
2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं, पुणे महापालिकेतील 171 जागांपैकी तब्बल 97 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पुणे महापालिकेतील असे अनेक प्रभाग होते, जिथे चारही जागांवर भाजपचाच विजय झाला होता. इतर पक्षांना साधं या प्रभागात खातं देखील उघडता आलं नव्हतं. त्यातीलच दोन प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 33 आणि 34 या दोन्ही प्रभागातील आठही जागांवर भाजपच्याच उमेदवारांचा विजय झाला होता. प्रभाग क्रमांक 33 मध्ये वडगाव धायरी आणि सन सिटी या भागाचा समावेश होतो. तर प्रभाग क्रमांक 34 मध्ये वडगाव बुद्रुक आणि हिंगणे खुर्द याचा समावेश होतो. गेल्या वेळी या दोन्ही प्रभागामध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं, आठही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, मात्र यावेळी काही राजकीय समीकरणे बदलली आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं भाजपासमोर तगडं आव्हान असणार आहे, त्यामुळे निकाल काय लागतो? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक 33 – प्रभाग क्रमांक 33 मध्ये वडगाव धायरी आणि सनसिटी या भागाचा समावेश होतो. गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 33 मध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं, या प्रभागातील चाहरी जागांवर भाजपचा विजय झाला होता. इतर कोणत्याही पक्षाला या प्रभागात खातं देखील उघडता आलं नव्हतं. प्रभाग क्रमंक 33 अ मधून भाजपचे उमेदवार हरिदास चरवड हे विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 33 ब मधून भाजपच्या उमेदवार हेमा नवले या विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 33 क मधून भाजपच्या उमेदवार निता दणगट या विजयी झाल्या, प्रभाग क्रमांक 33 ड मधून भाजपचे उमेदवार राजू लायगुडे यांनी बाजी मारली.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 34 – प्रभाग क्रमांक 34 मध्ये देखील चारही जागांवर भाजपचाच विजय झाला होता. प्रभाग क्रमांक 34 अ मधून भाजपचे उमेदवार प्रसन्न जगताप हे विजयी झाले, तर ब मधून भाजपच्या उमेदवार ज्योती गोसावी या विजयी झाले होत्या, तर क मधून मंजुशा नागपुरे या विजयी झाल्या, ड मधून भाजपचे उमेदवार श्रीकांत जगताप यांनी विजयाचा गुलाल उधळला.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE