सर्वात मोठी बातमी, विद्यार्थांनो तुम्हाला पास व्हावंच लागणार, पण…, सरकारने ‘त्या’ निर्णयात केली सुधारणा

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बदल घडण्याची शक्यता आहे. खरंतर सरकारने याआधी घेतलेल्या निर्णयात सुधारणा केली आहे, असंही म्हणता येईल.

सर्वात मोठी बातमी, विद्यार्थांनो तुम्हाला पास व्हावंच लागणार, पण..., सरकारने 'त्या' निर्णयात केली सुधारणा
school studentImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:14 PM

पुणे : राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध केले. शिक्षण हक्क कायदा २०११ तील तरतुदीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन करण्यात येते. त्यात आता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पहिले ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातोय. अर्थात त्यासाठी काही महत्त्वाची कारणं होती. नापास या संकल्पनेमुळे विद्यार्थ्याच्या मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे ते खचतात. त्यांना आपल्या बुद्धिमतेला त्यातून हवी तशी चालना देता नाही. ते उलट त्याचाच विचार करतात. त्यामुळे ते नैराश्यात जातात. त्यामुळे कदाचित शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला होता. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्यापरिने विषय हाताळता येतील. त्यांचं शिक्षण होईल.

शिक्षण विभागाने आपल्या आधीच्या निर्णयात काहीसा बदल केलाय. शिक्षण विभागाने आता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा पास होणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केलं आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत समजा पहिल्यांदा यश मिळालं नाही तर पुन्हा त्यांना संधी देण्यात येईल. पण त्यातही त्यांना यश मिळालं नाही तर त्यांना त्याच वर्गात प्रवेश घ्यावा लागेल. त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

शिक्षण विभागाने नेमकं काय म्हटलंय?

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.

विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.