अस्तित्वाची लढाई सुरु आहे
    तेच अस्तित्व नसलेले पक्ष मोदीच्या विरोधात एकत्र येण्यासाठीचा संकल्प आहे
    या खासदराकीच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील
  • 24 May 2023 01:52 PM (IST)

    तीन पक्ष आहेत त्यातील पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य माझ्यासाठी महत्वाचे - सामंत

    काँग्रेस एक नंबर, दोन नंबरला राष्ट्रवादी आणि तीन नंबरला उद्धव ठाकरे गट
    त्यामुळेज जागा वाटपात हाच क्रम असावा असं पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे
    अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी मोठा भाऊ
    उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आमचे तेरा आमदार असून, आम्ही मोठे भाऊ आहोत
    लोकसभेची महाविकास आघाडीची यादी व्हायरल झालीय, त्यातील खासदार आमच्या संपर्कात
    जी यादी येतेय दोन चार लोकं शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात
    त्यामुळे परत ते तिकडे कसे उभे रहायताय अशी माझ्या मनात शंका
  • 24 May 2023 01:50 PM (IST)

    सध्या परिस्थिती अशी आहे की, वाईट झालं तर ते भाजप आणि शिंदे गटामुळे केलं - सामंत

    चांगले झालं तर ते महाविकास आघाडीमुळे झालं
    सगळी चर्चा करण्यापेक्षा निवडणूक दिड वर्षावर आहे
    त्यामुळे महाविकास आघाडी टिकू दे हिच माझी शुभेच्छा
  • 24 May 2023 01:49 PM (IST)

    सामना उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे - उदय सामंत

    ते राष्ट्रावादीचे मुखपत्र नाही आणि सामनाचा विचार महाराष्ट्रात कोण करत नाही
    जयंत पाटील त्यांची भूमिका स्वतः मांडतील
    त्यांची वकिली सामनाने करण्याची आवश्यकता नाही
  • 24 May 2023 01:44 PM (IST)

    उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

    दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल

  • 24 May 2023 01:43 PM (IST)

    मतदारसंघात काही कामं होती, त्या संदर्भात दिल्लीत आलोय - राहुल शेवाळे

    अध्यक्ष या नात्याने नवीन संसद भवनाच्या भेटीचं आमंत्रण आहे का?

    या संदर्भात विधीमंडळ सचिवालयात माहिती मिळेल

    या संदर्भात माझ्याकडे अधिकृत माहिती नाही

    मी अनेक वेळा अनेक लोकांना भेटत असतो

    तशी काही राजकीय दृष्टीकोनातून तुषार मेहतांशी भेट झालेली नाही

    मी दिल्लीला येत असतो, या निर्णयानंतर पहिल्यांदा आलोय

  • 24 May 2023 01:41 PM (IST)

    मिरज तालुक्यातील बेडगेत मुलानेच केली बापाची हत्या

    उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला

    मुलगा घटनास्थळावरून फरार

    घटनास्थळी पोलीस दाखल

  • 24 May 2023 01:36 PM (IST)

    नारायणगाव बाजार समितीमध्ये टॉमेटोला कावडींमोल भाव

    कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टॉमेटो दिला रस्त्यावर फेकून

    टॉमेटोला 1 ते 2 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त

    गेली दीड वर्ष जुन्नर बाजार समितीवर प्रशासक

    बाजार समितीची सभापती पदाची निवडणूक हित असतानाच शेतकऱ्यावर टोमॅटो फेकून देण्याची वेळ

  • 24 May 2023 01:31 PM (IST)

    भाजपचा मनमानी कारभार सुरु - भगवंत मान

    मातोश्रीत आल्यावर कुटुंबीयांसारखी वागणूक मिळते

    मोदींकडून देशातील लोकशाहीची हत्या

    राजभवन मोदींचं कार्यालय बनलं

    देशाला वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

    भाजपला पराभवाची भीती वाटतेय

    2024 ला मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलतील

    भाजप आणि संघाचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही

  • 24 May 2023 01:25 PM (IST)

    आम्हीही नातं जपणारे - केजरीवाल

    सरकार येताच केंद्राने आमचे अधिकार हिरावून घेतले

    मोदी सरकारच्या याच हुकूमशाहीच्या विरोधात आमचा लढा

    दिल्लीत ऑपरेशन लोटस केले

    आमचा एकही आमदार फुटला नाही

    दिल्लीत आप सरकार तोडता न आल्याने अधिकारांवर घाला

    आमदार फोडून देशभरातील सरकार फोडण्याचा मोदींचा धंदा

    ईडी, सीबीआयची भीती दाखवून सरकार तोडले जातंय

  • 24 May 2023 01:17 PM (IST)

    अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

    उद्धव ठाकरे

    केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेत

    नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध

    राजकारणापलिकडे आम्ही नातं जपतो

    लोकशाही आणि संविधआन टिकवण्यासाठी आम्ही एकत्र

    दिल्लीतला अधिकारी पोस्टिंगचा कोर्टाचा निर्णय लोकशाही जपणारा

  • 24 May 2023 01:16 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    विकास टिंगरे विश्नांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष होते

    पतसंस्थेच्या कार्यालयात काल गळफास घेत केली आत्महत्या

    आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही

    पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय

  • 24 May 2023 01:15 PM (IST)

    पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत तीन उमेदवारांनी अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा ठपका

    तीन कनिष्ठ अभियंत्यांची हकालपट्टी केली जाणार

    गेल्या वर्षी महापालिकेनं 448 पदांची भरती केली होती, त्यापैकी 145 पदं ही कनिष्ठ अभियंत्यांची होती

    तीन उमेदवारांच्या अनुभव प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित झाल्यानं चौकशी समिती नेमण्यात आली

    यामध्ये प्रमाणपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालं

  • 24 May 2023 01:14 PM (IST)

    राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

    राज्यातील शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पैसे मिळणार

    बीएस्सी पॅरामेडिकल टँक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी मिळणार 8 हजार रुपये

    मार्चपासून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं लागू केला निर्णय

    नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय

    राज्य सरकारने हा निर्णय लागू केल्यानं विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार

  • 24 May 2023 01:12 PM (IST)

    पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन औषध खरेदी करणे महागात पडले

    ऑनलाईन औषधे विकण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 1.23 लाख रुपयांची फसवणूक

    पुणे पोलिसांनी बंगालमध्ये जाऊन या सायबर चोरट्याला केली अटक

    याप्रकरणी खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती

  • 24 May 2023 01:11 PM (IST)

    परंडा येथे तणावाचं वातावरण, पोलिसांनी केला लाठीचार

    परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत जोरदार रस्सीखेच

    आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनंतर लाठीचार

    मंत्री सावंत यांच्या गटाने महाविकास आघाडीचे काही संचालक फोडल्याच्या चर्चेने दोन्ही गटात तणावाचे वातावरण

    निवड पुढे ढकलली

    परंडा बाजार समितीत 18 जगापैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या

    5 जागा भाजप शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात

  • 24 May 2023 01:09 PM (IST)

    परभणीच्या बोरी बाजार समितीच्या सभापती निवडीत भाजपची बाजी

    भाजपचे आत्माराव पवार यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी यशवंत चौधरी यांची निवड

    बोरी बाजार समितीत भाजपच्या मेघना बोर्डीकर गटाने 12 जागा पटकावल्या

    महाविकास आघाडीला 6 जागा मिळाल्या

  • 24 May 2023 01:00 PM (IST)

    समुद्रमार्गे तब्बल 2400 कोटींचे अमली पदार्थ मुंबई आणि गोव्यात, पोलिसांची कारवाई

    - नोएडा येथील कारखान्यात बनवलेले एमडीएमए अमली पदार्थ मुंबई आणि गोव्याला सागरी मार्गाने पाठवले जात आहेत.

    - ग्रेटर नोएडा ते वडोदरा या रस्त्याने अमली पदार्थ मुंबई आणि गोव्याला समुद्रमार्गे जात होते.

    - गेल्या चार वर्षांत 2,400 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा पुरवठा मुंबई आणि गोव्यात करण्यात आला आहे.

    - नोएडा येथे सूरजपूर कोतवाली परिसरात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ कारखान्यावर पोलिसांनी धड टाकली.

    - या धाडीमध्ये पोलिसांना एक डायरी सापडली असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.

  • 24 May 2023 12:55 PM (IST)

    वेळ मिळेल तेव्हा उदघाटन करा, आधी पाणी सोडा, बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

    - आधी जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा. सवड मिळेल तेव्हा उद्‌घाटन करा, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना लगावला आहे.

    - बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले असून त्यामधून त्यांनी हा टोला लगावला आहे.

    - उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील 182 गावांना पाणीपुरवठा करणारे निळवंडे धरण पूर्ण झाले आहे.

    - अनेक अडचणींवर मात करून कालव्यांची कामे पूर्णत्वास आणली.

    - फक्त श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे असा आरोप थोरात यांनी केला.

    - केवळ पंतप्रधान महोदयांची वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

  • 24 May 2023 12:50 PM (IST)

    नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध, हे सगळे संकुचित मनोवृत्तीचे पुतळे, चित्र वाघ यांची टीका

    - विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाची काहींना ॲलर्जी आहे.

    - त्यामुळेच लोकशाहीचे मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची त्यांना दुर्बुद्धी सुचली आहे.

    - हे सगळे संकुचित मनोवृत्तीचे पुतळे आहेत.

    - जनतेने तीनशेपेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला.

    - काही पक्ष ५० खासदारांच्या पुढे गेले नाही, काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्षच उरला नाही.

    - खऱ्या अर्थाने संसदेच्या कार्यक्रमाला बॅायकॅाट करणाऱ्यांना जनतेनेच बॅायकॅाट केले आहे आणि 2024 ला ही तेच करेल, असा टोला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी लगावला आहे.

  • 24 May 2023 12:46 PM (IST)

    19 पक्षांचा नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर बहिष्कार

    - देशातील तब्ब्ल 19 पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

    - राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट यांनी या कायर्कर्मावर बहिष्कार घातला आहे.

    - त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसने सुद्धा या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे

    - त्यासोबतच आम आदमी पक्ष, जनता दल आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनीही या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

  • 24 May 2023 12:29 PM (IST)

    आताची मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

    - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत.

    - उद्धव ठाकरे यांचे हे दोन मुख्यमंत्री भेट घेणार आहेत.

    - नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्ष एकत्र मोट बांधत आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 24 May 2023 12:16 PM (IST)

    राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाची कोल्हापूर, नागपूर, औरंगाबादमध्ये निदर्शने

    - राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे.

    - कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

    - नागपूरमध्ये राहुल गांधी यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्यात आला.

    - छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची यांची तुलना केल्याने भाजप पक्ष आक्रमक झाला आहे.

  • 24 May 2023 12:10 PM (IST)

    विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांची आत्महत्या

    - विश्रांतवाडी येथील काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाने स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

    - विकास शिवाजी टिंगरे असे आत्महत्या केलेल्या ब्लॉक अध्यक्षाचे नाव आहे.

    - विकास टिंगरे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते.

    - पोरवाल रस्त्यावरील पतसंस्थे शेजारी त्याचे कार्यालय आहे.

    - आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

  • 24 May 2023 12:02 PM (IST)

    रेल्वे गाड्याच्या बुकिंगमध्ये घोळ, कोकणवासीयांचा त्रास दूर करू - नितेश राणे

    - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याच्या बुकिंगमध्ये मोठा घोळ आढळून आला आहे.

    - अवघ्या काही मिनिटात रेल्वे बुकिंग फुल्ल झाल्या.

    - हा घोटाळा असून असंख्य कोकणवासियांनी आम्हाला फोन केला आहे

    - यासंदर्भांत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी रेल्वे मंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत.

    - यामधून कोकणी जनतेला दिलासा देऊ असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

  • 24 May 2023 11:56 AM (IST)

    कुकडीच्या पाण्यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे

    कुकडीच्या पाण्यावरून पुन्हा पुणे आणि नगर जिल्हा वाद पेटण्याची चिन्ह

    राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी विरोध केल्याने कुकडीच आवर्तन लांबीवर

    आवर्तन लांबल्याने पारनेर,श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना फटका

    तर शेतीसाठी २२ मे रोजी आवर्तन सोडणार असल्याचे कालवा सल्लागार समितीने केले होते जाहीर

    मात्र, पुणे जिल्ह्यातील काही नेते आणि संघटनांनी विरोध केल्याने हे आवर्तन सोडले नाही

    तर घारगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्तो रोको आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

    कुकडीच्या आवर्तनासाठी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी केलं लक्षणीय उपोषण

  • 24 May 2023 11:45 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना केल्याने निदर्शनं

    छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची तुलना केल्याने भाजप आक्रमक

    कोल्हापुरात भाजप युवा मोर्चाची काँग्रेस विरोधात निदर्शन

    कोल्हापूरच्या शिवाजी चौकात युवा मोर्चाची निदर्शने

    काँग्रेसच्या सोशल मीडिया साईटवर राहुल गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणारा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड

  • 24 May 2023 11:35 AM (IST)

    अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम

    मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम

    अमित ठाकरे यांच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त मनविसेतर्फे पुणेकरांसाठी खास गिफ्ट

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी 31 रुपये स्वस्त पेट्रोल

    पुण्यातील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे 31 रुपये कमी दराने दिले जात आहे पेट्रोल

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी खास कुपन

    शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मनसेतर्फे वाटले जात आहेत स्वस्त पेट्रोलचे कूपन

  • 24 May 2023 11:25 AM (IST)

    टेंबोडे गावाजवळ बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ

    नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बसारखी वस्तू असल्याचा पोलीस ठाण्यात फोन

    टेंबोडे गावाच्या जवळ बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ

    पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

    बॉम्बशोधक पथकाने केला शोध सुरू

    डमी हॅन्ड ग्रॅनाईट सापडले असल्याचे माहिती समोर

    बॉम्ब शोधपथकासह पोलीस दाखल अजून काही मिळते का याचा शोध सुरू

  • 24 May 2023 11:13 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार?

    आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार?

    वरळी सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाल्याचा शिवेसेनेचा आरोप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

    याआधी देखील वरळीतल्या अधिका-यांनी भ्रष्टाचार केल्याच्या घटना घडल्या आहेत

    तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आदेश

    शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केली होती वरळीतील भ्रष्टाराचाराची तक्रार

    वरळीतील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली होती तक्रार

  • 24 May 2023 10:52 AM (IST)

    दिल्ली : नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्कार

    राष्ट्रवादीचा एकही नेता संसदेच्या उद्धाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाही

    RJDचे नेतेही टाकणार बहिष्कार, तेजस्वी यादव यांनीही केले जाहीर

  • 24 May 2023 10:39 AM (IST)

    नाशिक : अभिनेता नितेश पांडे यांचे निधन

    वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने झालं निधन

    अनुपमा मालिकेत साकारली होती भूमिका

    नितेश पांडे यांच्या इतर मालिकांमधील भूमिकाही लोकप्रिय

  • 24 May 2023 10:19 AM (IST)

    अनिल देशमुखांवर भाजपा प्रवेशासाठील दबाव होता - संजय राऊत

    भाजपात जाण्यासाठी नकार दिल्याने देशमुखांना तुरूंगात टाकलं

    अनिल देशमुखांवरील दबावासंदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत , संजय राऊतांचा दावा

  • 24 May 2023 10:12 AM (IST)

    नव्या संसद भवनाची देशाला गरज होती का ? संजय राऊत यांचा सवाल

    फक्त पंतप्रधानांची इच्छा म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून नवे बांधकाम केले

    राष्ट्रपतींना डावलून संसदेचे उद्घाटन का, राऊत यांनी केला सवाल

  • 24 May 2023 10:07 AM (IST)

    आर्यन खान केस : समीर वानखेडे आज CBI समोर हजर होणार नाहीत

    समीर वानखेडे आज सीबीआयसमोर हजर होणार नाहीत.

    सीबीआयने वानखेडे यांना आज तिसऱ्यांदा बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.

    मात्र वैयक्तिक कारणांमुळे वानखेडे आज चौकशीसाठी जाणार नाहीत

    25 कोटींच्या खंडणीप्रकरणी सीबीआयने समीरची दोनदा चौकशी केली आहे.

  • 24 May 2023 10:03 AM (IST)

    राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता

    राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता

    केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने राज्यातही विस्तार लांबणार ?

  • 24 May 2023 09:55 AM (IST)

    प्राचार्यांची बदली रद्द, विद्यार्थ्यांनी केले स्वागत

    अहमदनगरला नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कर्मवीर विद्यालयातील प्राचार्यांची बदली रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलाय. प्राचार्य संपतराव काळे यांची जामखेड तालुक्यात बदली झाली होती. मात्र ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे बदली रद्द झाली असून पुन्हा सारोळा शाळेत रुजू झाले आहेत.

  • 24 May 2023 09:49 AM (IST)

    एसी लोकल थांबवली

    पश्चिम रेल्वेत प्रवाशांनी एसी लोकल थांबवली

    सकाळी ७.५६ वाजता विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलचा एसी काम करत नसल्याने प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजे बंद करू दिले नाहीत.

    दरवाजा बंद असल्याने प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत होता

    दरवाजा बंद नसल्याने गाडी वांद्रे स्थानकात थांबली

    त्यानंतर लोकांनी विरोध करत ट्रेन रोखल्यानंतर एसी सुरू करण्यात आला

    वांद्रे स्थानकात सुमारे १५ ते २० मिनिटे गोंधळ सुरू होता.

  • 24 May 2023 09:42 AM (IST)

    यूपीएससीत गोंदियाच्या अमितचे यश

    गोंदियाच्या अमित उंदीरवाडे यांनी पटकावले यूपीएससी स्थान

    यूपीएससी परीक्षेत आला तो 581 वा

    अमितच्या घरी पेढे वाटून फटाके फोडून आनंद केला व्यक्त

  • 24 May 2023 09:38 AM (IST)

    हर्सूल तलावाची पाणी पातळी साठ टक्क्यांनी घटली

    संभाजीनगरातील ऐतिहासिक हर्सूल तलावाची पाणी पातळी साठ टक्क्यांनी घटली

    शहरातील 8 ते 10 वार्डना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पाणी पातळी घटली

    हर्सूल तलावात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

    शहराला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

    400 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे ऐतिहासिक हर्सूल तलाव

    पाणीपातळीत तब्बल 60 टक्क्यांची घट झाल्यामुळे वाढली चिंता

  • 24 May 2023 09:30 AM (IST)

    पुणे पोलिसांकडून नाकाबंदी

    पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोऱ्या ,घरफोडी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खेड पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर येथे रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली होती.
  • 24 May 2023 09:22 AM (IST)

    जोतिबा विकास प्राधिकरणाचे काम सुरू होणार

    कोल्हापूर जोतिबा विकास प्राधिकरणाचे काम सुरू होणार

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला कामाच्या प्रस्तावाचा आढावा

    विविध विभागाने सादर केलेल्या आराखड्याचे लोकप्रतिनिधी समोर होणार सादरीकरण

    सादरीकरणानंतर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात

    श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सुविधा देण्यासाठी जोतिबा डोंगर विकास प्राधिकरणाची करण्यात आलीय स्थापना

    प्राधिकरणाकडून 50 कोटीच्या निधीलाही मिळाली आहे मंजुरी

  • 24 May 2023 09:17 AM (IST)

    गणवेशाच्या निर्णयास विरोध

    विद्यार्थी गणवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आता पालक संघटनांकडून विरोध

    एकाच आठवड्यात विद्यार्थ्याना दोन गणवेश घालायला सांगणं हे चुकीचं आहे.

    दोन गणवेश घेणं पालकांना परवडणारं नाही

    शिवाय खाजगी शाळा सरकारचा नियम पाळणार का ? याबाबत साशंकता, त्यामुळे आधीचाच नियम कायम ठेवण्याची पालकांची मागणी

  • 24 May 2023 09:10 AM (IST)

    गायरानातील अतिक्रमण उपसरपंचाला भोवले

    कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील देवाळे चे उपसरपंच राजेंद्र चावरे यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

    चावरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या बाबत गावातील विरोधी गटाने केली होती तक्रार

  • 24 May 2023 09:03 AM (IST)

    ट्रॅव्हल्स-ट्रकचा अपघात, 12 जण गंभीर जखमी

    समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. महामार्गावर रात्री 1 च्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात 12 जण गंभीर तर 18 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालकाने अचानक लेन कटिंग केल्यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी ट्रकवर धडकल्याने हा अपघात घडला आहे

  • 24 May 2023 09:02 AM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता

    यामध्ये माधुरी मिसाळ,राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत

    राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भेट

    जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याची शक्यता

  • 24 May 2023 08:51 AM (IST)

    'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू

    ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेत जास्मिनची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं निधन

    अवघ्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप

    हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात गमावला जीव, वाचा सविस्तर..

  • 24 May 2023 08:42 AM (IST)

    औरंगाबाद | करमाड परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

    अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

    दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर

    करमाड ते औरंगाबाददरम्यान झाला अपघात

    कार कठड्याला धडकून भीषण अपघात

    सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला अपघात

  • 24 May 2023 08:35 AM (IST)

    नाशिक | जिल्हा परिषद राबविणार रेशीम शेती प्रकल्प

    शेतकऱ्यांना पूरक उद्योग म्हणून अतिरिक्त उत्पन्न प्राप्त व्हावे, यासाठी राबविला जाणार प्रकल्प

    सर्व तालुक्यांत विविध ठिकाणी घेण्यात येणार वर्कशॉप

    रेशीम शेती प्रकल्प प्रशिक्षणासाठी नाव नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

  • 24 May 2023 08:28 AM (IST)

    धाराशिव | भुम तालुक्यातील एका गावात 8 वर्षीय चिमुकलीवर 35 वर्षाच्या नराधमाकडून बलात्कार

    पंडीत गोयकर असे आरोपीचे नाव, आरोपी फरार

    भुम पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

    पीडित मुलीच्या आईच्या जबाबवरून गुन्हा नोंद

  • 24 May 2023 08:22 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक आज

    या बाजार समितीत 17 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 संचालक विजयी

    सभापतीपदावर दोन जुन्या की आठ नव्या संचालकांपैकी कुणाला संधी मिळणार? याची उत्सुकता

    आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत होणार निवड

  • 24 May 2023 08:15 AM (IST)

    धाराशिव | वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना फटका, एक शेतकरी ठार तर जवळपास 20-25 पोल पडले

    वादळी वाऱ्याने विजेच्या तारा अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

    महावितरण आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा उघड

    मुरूम येथील लक्ष्मण कुंभार असे मृत शेतकऱ्याचे नाव

  • 24 May 2023 08:09 AM (IST)

    नाशिकच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा

    जिल्ह्यातील 59 गावे आणि 50 वाड्यांना 52 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

    जिल्ह्यातील जवळपास 97 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू

    येवला तालुक्यातील 43 गावांसाठी सर्वाधिक 20 टँकर सुरू

  • 24 May 2023 07:58 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ गावातील डमडम तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

    आयुष्य नागलोद आणि संकेत ब्रह्मवृत अशी तळ्यात बुडालेल्या दुर्दैवी मुलांची नावे

    एकाच वय सात वर्षे तर दुसऱ्या मुलाचे वय 17 वर्षे

    पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून झाला दुर्दैवी मृत्यू

    घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती

    गावातील नागरिकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह काढले बाहेर

  • 24 May 2023 07:52 AM (IST)

    हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी नाशिक महापालिकेकडून विशेष लसीकरण मोहीम

    131 यात्रेकरुंना देण्यात आला मेंदूज्वर, पोलिओचा डोस

    19 ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली एन्फ्लुंझा लस

    महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात राबविण्यात आले शिबीर

  • 24 May 2023 07:14 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

    शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर अमित ठाकरे यांचा मध्यरात्री वाढदिवस साजरा

    अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्था बाहेर जमले

    अमित ठाकरे यांनी आपल्या चाहत्यांसोबत केक कापून केला वाढदिवस साजरा

  • 24 May 2023 07:12 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट

    स्फोटात 11 जण जखमी झाल्याची माहिती

    खाणीच्या सीएम - 2 सेक्टर 16 मध्ये मंगळवारी दुपारी झाला स्फ़ोट

    जखमी सहा कामगारांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु

    कोळसा काढताना एअर स्टोनिंग ब्लास्ट झाल्याने 11 कामगार झाले जखमी

  • 24 May 2023 07:11 AM (IST)

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट दलालांची दादागिरी

    मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालाने केली बेदम मारहाण

    दोन दिवस रांगेत उभे राहून तिकीट मिळत नसल्याने तिसऱ्या दिवशी प्रवाशाने रात्री दलाल कशा रांगा लावतात याचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केल्याने दलालाने केली मारहाण

    कल्याण लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 24 May 2023 07:10 AM (IST)

    पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार

    शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार

    जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी 24 मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्याचे आवाहन

    त्यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे

  • 24 May 2023 07:07 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामाचा आढावा

    यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक

    जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक

    तर दुपार नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आय. आय. टी. मुंबई आणि आय. आय. एम. नागपूर या संस्थांसोबत होणाऱ्या सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थित राहणार

    त्यानंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावा शेव्हा) रोडची करणार पाहणी

Published On - May 24,2023 7:04 AM

Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.